वनराज आंदेकर हत्याकांड प्रकरण : 13 जणांना पुणे पोलिसांनी केली अटक, सोमनाथ गायकवाड हाच हल्ल्याचा सुत्रधार ? पुणे पोलिसांना संशय !
Vanraj andekar murder case pune : पुण्यात रविवारी रात्री राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांचा निर्घृण खून करण्यात आल्याची घटना घडली होती. या खून प्रकरणात सहभागी 13 आरोपींना अटक करण्याची धडक कारवाई पुणे पोलिसांनी केली आहे. पुणे पोलिसांनी ताम्हिणी घाटातून आंदेकर (andekar) खून प्रकरणातील आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार हा सोमनाथ गायकवाड असल्याचा पुणे पोलिसांना संशय आहे (Vanraj Andekar, Somnath Gaikwad)
माजी नगरसेवक वनराज आंदेकर हे नाना पेठेतील आंदेकर चौकात आपल्या चुलत भावासोबत गप्पा मारत थांबले असताना त्यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. रविवारी रात्री ही घटना घडली होती. यावेळी सहा दुचाकीवरून आलेल्या 13 जणांनी वनराज आंदेकर यांना घेरलं आणि त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. यात त्यांचा मृत्यू केला. हा सर्व थरार जवळच असलेल्या एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला होता.
वनराज आंदेकर यांच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार कौटुंबिक वादातून खून झाल्याची शक्यता दिसत आहे. मात्र, यामागे टोळी वर्चस्वही असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. यातील एक आरोपी सोमनाथ सयाजी गायकवाड हा आंदेकर टोळीचा प्रतिस्पर्धी आहे. त्याची स्वत:ची टोळी असून, तो मोक्कातून जामिनावर बाहेर पडला आहे. स्वतः सोमनाथ आणि टोळीतील काही सदस्य आंदेकर टोळीच्या रडारवर होते.
पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात घडलेल्या या घटनेनंतर एकच खळबळ उडाली. नाना पेठेसारखा गजबजलेला भागात रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. एरवी मित्रांच्या गराड्यात असणारा वनराज रविवारी मात्र चुलत भावासोबत थांबला होता. जवळच त्याचं घर होतं. आणि घरापासून चालत चालत तो मुख्य रस्त्या लागत असणाऱ्या चौकात आला होता. हल्लेखोर त्याची वाट पाहत दबा धरूनच बसले होते. मोकळ्या जागेत वनराज आंदेकर येताच ६ दुचाकी त्याच्या दिशेने धावल्या.
सुरुवातीला एकाने आंदेकरवर गोळ्या झाडल्या. एकापाठोपाठ एक अशा पाच गोळ्या त्याच्यावर झाडल्या. अचानक झालेल्या हल्ल्याने वनराज आंदेकर गडबडला. त्याने पळून जाण्याचाही प्रयत्न केला. त्यानंतर हल्लेखोरांनी त्याच्यावर कोयत्यानेही वार केले. रक्ताच्या थारोळ्यात त्याला पडलेले पाहून नंतर मारेकर्यांनी पळ काढला. रात्री उशिरापर्यंत पोलिसांनी जयंत लक्ष्मण कोमकर आणि गणेश लक्ष्मण कोमकर या दोघांना अटक केली होती.
मात्र समोर आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात तब्बल 13 जण या संपूर्ण कटात सहभागी असल्याचे प्रथमदर्शनी समोर आले होते. कौटुंबिक कारणावरून हा हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या प्रकरणातील १३ आरोपींना पुणे पोलिसांनी ताम्हिणी घाटातून अटक केली आहे. पोलिसांनी सोमवारी या खूनप्रकरणी प्रकाश कोमकर, सोमनाथ गायकवाड आणि संजीवनी जयंत कोमकर यांना अटक केली होती. आता १३ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
वनराज आंदेकर याचा खून कौटुंबिक कारणांनी आणि संपत्तीच्या वादातून झाला असल्याच्या संशयावरुन पोलिसांनी तपास सुरु केला आहे. पोलिसांनी या प्रकरणात आतापर्यंत संजीवनी कोमकर, प्रकाश कोमकर, जयंत कोमकर यांना अटक केली आहे. याशिवाय सोमनाथ गायकवाडला देखील अटक करण्यात आली आहे.
