Vanraj Andekar Murder Case Latest News : एक फोन अन् खेळ ‘खल्लास’, वनराज आंदेकरच्या हत्येचा कट कसा शिजला ?  जाणून घ्या सविस्तर

Vanraj Andekar Murder Case Latest News  : वनराज आंदेकर हत्या प्रकरणात एक नवीन माहिती समोर आली आहे.नगरसेवक वनराज आंदेकर यांचा गेम हा एक फोन अन् खेळ ‘खल्लास’ अशा रितीने झाल्याची बाब पोलीस तपासातून समोर आली आहे. केवळ एक फोन झाल्यानंतर दोन दिवसांतच वनराज आंदेकर यांची हत्या करण्यात आली आहे.या खून प्रकरणात कौटुंबिक वाद, संपत्ती तसेच टोळी युद्ध अशा गोष्टींचा संबंध असल्याचे पोलिस तपासात समोर आली आहे. दरम्यान या हत्येचा कट कसा शिजला हे आता समोर आले आहे.

Vanraj Andekar Murder Case Latest News, one phone call and game Khallas, how was the conspiracy of Vanraj Andekar's murder hatched?  Know in detail,

सोमनाथ गायकवाड शनिवारी (दि. 1) नाशिकहून पुण्यात आला होता. प्रकाश कोमकर याने सोमनाथला फोन करून आंदेकर टोळीबाबत संताप व्यक्त केला. निखिल आखाडेच्या खुनाचा बदला सोमनाथच्या डोक्यात थैमान घालत होता.शिवाय त्याला देखील आंदेकर टोळीकडून आपला गेम होण्याची भीती होतीच. त्याने क्षणाचाही विलंब न करता अनिकेत दुधभातेला फोन करून वनराज यांचा काटा काढण्यास सांगितले. त्यानुसार सोमनाथच्या टोळीने वनराज यांचा रविवारी रात्री नाना पेठ परिसरात खून केल्याची माहिती पोलिसांनी दिली. सध्या या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे.

मंगळवारी (दि. 3) सायंकाळी भारती विद्यापीठ पोलिसांनी रायगड जिल्ह्यातील माणगाव एमआयडीसी परिसरातून तेरा जणांना ताब्यात घेतले. त्यामध्ये तिघा अल्पवयीन मुलांचा सहभाग आहे. अनिकेत ज्ञानेश्वर दुधभाते (वय 31), तुषार अंकुश कदम (वय 30), दीपक किसन तोरमकर (वय 29), आकाश बापू म्हस्के (वय 24), विवेक प्रल्हाद कदम (वय 25), उमेश नंदू किरवे (वय 26), ओम धनंजय देशखैरे (वय 20), अजिंक्य गजेंद्र सुरवसे (वय 19, रा. सर्व आंबेगाव पठार), समीर किसन काळे (वय 26, रा. येवलेवाडी), साहिल बबन केंदळे (वय 20, दत्तनगर, पुणे) यांना अटक करण्यात आली.यातील काही आरोपींचा गुन्हेगारी रेकॉर्ड आहे. बुधवारी (दि. 4) आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असता 12 सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी याबाबत बोलताना सांगितले की, वनराज आंदेकर यांच्या खुनात सोमनाथ गायकवाड, प्रकाश कोमकर आणि अनिकेत दुधभाते या तिघांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.कोमकर कुटुंबीय यांच्यासोबतचा मालमत्तेचा वाद, तर सोमनाथ याच्यासोबत आंदेकर टोळीचे पूर्ववैमनस्य वनराज यांच्या खुनासाठी कारणीभूत ठरल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. असे असले तरी सर्व शक्यता गृहीत धरून पोलिस तपास करीत आहेत.

पिस्तूल खरेदीसाठी सोमनाथची फिल्डिंग

आरोपींनी वनराज यांचा खून करण्यासाठी तीन पिस्तुलांतून गोळीबार केल्याचे पोलिसांच्या आत्ता पर्यंतच्या तपासात पुढे आले आहे. ही पिस्तुले एक वर्षापूर्वी आरोपींनी मध्य प्रदेशातून आणली होती. त्यासाठी लागणारे पैसे सोमनाथ यानेच पुरविले होते. – अमितेश कुमार, पोलिस आयुक्त, पुणे शहर

प्रकाश कोमकर, सोमनाथ गायकवाड, अनिकेत दुधभाते हे तिघे वनराज आंदेकर खून प्रकरणातील प्रमुख सूत्रधार असल्याचे तपासात पुढे आले आहे. मालमत्तेचा वाद, पूर्ववैमनस्य हे खुनाचे कारण आहे. आत्तापर्यंत पंधरा जणांना अटक करण्यात आली असून, तिघा अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे. पुढील तपास सुरू आहे.

