Vijay Shivtare : अखेर ठरलं विजय शिवतारेंनी केली मोठी घोषणा, बारामती लोकसभा लढणार का ? यावर विजय शिवतारे म्हणाले १२ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजता
Vijay Shivtare Baramati Loksabha Matdar sangh : शरद पवारांचा (Sharad Pawar) बारामतीचा गड उध्वस्त करण्यासाठी भाजपने (BJP) अजित पवारांच्या साथीने मोर्चे बांधणी हाती घेतलेली असतानाच पुरंदरचे माजी आमदार विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी कंबर कसल्याने महायुतीचे टेन्शन वाढले आहे. बारामतीत नणंद विरुद्ध भावजय असा सामना रंगणार असे वाटत असतानाच माजी आमदार विजय शिवतारे यांनी अजित पवारांविरोधात (Ajit Pawar) दंड थोपटत लोकसभेचे रणशिंग फुंकले आहे. शिवतारे यांनी रविवारी याबाबत मोठी घोषणा केली आहे. (Vijay Shivtare latest news today)
मी लढतोय ते जिंकण्यासाठीच. ही लढाई खूप मोठी आहे. सत्तर वर्षांत यांनी घुसखोरीच केली. पवारांनी ग्रामीण टेररिझम केला आहे. मी पवारांचा ग्रामीण दहशतवाद मोडून टाकणार आहे. माझ्या माणसांना त्रास दिला जात आहे. अजित पवार यांनी खूप पापं केली आहेत, अशी आरोपांची मालिकाच विजय शिवतारे यांनी केली आहे.
विजय शिवतारे यांनी बारामती लोकसभा निवडणूक लढविण्याचा निर्णय घेऊन महायुतीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची चांगलीच अडचण केली आहे. एकनाथ शिंदे यांनी त्यांची समजूत घालूनही ते ऐकायला तयार नाहीत. वेळ पडली तर आपण अपक्ष निवडणूक लढवून अशी गर्जना विजय शिवतारे यांनी केली होती. अजित पवार आणि शरद पवार यांना माहीती आहे मी कोण आहे. ईस्ट इंडिया कंपनी गेली नंतर शरद पवार कंपनी आली, शरद पवार आणि अजित पवार म्हणजे एक राक्षस आणि दुसरा ब्रम्हराक्षस आहे. दोघांचा खात्मा करायचा असे विजय शिवतारे यांनी म्हटले आहे. बारामतीतील लढत ही केवळ विजय शिवतारे आणि सुप्रिया सुळे यांच्यात होईल असेही विजय शिवतारे यांनी म्हटले आहे. (Vijay Shivtare news today)
पवारांना बाजार दाखविण्याची वेळ
आपल्या विरोधात आरोप केले जात आहेत. राष्ट्रवादीकडून गैरसमज पसरवले जात आहेत. मी शरद पवारांचा माणूस असल्याचे सांगितले जात आहे. सुनील तटकरे म्हणतात की शिवतारेंची स्क्रिप्ट कोण लिहून देते ते माहीती आहे. असा नालायकपणा मी कधीच करणार नाही. मी लढतोय ते जिंकण्यासाठी. लढाई पवारांच्या विरोधात आहे. अजित पवार यांनी गोळीबार केला, शेतकऱ्यांना गोळ्या घातल्या. तेव्हा तुम्ही गप्प राहिलात. पवारांनी प्रचंड अन्याय केले आहेत. कपट कारस्थानी पवारांनी अनेकांना संपवलं आहे. आता यांना बाजार दाखवण्याची वेळ आली आहे असे विजय शिवतारे यांनी म्हटले आहे. (Vijay Shivtare news)
बारामती लोकसभा मतदारसंघाबाबत शिवसेना नेते विजय शिवतारे यांनी आपली भूमिका जाहीर केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत दोन वेळा झालेल्या बैठकीनंतर विजय शिवतारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात वेगळी भूमिका रविवारी मांडली. विजय शिवतारे यांनी बारामतीमध्ये अपक्ष निवडणूक लढवण्याची घोषणा जाहीर केली आहे. १२ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजता आपण लोकसभेचा अपक्ष अर्ज भरणार असल्याचे विजय शिवतारे यांनी माध्यमांशी बोलताना जाहीर केले. यामुळे बारामतीमध्ये तिरंगी लढत होणार आहे. सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार यांच्या लढाईत आता विजय शिवतारे आले आहेत. (Vijay Shivtare news today)
विजय शिवतारे यांनी रविवारी कार्यकर्त्यांच्या बैठकीनंतर लोकसभा लढवण्याचा निर्णय जाहीर केला. यावेळी त्यांनी अजित पवार आणि शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली. त्यांनी सांगितले की, आज संपूर्ण 6 विधानसभा मतदार संघातील सर्वांना बोलावले होते. सर्व प्रमुख नेत्यांची बैठक आज पार पडली. मी 2008 साली मुंबईवरुन पुरंदरला आलो. मी आमदारकी लढण्यासाठी इथं आलो. तेव्हा सर्व तरुणांनी माझी निवडणूक हातात घेतली होती. आताही तरुणांनी हि निवडणूक हातात घ्यावी आणि पवारांना त्यांची जागा दाखवून द्यावी असे आवाहन शिवतारे यांनी केले. (Vijay Shivtare news today)
पवाररुपी हुकुमशाही संपवण्यासाठी माझे धर्मयुद्ध – विजय शिवतारे
लोकसभेसाठी आता लोक सांगत आहेत की माघार घेऊ नका. लोक मला कानात सांगतात ही त्यांची भीती आहे. यामुळे आता पर्याय हवा आहे. मतदार संघातून पवार रुपी हुकुमशाही संपवण्यासाठी आता माझे धर्मयुद्ध आहे. मोठे मोठे राजकीय पुढारी सांगत होते की मी काय करणार आहे. पण मी आमदार झालो तेव्हा 25 हजार मतांनी मी जिंकलो. सगळ्या लोकांनी माझ्यावर विश्वास दाखवला. (Vijay Shivtare news today)
१ एप्रिल रोजी सभा
विजय शिवतारे यांनी सांगितले की, जाहीरपणे नाही तर मनातून सर्व पक्षीय नेते माझ्यासोबत आहेत, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनाही सांगतो की त्यांनी मला आशीर्वाद द्यावेत. अनेक लोक माझ्या संपर्कात आहेत. राष्ट्रवादीचे लोक देखील माझ्या समोर आहे. अजित पवार यांचे राजकारण स्वार्थाचे आहे. आता 1 तारखेला सभा घेणार आहे. माझी लढाई म्हणजे जन सामन्यांची लढाई आहे. यामुळे या सभेला 50 ते 60 हजार लोकांची उपस्थिती असणार आहे. त्यानंतर सगळ्या विधानसभा मतदार संघात सभा घेणार आहे. 12 तारखेला 12 वाजता मी फॉर्म भरणार आहे. अशी घोषणा यावेळी विजय शिवतारे यांनी यावेळी बोलताना केली. (Vijay Shivtare news today)