Voter lists released | नव्या वर्षांत जामखेडच्या राजकीय मैदानात उडणार सेवा संस्थांच्या निवडणुकांचा बार : हळगावसह 07 सेवा संस्थांच्या मतदारयाद्या जाहीर !

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : अगामी जिल्हा परिषद पंचायत निवडणुकांची रणधुमाळी सुरू होण्याआधी नव्या वर्षांत जामखेडच्या राजकीय मैदानात सेवा संस्थांच्या निवडणुकांचा बार उडणार आहे. काही संस्थांच्या मतदारयाद्या (Voter lists released) प्रशासनाने जाहीर करताच राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत.

जामखेड तालुक्यातील हाळगाव, कुसडगाव, वंजारवाडी – तरडगाव, रत्नापूर, झिक्री, कवडगाव आणि नान्नज या सात सेवा संस्थांच्या निवडणुकांसाठी मतदारयाद्या प्रसिद्ध (Voter lists released) करण्यात आल्या आहेत, यावर प्रशासनाने हरकती मागविल्या आहेत.

जामखेड तालुक्यात पहिल्या टप्प्यातील रत्नापूर, झिक्री, कवडगाव या तीन विविध कार्यकारी सेवा संस्थांच्या निवडणुकांसाठी मतदारयाद्या गेल्या ९ डिसेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. या मतदारयाद्यांवर हरकती नोंदविण्यासाठी २० डिसेंबर २०२१ पर्यंत कालावधी देण्यात आला आहे. या हरकतीवर ३० डिसेंबर २०२१ रोजी निर्णय घेण्यात येईल. अंतिम मतदारयाद्या ४ जानेवारी २०२२ प्रसिद्ध होणार आहे.

जामखेड तालुक्यातील नान्नज, हाळगाव, कुसडगाव, वंजारवाडी- तरडगाव या चारही विविध कार्यकारी सेवा संस्थांच्या निवडणुकांसाठी १७ डिसेंबरला मतदारयाद्या प्रसिद्ध (Voter lists released) केल्या आहेत. या मतदारयाद्यांवर हरकती नोंदविण्यासाठी २७ डिसेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे.

हरकतींवर ६ जानेवारी २०२२ रोजी निर्णय होणार आहे.अंतिममतदारयाद्या ११ जानेवारी २०२२ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. मतदारयाद्यांमध्ये आपले नाव आहे की नाही? हे पाहण्यासाठी गावपुढावार्‍यांसह सभासदांची मोठी धावपळ सुरू झाली आहे.

निबंधक कार्यालयाने प्रसिध्द केलेल्या मतदारयाद्यांवर हरकती घ्यावयाच्या असल्यास जिल्हा उपनिबंधक यांच्या कार्यालयात समक्ष अथवा ई-मेल आयडीवर हरकती नोंदवू शकता अशी माहिती असे जामखेडचे सहाय्यक निबंधक देविदास घोडेचोर यांनी दिली.

सात सेवा संस्थांचे सभासद खालीलप्रमाणे

सोसायटी नाव एकुण सभासदपात्र सभासद
कवडगाव ४७४३७४
झिक्री २२० १६८
रत्नापूर ५०४२५४
वंजारवाडी - तरडगाव ६९१ ५३३
कुसडगाव ७९४ ६३३
हाळगाव १२६७९६५
नान्नज १९०० १५६९