अनिकेतकडून परिसरात रेकी

सोमनाथचा फोन झाल्यानंतर अनिकेतने रविवारी सकाळी नाना पेठ परिसरात येऊन रेकी केली होती. मात्र, असे असले तरी त्यांनी खरेदी केलेल्या पिस्तुलांचा कालावधी पाहता वनराज यांच्या खुनाची पूर्वीपासूनच तयारी केल्याचे दिसून येते. दीड महिन्यापासून त्यांनी ही तयारी केल्याचा संशय पोलिसांना आहे. पोलिस त्याचा तपास करीत आहेत.

वनराज आंदेकरांवर प्रत्यक्ष हल्ला करणारे सर्व आरोपी हे आंबेगाव पठार भागातील आहेत. यात ५ आरोपी पोलिसांच्या रेकॉर्डवर असलेले आहेत. ते सोमनाथ गायकवाड याच्याशी निगडीत आहेत. तत्पुर्वी सोमनाथला आंदेकर टोळीपासून धोका होता. त्याची भिती त्याच्या मनात होती. त्यात गेल्या वर्षी निखील आखाडे याचा झालेला खून, यामुळे बदलाची भावना होतीच, त्यातून हा खून सोमनाथ व त्याच्या टोळीने केल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे, सोमनाथ कारागृहातून बाहेर आल्यानंतर तो काय करतो शहरातच राहतो का, तो कधी येतो काय करतो, याचा कसलाच थांगपत्ता नव्हता.

सोमनाथ जेलमधून बाहेर आला आणि त्याने वनराजचा गेम वाजवला

मोक्का कायद्यात जामीनावर बाहेर आलेल्या सोमनाथला प्रकाश कोमकर जो वनराजची बहिण संजीवनीचा दिर आहे, त्याने फोन केला. तसेच आंदेकर टोळीबाबत संताप व्यक्त केला. लागलीच सोमनाथने अनिकेत दुधभातेला फोनकरून आणलेले पिस्तूल कुठे आहेत, अशी विचारणा केली. ते पिस्तूल व्यवस्थित असल्याचे सांगितल्यानंतर सोमनाथने पुन्हा अनिकेतला विचारले पिस्तूल यापुर्वी चालवले आहे का, त्यावर अनिकतने नाही असे उत्तर दिले. त्यानंतर सोमनाथने पिस्तूलांसोबत हत्यारे देखील सोबत ठेवा. आपल्याला गेम वाजवायचा आहे, अशी माहिती दिली.

लागलीच अनिकेतने इतर आरोपींची जुळवा-जु‌ळव केली. दुसऱ्यादिवशी अनिकेतने नाना पेठेतील उदयकांत आंदेकर चौकात येऊन पाहणी केली. दिवसभरात वनराजबाबत माहिती जमवली. त्याचदिवशी रात्री आरोपी एकत्र जमले आणि नंतर ते सातारा रस्त्यावरील मार्केटयार्ड भागात थांबले. त्याठिकाणी एकत्रित जमवून काही वेळ घालवला. वनराज चौकात आल्याची कुणकूण लागलाच ते दुचाकीने नाना पेठेत आले. त्यांनी येताच वनराज याच्यावर गोळ्या झाडत कोयत्याने सपासप वारकरून त्यांची हत्या करण्यात आल्याचे असल्याचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.

अन्यथा आणखीच गोळ्यांचे बार उडाले असते…

आकाश म्हस्के तसेच कदम व सॅम काळे यांच्याकडे पिस्तूल होते. त्यांनी गोळ्या झाडल्याचे समोर आले आहे. परंतु, म्हस्के याने पहिली गोळी झाडली. तर कदमचे पिस्तूल चालले नाही, ते लॉक झाले आणि सॅम काळे याच्या पिस्तूलातून मिस फायर झाल्याने गोळ्या झाडल्या गेल्या नाहीत. इतर आरोपींच्या हातात कोयते होते, गोळीबार होताच आरोपींनी कोयत्याने हल्ला केला. डोके व इतर ठिकाणी कोयत्याने वार केल्याने गंभीर जखमी वनराज यांचा मृत्यू झाला. अनिकेत दुधभाते व इतरांनी कोयत्याने वार केले, अशी माहिती माहिती पोलिस तपासात समोर आली आहे.