गेल्या तीन वर्षांपासून बंद पडलेली तुकाई उपसा सिंचन योजना पुन्हा सुरू करण्यासाठी आम्ही येतोय… तुम्हीही या… आमदार प्रा राम शिंदे यांचे अवाहन
जामखेड टाइम्स वृत्तसेवा । सत्तार शेख। कर्जत तालुक्यातील 22 गावांसाठी महत्वपूर्ण असलेल्या तुकाई उपसा सिंचन योजनेचे काम गेल्या तीन वर्षांपासून बंद होते. सदर काम ठेवण्याचे पाप आमदार रोहित पवार आणि महाविकास आघाडी सरकारने केले, परंतू या योजनेसाठी आवश्यक असलेल्या सर्व परवानग्या मिळवल्या आहेत. सोमवारी 13 फेब्रुवारी 2023 रोजी या योजनेचे काम पुन्हा सुरु होणार आहे, त्यानिमित्त वालवड (ता.कर्जत) येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, या कार्यक्रमास लाभक्षेत्रातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे अवाहन आमदार प्रा राम शिंदे यांनी केले आहे.
कर्जत तालुक्यातील तालुक्यातील दुष्काळग्रस्त भागांसाठी वरदान ठरणारी तुकाई उपसा सिंचन योजना मंजुर व्हावी यासाठी आमदार प्रा राम शिंदे यांनी फडणवीस सरकारमध्ये मंत्री असताना आपली राजकीय प्रतिष्ठा पणाला लावत सदरची योजना मंजुर करून आणली होती. कोट्यावधी रूपये खर्चाच्या या योजनेचे काम गतीने सुरु झाले होते. सन 2018-19 मध्ये सदर योजनेचे काम 30% पुर्ण झाले होते.
मात्र, 2019 नंतर राज्यात सत्तांतर झाल्यानंतर या योजनेला तत्कालीन सरकारने स्थगिती आणली होती. आमदार रोहित पवार यांनी ही योजना पूर्णत्वास जाऊ नये यासाठी सरकार दरबारी आपले वजन वापरले होते. सन 2019 ते 2022 या काळात योजनेचे काम बंद होते. त्यामुळे गेल्या 25 ते 30 वर्षांपासून पाण्याच्या प्रतिक्षेत असलेल्या कर्जत तालुक्यातील 22 गावांमधील जनतेचे स्वप्न धुळीस मिळते की काय ? अशी परिस्थिती निर्माण झाली होती.
परंतू महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर राज्यात शिंदे-फडणवीस सरकार सत्तेवर आले. सरकार सत्तेत येत असतानाच आमदार प्रा राम शिंदे हेही विधानपरिषदेचे सदस्य बनले.आमदार होताच प्रा राम शिंदे यांनी मतदारसंघातील अपुर्ण योजना पुर्ण करण्यासाठी सरकार दरबारी जोरदार पाठपुरावा हाती घेतला. कर्जत तालुक्यातील जनतेच्या जिव्हाळ्याची तुकाई उपसा सिंचन योजना मार्गी लावण्यासाठी आमदार शिंदे यांनी सरकार दरबारी आपले राजकीय वजन वापरत या योजनेसाठी आवश्यक असलेल्या सर्व परवानग्या मिळवल्या. अखेर गेल्या तीन वर्षांपासून बंद असलेल्या तुकाई उपसा सिंचन योजनेचे काम सोमवार दि 13 फेब्रुवारी 2023 रोजी सुरु होणार आहे.
कर्जत तालुक्यातील वालवड येथे खासदार डॉ.सुजय विखे-पाटील आणि आमदार राम शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत 13 फेब्रुवारी 2023 रोजी दुपारी 1 वाजता होणाऱ्या कार्यक्रमासाठी लाभक्षेत्रातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे अवाहन करण्यात आले आहे.