जामखेड टाइम्स वृत्तसेवा : कर्जत तालुका भारतीय जनता पार्टीच्या तालुकाध्यक्ष बदलाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा अहमदनगर जिल्हा प्रभारी माधव भंडारी यांच्या उपस्थितीत कर्जत तालुकाध्यक्षपदाच्या मुलाखती नुकत्याच घेण्यात आल्या. या मुलाखतीत कर्जत तालुक्यातील सहा जणांनी तालुकाध्यक्षपदासाठी पक्षाकडे मुलाखती दिल्या.
आगामी लोकसभा – विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर अहमदनगर जिल्ह्यामध्ये भाजपाच्या संघटनात्मक निवडीचा कार्यक्रम सुरू झाला आहे. त्यानुसार कर्जत तालुकाध्यक्ष पदासाठी पक्षाने नुकत्याच मुलाखती घेतल्या. नगर तालुक्यातील वाळकी येथे मुलाखतींचा कार्यक्रम पार पडला. भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा अहमदनगर जिल्ह्याचे प्रभारी माधव भंडारी, जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले, प्रदेश चिटणीस अरूण मुंडे, जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग सह आदी उपस्थित होते. यावेळी प्रत्येक इच्छुकांची माधव भंडारी यांनी मुलाखत घेतली.
“कर्जत तालुकाध्यक्ष पदासाठी मुलाखती देणाऱ्या पदाधिकाऱ्यांमध्ये विद्यमान तालुकाध्यक्ष डॉ सुनिल गावडे, शेखर खरमरे, संपत बावडकर, गणेश पालवे, अनिल गदादे, पप्पुशेठ धोदाड या सहा जणांचा समावेश आहे.”
कर्जत बरोबरच जामखेड तालुकाध्यक्षपदासाठी सुध्दा मुलाखती पार पडल्या. जामखेड मधून 17 जणांनी मुलाखती दिल्या. जामखेड तालुक्यात इच्छुकांची संख्या अधिक आहे. दरम्यान कर्जत आणि जामखेड या दोन्ही तालुक्यातील तालुकाध्यक्ष निवडीत आमदार प्रा.राम शिंदे यांची भूमिका महत्वाची असणार आहे. आमदार प्रा.राम शिंदे यांचा आशिर्वाद मिळवण्यात जो इच्छूक यशस्वी ठरेल त्याच्याच गळ्यात तालुकाध्यक्ष पदाची माळ पडणार आहे.
कर्जत तालुकाध्यक्ष पदासाठी मुलाखती देणाऱ्या पदाधिकाऱ्यांमध्ये विद्यमान तालुकाध्यक्ष डॉ सुनिल गावडे, शेखर खरमरे, संपत बावडकर, गणेश पालवे, अनिल गदादे, गणेश पालवे या सहा जणांचा समावेश आहे.”