पोलिसांना सोमनाथ गायकवाडवर संशय का?
वनराज आंदेकर खून प्रकरणाचा मुख्य सूत्रधार सोमनाथ गायकवाड असल्याचा पोलिसांना संशय आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात नाना पेठेत आरोपी गायकवाडचा साथीदार निखिल आखाडे आणि शुभम दहिभाते यांच्यावर कोयता आणि स्कू-ड्रायव्हरने वार करण्यात आले होते. या हल्ल्यात निखिलचा मृत्यू झाला होता.त्याचा बदला घेण्यासाठी सोमनाथ गायकवाड याने संजीवनी कोमकर, जयंत कोमकर, प्रकाश कोमकर आणि गणेश कोमकर यांच्याशी संगनमत करून वनराज यांच्या खुनाचा कट रचल्याची माहिती तपासात समोर आली आहे. पोलिसांनी शहरातून पाच जणांना अटक केली होती. तर, रायगड जिल्ह्यातून अन्य १३ संशयितांना अटक केली आहे.
वनराज आंदेकर खून प्रकरणानं खळबळ
वनराज आंदेकरचा खून त्याच्या बहिणींच्या इशाऱ्यावरुन करण्यात आल्याचं स्पष्ट झालं आहे. दुकानांचं अतिक्रमण काढायला लावल्याच्या रागातून वनराज आंदेकरचा खून झाल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. रविवारी वनराज आंदेकरचा खून झाला होता. या प्रकरणात टोळी युद्धाचा अँगल आहे का यादृष्टीनं पोलिसांनी तपास सुरु ठेवला होता. आंदेकर खून प्रकरणातील पसार झालेल्या हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची २० पथके पाठविण्यात आल्याची माहिती पोलिस सहआयुक्त यांनी दिली होती.
रविवारी रात्री 1 सप्टेंबरला रात्री साडेनऊ वाजता दोन जण नाना पेठेतील परिसरात उभे होते. यावेळी काही अज्ञातांनी त्यांच्यावर गोळीबार केला, त्यात वनराज आंदेकर यांचा मृत्यू झाला. वनराज आंदेकर यांच्यावर पाच राऊंड फायर करण्यात आले आणि तीक्ष्ण हत्याराने त्यांच्यावर वार करण्यात आले आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला.
- रविवारी रात्री पुण्यात माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांचा खून झाला.
- नाना पेठेतील आंदेकर चौकात चुलत भावासोबत असताना त्यांच्यावर हल्ला झाला.
- सहा दुचाकीवरून आलेल्या १३ जणांनी आंदेकर यांच्यावर प्राणघातक हल्ला केला.
- हल्ल्यादरम्यान आंदेकर यांच्यावर गोळ्या झाडल्या आणि कोयत्याने वार केले.
- हल्लेखोरांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील फुटेजमध्ये कैद झाल्यामुळे तपास सुरू करण्यात आला.
- या हल्ल्यामागे कौटुंबिक वाद असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
- सोमनाथ गायकवाड हाच हल्ल्याचा सुत्रधार ? पुणे पोलिसांना संशय !
- आरोपी सोमनाथ सयाजी गायकवाड हा आंदेकर टोळीचा प्रतिस्पर्धी होता.
- हल्ल्यानंतर शहरात खळबळ उडाली असून, पोलिसांनी तपास वेगाने सुरू केला आहे.
- पोलिसांनी घटनास्थळावरून पळ काढलेल्या १३ आरोपींना ताम्हिणी घाटातून अटक केली.