इतिहास लेखनात हरामखोरी करणारांचे बुरखे फाडणे ही काळाची गरज – इतिहासाचार्य अनंत दारवटकर

जामखेड टाइम्स वृत्तसेवा । सत्तार शेख । संभाजीराजांचा इतिहास लिहीताना ज्यांनी ज्यांनी हरामखोरी केली, त्यांची नावे मी माझ्या पुस्तकात जाहीरपणे लिहीली. त्यांनी लिहलेल्या खोट्या इतिहासाचा बुरखा फाडला. संभाजी महाराजांविषयी करण्यात आलेले अनेक दावे पुराव्यानिशी खोडून काढले. आपल्या पूर्वजांनी जो इतिहास घडवला आहे त्याचा अभिमान प्रत्येक बहुजनाला असला पाहिजे, परंतू खरा इतिहास समजणे आवश्यक आहे. यासाठी इतिहास संशोधनाची आवश्यकता आहे. तरुणांनी इतिहासातून नवी ऊर्जा घेऊन इतिहास निर्माण करणे आवश्यक आहे, असे सांगत इतिहास लेखनात हरामखोरी करणारांचे बुरखे फाडणे ही काळाची गरज असल्याचे रोखठोक मत इतिहासाचार्य अनंत दारवटकर यांनी जामखेड तालुक्यातील जवळा येथे बोलताना व्यक्त केले.

Tearing off the veils of those who write false history is the need of the hour - Historian Anant Darwatkar

छत्रपती संभाजी महाराजांच्या मातोश्री राजमाता सईबाईसाहेब भोसले यांच्या स्मृती दिनानिमित्त जामखेड तालुक्यातील जवळा येथे रविवारी शिवस्फुर्ती समुह आणि छत्रपती संभाजी महाराज सेवा समिती यांच्या वतीने इतिहास अभ्यास शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. स्वराज्य रक्षक संभाजी महाराज हा या शिबिराचा विषय होता. या शिबिरातून इतिहासाचार्य अनंत दारवटकर यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयीचा खरा इतिहास उलगडून दाखवला.

Tearing off the veils of those who write false history is the need of the hour - Historian Anant Darwatkar

संपुर्ण सत्रात छत्रपती संभाजी महाराजांचा जिवंत इतिहास दारवटकर यांनी साक्षात उभा केला. अंगावर रोमांच आणणारे प्रसंग त्यांनी सांगितले. त्यांनी सांगितलेल्या इतिहासातून नवा दृष्टिकोन उपस्थितांना मिळाला. गडकिल्ले अभ्यासक संदिप कदम सर यांनीही प्रेरणादायी मार्गदर्शन केले. शिवस्फुर्ती समुहाचे कार्याध्यक्ष अशोक पठाडे यांनी प्रास्ताविक करत इतिहास अभ्यास शिबिराचे महत्व विशद केले.

Tearing off the veils of those who write false history is the need of the hour - Historian Anant Darwatkar

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ नेते मधुकर (आबा) राळेभात हे होते. यावेळी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष शहाजी राजेभोसले, ज्योती क्रांती मल्टीस्टेटचे चेअरमन अजिनाथ हजारे, स्वाभिमानीचे तालुकाध्यक्ष मंगेश आजबे, माजी उपसभापती दिपक पाटील, प्राचार्य विकी घायतडक, युवा उद्योजक अप्पासाहेब हारगुडे, मावळा युवा संघाच्या संस्थापक अध्यक्षा रुपालीताई पाटील, छत्रपती संभाजी महाराज सेवा समितीचे अध्यक्ष शंकर (आप्पा) जाधव, व्याख्याते गणेश भोसले, युवा नेते युवराज देवकर, संभाजी ब्रिगेडचे नितिन खटके, अमित जाधव, आशिष पाटील, माजी सरपंच प्रदिप दळवी, सामाजिक कार्यकर्ते मिलिंद आव्हाड, करमाळ्याचे संजय गुटाळ, माजी सरपंच भारत काकडे, विद्यमान सरपंच दिलीप काकडे, चेअरमन जालिंदर चव्हाण, सरपंच प्रविण पोते, सरपंच सुशेन ढवळे, माजी सरपंच कांतीलाल वाळुंजकर, महेश टेकाळे, भाऊ मुरूमकर ज्ञानदेव ढवळे, नंदकिशोर खरात,संदिप सोनवणे, हनुमंत उदमले, सोनू बळे, संतोष मोरे हे उपस्थित होेते.

Tearing off the veils of those who write false history is the need of the hour - Historian Anant Darwatkar

इतिहास अभ्यास शिबिर यशस्वी करण्यासाठी शिवस्फूर्ती समूहाचे विवेक मोरे, राहूल साबळे, स्वानंद घरत, अनंत शेवाळे, रामेश्वर नाईकवाडे, अक्षय तळेकर, महेश दैन, महादेव वराट सर, जीवन होगले, तानाजी भांडवलकर, बाबुराव टेकाळे तसेच छत्रपती संभाजी महाराज सेवा समितीचे प्रेमराज मोहिते, आकाश शिंदे, राहूल मुरूमकर, विकास वाळुंजकर, ऋषिकेश आव्हाड, पप्पू मते, संदिप काढणे, तुषार काढणे, विनोद वाळुंजकर, अक्षय शिंगटे, संस्कार लेकुरवाळे, ओंकार मासाळकर यांनी विशेष परिश्रम घेतले.

Tearing off the veils of those who write false history is the need of the hour - Historian Anant Darwatkar

तर छत्रपती शिवाजी विद्यालयाच्या ज्युनिअर कॉलेजचे भंडारे सर, मिसाळ सर, अवसरे सर, नलवडे सर, सरोदे सर व वाळुंजकर तात्या यांचे विशेष सहकार्य लाभले. या शिबिरासाठी अहमदनगर, धाराशिव, बीड, सोलापूर व पुणे येथील मावळ्यांनी उपस्थिती लावली.या शिबिरासाठी महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश ठोसर यांनी केले.

Tearing off the veils of those who write false history is the need of the hour - Historian Anant Darwatkar