धक्कादायक : सुरवसे कुटुंबातील तिघा शाळकरी मुलांवर काळाची झडप, तलावाच्या पाण्यात बुडून तिघांचा मृत्यू, मृतांमध्ये दोघा भावांसह एका बहिणीचा समावेश, खळबळजनक घटनेने जामखेड तालुका हादरला

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : जामखेड तालुक्यातील खर्डा येथील एकाच कुटुंबातील तिघा भावडांचा पाझर तलावाच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना गुरूवारी दुपारी घडली आहे. या घटनेत खर्डा येथील सुरवसे कुटुंबातील तिघा शाळकरी मुलांवर काळाने झडप घातली. ही दुर्दैवी घटना खर्डा शहराजवळील आंतरवली (भूम जि. धाराशिव -उस्मानाबाद) हद्दीतील कटखळी पाझर तलावात घडली. या खळबळजनक घटनेने जामखेड तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.

Shocking, kalachi zadap on three school children of Suravse family in Kharda, Three died after drowning in lake water, Two brothers and one sister were among the dead, Jamkhed taluka was shocked by sensational incident,

याबाबत समजलेली माहिती अशी की, भावकीतील वयस्क व्यक्तीच्या मृत्यूचे सुतक फेडण्यासाठी रुपाली ज्ञानेश्वर सुरवसे Rupali Dnyaneshwar Suravse ह्या खर्डा शहरापासून जवळच असलेल्या एका पाझर तलावावर गुरुवारी दुपारी कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या.यावेळी त्यांच्यासमवेत कृष्णा परमेश्वर सुरवसे – Krushna Parmeshwar Suravase, दिपक ज्ञानेश्वर सुरवसे – Dipak Dnyaneshwar Suravse, सानिया ज्ञानेश्वर सुरवसे – Sania Dnyaneshwar Suravse हे तिघे भावंड होते.

Shocking, kalachi zadap on three school children of Suravse family in Kharda, Three died after drowning in lake water, Two brothers and one sister were among the dead, Jamkhed taluka was shocked by sensational incident,

यावेळी सानिया सुरवसे ही शाळकरी मुलगी अचानक तलावात पाय घसरून पडली. तिला वाचवण्यासाठी कृष्णा व दिपक ही दोन्ही भावंडे पाण्यात उतरली. मात्र खोल पाण्याचा अंदाज न आल्याने तेही पाण्यात बुडाले. तिघांना वाचवण्यासाठी आई रूपाली सुरवसे यांनी पाण्यात उडी मारली. मात्र त्याही पाण्यात बुडू लागल्या. यावेळी त्यांनी जोर-जोरात आरडा ओरडा केला असता रस्त्यावरून जाणारे भुम तालुक्यातील गिरलगावचे सरपंच बिभिषण वाघमोडे, अंतरवलीचे चांद पठाण व खर्डा येथील भाऊसाहेब दिगंबर वाळुंजकर या तिघा वाटसरूंनी धाडस दाखवत पाण्यात उड्या टाकल्या. यावेळी त्यांनी मुलांना वाचवण्यासाठी धडपडणाऱ्या आईला पाण्यातून बाहेर काढले, तिच्यावर प्राथमिक उपचार केले. तिचा जीव वाचवला. मात्र तिघा मुलांना वाचवण्यात अपयश आले.

या घटनेत दहावीत शिक्षण घेत असलेले कृष्णा परमेश्वर सुरवसे (वय१६ वर्षे) व दिपक ज्ञानेश्वर सुरवसे (वय १६ वर्षे) तर आठवीत शिक्षण घेत असलेली सानिया ज्ञानेश्वर सुरवसे या तिघा शाळकरी विद्यार्थ्यांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. तर या मुलांची आई रुपाली ज्ञानेश्वर सुरवसे ह्या वाटसरूंनी दाखवलेल्या धाडसामुळे बचावल्या. भावकीतील मृत व्यक्तीचे सुतक फिटण्याआधीच सुरवसे कुटुंबावर पुन्हा दु:खाचा मोठा डोंगर कोसळल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. सदरची घटना खर्डा शहरापासून जवळच असलेल्या भूम (जि. धाराशिव) तालुक्यातील अंतरवली गावच्या हद्दीतील कटखळी पाझर तलाव परिसरात घडली.

सदरच्या घटनेची माहिती मिळताच सुरवसे कुटुंबातील सदस्यांसह खर्डा गावचे माजी उपसरपंच भागवत सुरवसे, वडार समाज संघटनेचे अध्यक्ष अध्यक्ष बबलु  सुरवसे, योगेश सुरवसे, लखन नन्नवरे, अनिल धोत्रे, बिभीषण चौघुले, मयुर डोके, बाबासाहेब डोके, विशाल मुरकुटे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पाण्यात बुडालेल्या तिघा भावंडांना जामखेडच्या ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले. परंतू रूग्णालयात दाखल होण्याआधीच त्यांचा मृत्यू झाला होता. कायदेशीर बाबींची पूर्तता केल्यानंतर मयत मुलांच्या मृतदेहांचे शवविच्छेदन करण्यात आले. जामखेड ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. युवराज खराडे यांनी शवविच्छेदन केले. त्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. यावेळी रूग्णालय परिसरात मृतांच्या नातेवाईकांनी व नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

खर्डा येथील मयत मुलांचे नातेवाईक बिभीषण नामदेव चौघुले यांनी दिलेल्या खबरीवरून झिरो नंबरने जामखेड पोलीस स्टेशनला सी. आर. पी. सी. १७४ प्रमाणे आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. हा गुन्हा आंबी तालुका भूम, जिल्हा धाराशिव पोलीस स्टेशनकडे वर्ग होऊन त्याचा पुढील तपाह आंबी पोलिस करणार आहेत.

दरम्यान पाझर तलावाच्या पाण्यात बुडून मृत्यूमुखी पडलेले कृष्णा व दिपक हे दोघेही चुलत भावंड एकुलते एक होते. मयत तिघा बहिण भावडांवर एकाच चितेवर शोकाकुल वातावरणात खर्डा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. मयत तिघा भावडांच्या आई – वडील व नातेवाईकांचा आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा होता. आई- वडिलांचा आक्रोश पाहून उपस्थितांना आश्रू अनावर झाले होते. एकाच कुटुंबातील तिघा विद्यार्थ्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याच्या घटनेने खर्डा परिसरावर शोककळा पसरली आहे.