जामखेड टाइम्स वृत्तसेवा । इंदापुर तालुक्यातील बारामती ॲग्रो कारखान्याने गळीत हंगामापूर्वी गाळप सुरू करत नियमभंग केला आहे. कारखान्यावर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी आमदार राम शिंदे यांनी केल्यानंतर मोठे वादळ उठले होते, परंतू राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी बारामती ॲग्रो साखर कारखान्याला क्लिन चीट दिल्याने हे वादळ शमले आणि राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांना मोठा दिलासा मिळाला.
आमदार राम शिंदे यांनी केलेल्या तक्रारीवरून प्रादेशिक सहसंचालक कार्यालयाच्या चौकशी पथकाने 11 रोजी केली. या पथकाने दिलेल्या अहवालात, बारामती ॲग्रो साखर कारखान्याचा गळती हंगाम सुरु झाला नसुन मोळी पूजन करण्यात आल्याचं निदर्शनास आलं, त्यानंतर आयुक्त शेेखर गायकवाड यांनी कारखान्याला क्लिन चीट दिली.
मंत्री समितीने 15 ऑक्टोबर रोजी ऊस गाळप हंगाम सुरु करण्याची शिफारस केली आहे. मात्र आमदार रोहित पवार यांनी त्यांच्या बारामती अॅग्रो कारखान्याचे गाळप त्यापूर्वीच सुरू केले, अशी तक्रार भाजपचे नेते आणि आमदार राम शिंदे यांनी सोमवारी साखर आयुक्तांकडे केली होती. त्यानुसार साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी पुणे विभागाचे प्रादेशिक सहसंचालक डोईफोडे यांना चौकशीबाबत सूचना केल्या होत्या.
शेखर गायकवाड यांच्या सूचनेनुसार प्रादेशिक सहसंचालकांच्या कार्यालयातील एक पथक मंगळवारी कारखानाच्या कार्यस्थळावर दाखल झाले. पथकाकडून कारखाना आवारात पाहणी करुन याचा अहवाल साखर आयुक्तांना सादर करण्यात आला. या अहवालानुसार बारामती ॲग्रो साखर कारखान्यात १० ऑक्टोबरला केवळ मोळी पूजन झालं असून गळीत गळती हंगाम सुरु झाला नसल्याचं निदर्शनास आलं आहे.
रोहित पवार यांनी शिंदे यांच्यावर राजकारण करत असल्याचा आरोप केला. ते म्हणाले, मी त्यांची पत्रकार परिषद बघितली. त्यात केवळ राजकारणचं होतं. त्यात कुठेही शेतकऱ्यांच हित नव्हतं. राजकीय दृष्टिकोनातून केवळ रोहित पवार अडचणीत यावा यासाठी प्रयत्न करतं आहेत. जरं राजकारणातून कोणं अशी तक्रार करतं असेलं तर शेतकरीच त्यांना उत्तर देतील.