Suraj Chandanshive News : पोलिसच बनला पोलिसाचा वैरी ! सहाय्यक पोलिस निरीक्षकाच्या हत्येप्रकरणी पोलिस कर्मचाऱ्यासह दोन जण अटकेत !

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : suraj chandanshive news : पोलिसच पोलिसाचा वैरी बनल्याची एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका पोलिस कर्मचाऱ्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याची हत्या केल्याची बाब पोलिस तपासात उघड झाली आहे. पोलिसानेच पोलिसाची हत्या केल्याची बाब उघडकीस येताच पोलिस दलात मोठी खळबळ उडाली आहे. ही घटना सांगोला पोलिसांनी उघडकीस आणली आहे. (suraj chandanshive latest news)

Suraj Chandanshive News, Police became enemy of police, Police Constable Sagar Kedar arrested in connection with API Suraj Chandanshive murder, vijay kedar, Kedarwadi, Vasud sangola news, Solapur,

सांगोला (sangola) तालुक्यातील वासुद (Vasud) येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरज विष्णू चंदनशिवे (वय 42 ) यांची 3 ऑगस्ट 2023 रोजी धारदार शस्त्राने पाठीत वार करून हत्या करण्यात आली होती. 3 ऑगस्ट 2023 रोजी रात्री जेवण करून शतपावली करण्यासाठी सुरज चंदनशिवे हे घराबाहेर पडले होते. रात्री उशिरा ते घरी परतले नव्हते. नातेवाईकांनी फोन केला असता त्यांचा फोन बंद आला होता.दुसर्‍या दिवशी सकाळी एका रस्त्याच्या कडेला ऊसाच्या शेतात त्यांचा मृतदेह आढळून आला होता. या प्रकरणी सांगोला पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरज विष्णू चंदनशिवे यांच्या हत्या प्रकरणात सांगोला पोलिसांनी केलेल्या सखोल तपासात पोलिसांच्या हाती धक्कादायक माहिती लागली. पोलिसांनी वासुद गावातील रहिवासी असलेला व सध्या मुंबई पोलीस दलात कार्यरत असणाऱ्या सुनिल मधुकर केदार (sunil kedar) हाच या खून प्रकरणातील मुख्य सूत्रधार असल्याचे सांगोला पोलिसांच्या तपासात समोर आले. त्यानुसार सांगोला पोलिसांनी सागर केदार या पोलिसाला अटक केली आहे. सुरज चंदनशिवे यांचा खून आर्थिक व्यवहारातून झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.

सांगोला पोलिसांनी सुरज चंदनशिवे खुन प्रकरणात मुंबई पोलीस दलातील कर्मचारी सुनील केदार (sunil kedar) आणि वासुद गावातील त्याचा सहकारी विजय केदार (Vijay Kedar) या दोघांवर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना 24 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी (Police Custody) सुनावली आहे. हत्या झालेल्या सुरज चंदनशिवे यांना केदार यांचे काही पैसे द्यायचे होते, यावरुन त्या दोघांचे मागील वर्षीपासून वाद सुरू होते.

3 ऑगस्ट रोजी रात्री जेवण केल्यानंतर सूरज हे आपल्या राहत्या घरापासून थोडं दूर शतपावली करण्यासाठी गेले होते. केदारवाडी रस्त्यावर (Kedarwadi Road) ते शतपावली करत होते. त्यावेळी त्याठिकाणी दबा धरुन बसलेल्या हल्लेखोरांनी सूरज यांच्यावर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला (Sharp Weapon Attack) केला. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. शतपावली करुन बराचवेळ झाला तरी सूरज घरी परत न आल्याने कुटुंबियांनी त्यांचा शोध घेतला. त्यावेळी सूरज यांचा मृतदेह वासूद – केदारवाडी रोडजवळ आढळून आला. (Maharashtra Police News)

याप्रकरणी सांगोला पोलीस ठाण्याचे (Sangola Police Station) पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी (PI Anant Kulkarni) यांनी अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा (FIR) दाखल केला होता.पंधरा दिवसांच्या तपासानंतर सांगोला पोलिसांच्या हाती खूनाचे धागेदोरे लागले आहेत.संशयित आरोपी सुनील‌ केदार याला सांगोला पोलिसांनी आठ दिवसापूर्वीच तपासासाठी ताब्यात घेतले होते.

चंदनशिवे आणि केदार यांच्यात पैशांचे मोठे व्यवहार होते. या वादातून ही हत्या झाल्याचे पोलिसांना संशय होता. तपास पूर्ण झाल्यानंतर शनिवारी, 19 ऑगस्ट 2023 रोजी सुनील‌ केदार व विजय केदार या दोघांविरोधात खूनाचा गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलीस निरीक्षक आनंद कुलकर्णी यांनी दिली. या प्रकरणाचा तपास सांगोला पोलीस उपअधीक्षक विक्रांत गायकवाड (DySP Vikrant Gaikwad) करत आहेत.

एपीआय सुरज चंदनशिवे होते निलंबित

मीडिया रिपोर्ट नुसार, सांगोला खून प्रकरणातील मयत सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरज चंदनशिवे हे एलसीबीत कार्यरत होते. मिरज येथील एका प्रकरणात त्यांचे निलंबन झाले होते. मिरजेत गाजलेल्या नऊ कोटी रुपयांच्या अपहरामधील सुरज चंदनशिवे हे आरोपी होते. मिरजमध्ये चोराला हाताशी धरून नऊ कोटी 18 लाख रुपयांचा अपहार करण्यात आला होता.याप्रकरणी तात्कालीन पोलीस निरीक्षकासह सात पोलिसांवर कारवाई करून त्यांचे निलंबित करण्यात आले होते. सुरज चंदनशिवे हे या गुन्ह्यातील आरोपी होते. गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली होती. त्यांना जेलवारी देखील करावी लागली. जामिनावर बाहेर आल्यानंतर त्यांचे निलंबन रद्द करून त्यांची सांगली पोलीस मुख्यालयामध्ये नेमणूक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांची सांगलीतील विश्रामबाग पोलीस ठाण्यामध्ये बदली करण्यात आली होती. सुरज चंदनशिवे यांची कारकीर्द वादग्रस्त होती, अशी चर्चा स्थानिकांमध्ये आहे.