Vandana Dwivedi Pune : साॅफ्टवेअर इंजिनियर वंदना द्विवेदीचा मारेकरी पोलिसांच्या ताब्यात, प्रियकर निघाला वंदनाचा मारेकरी, खुनाचे कारण काय ? जाणून घ्या सविस्तर !
पिंपरी चिंचवड : Vandana Dwivedi Pune : साॅफ्टवेअर इंजिनियर असलेल्या वंदना द्विवेदी (Vandana Dwivedi) या तरूणीच्या हत्याकांडाने हिंजवडी आयटी पार्क परिसर रविवारी हादरून गेला.प्रेमसंबंधातून प्रियकराने तिची पाच गोळ्या घालून हत्या (Murder) केली. हिंजवडी (Hinjawadi) येथील लक्ष्मी चौकातील मारुंजी रस्त्यावरील हॉटेल एलिगंन्ट ओयो टाउनहाऊसमध्ये (Hotel Elegant Oyo Townhouse) शनिवारी हत्येचा थरार रंगला. या घटनेत वंदना द्विवेदी या तरूणीचा मृत्यू झाला आहे. ही घटना रविवारी (दि.२८) सकाळी आठच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेमुळे हिंजवडी आयटी पार्क (Hinjawadi IT Park) परिसरात एकच खळबळ उडाली.
हिंजवडी हत्याकांड प्रकरणातील मयत वंदना द्विवेदी ही २०२२ मध्ये हिंजवडी येथे नोकरीनिमित्त आली. ती हिंजवडीतील एका आयटी कंपनीत साॅफ्टवेअर इंजिनियर (Software Engineer Merder Case Pune) म्हणून नोकरीला होती. वंदना हिच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी ऋषभ निगम या तरूणाला ताब्यात घेतले आहे. मयत वंदना के. द्विवेदी (२६, सध्या रा. हिंजवडी, मूळ रा. लखनऊ, उत्तर प्रदेश) (Vandana Dwivedi Lucknow) व आरोपी ऋषभ राजेश निगम (रा. लखनऊ, उत्तर प्रदेश) (Rishabh rajesh nigam) या दोघांचे घर लखनऊ येथे एकाच परिसरात आहे. त्यामुळे त्यांची जुनी ओळख होती. मागील काही वर्षांपासून त्यांच्यात प्रेमसंबंध होते.
दरम्यान, ऋषभ हा गुरुवारी (दि. २५) लॉजमध्ये गेला. तर वंदना ही शुक्रवारी (दि. २६) लाॅजमध्ये गेली. तेथे शनिवारी (दि. २७) रात्री पावणेदहाच्या सुमारास ऋषभ याने वंदना हिच्यावर गोळ्या झाडल्या. यामध्ये तिचा मृत्यू झाला. हल्ल्यानंतर ऋषभ पळून गेला. घटनेची माहिती मिळताच हिंजवडी पोलिसांसह गुन्हे शाखेचे पोलिस घटनास्थळी दाखल झाले. हाॅटेलच्या व्यवस्थापकाकडे असलेल्या मास्टर चावीने पोलिसांनी खोलीचे कुलूप उघडले. त्यावेळी वंदनाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडला होता.
वंदना हिचा खून केल्यानंतर ऋषभ शनिवारी रात्री दहाच्या सुमारास लाॅजमधून बाहेर पडला. त्यानंतर त्याने मुंबई गाठली. त्याने गोळीबार करून खून केल्याची माहिती मुंबई पोलिसांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पळून जाणाऱ्या ऋषभ याला ताब्यात घेतले. दरम्यान, ऋषभ याला ताब्यात घेण्यासाठी हिंजवडी पोलिसांचे पथक मुंबई येथे रवाना झाले. ऋषभ याला पोलिसांनी ताब्यात घेतले.
ऋषभ याने वंदना हिच्यावर पाच गोळ्या झाडल्याचे सांगितले जात आहे. गोळीबार केल्यानंतर ऋषभ अतिशय शांतपणे लाॅजच्या खोलीमधून निघून जात असल्याचे सीसीटीव्हीत कैद झाले. मात्र, पाच गोळ्या झाडूनही लॉजमध्ये कोणालाही खबर लागली नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
ऋषभ आणि वंदना यांची लखनऊ येथे ओळख झाली होती. ऋषभ हा लखनऊ येथील रहिवासी आहे. दरम्यान, २५ जानेवारी रोजी रात्री पावणे दहाच्या सुमारास त्यांनी लक्ष्मी चौक, मारुंजी येथील लॉजमध्ये रूम घेतली होती. त्यांच्यात काही कारणामुळे वाद सुरू असल्याची प्राथमिक माहिती आहे.
ऋषभ निगम याला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडे कसून चौकशी केली. त्यावेळी त्याने वंदना हिचा खून केल्याचे सांगितले. याबाबत मुंबई पोलिसांनी पिंपरी-चिंचवड पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर हिंजवडी पोलिसांनी लागलीच घटनास्थळी धाव घेतली.
हिंजवडी पोलिसांनी वंदनाच्या कुटुंबियांना घटनेबाबत माहिती दिली. तसेच वंदना आणि ऋषभ यांच्यातील संबंधांबाबत विचारणा केली. मात्र, कुटुूंबियांनी अद्याप काहीही सांगितले नसल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच ऋषभ याने गुन्ह्याची कबुली दिली असली तरी खून का केला, याबाबत त्याने काहीही सांगितलेले नाही. त्यामुळे खुनाचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.