When will schools in the state open? ! राज्यातील शाळा कधी उघडणार ? यावर आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले
जामखेड टाईम्स वृत्तसेवा : When will schools in the state open?| राज्यातील शाळा कधी उघडणार याकडे राज्यातील विद्यार्थ्यांचे व पालकांचे डोळे लागले आहे. शाळा उघडण्यासंदर्भात अनेक तारखा जाहीर झाल्या पण रूग्ण वाढू लागल्याने हे निर्णय फिरवण्यात आले.
तिसरी लाट राज्यात सक्रीय होऊ नये यासाठी सरकारकडून सावध पावलं टाकली जात आहेत.मात्र आता राज्यातील शाळा उघडण्याबाबत राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी निर्णय घेतला आहे. (Health Minister Rajesh Tope)
कोरोनामुळे सगळीकडे खळबळ माजवली आहे. सगळ्यांनाच अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. कोरोना काळात विद्यार्थांच्या शिक्षणावर खूप परिणाम झाला आहे.त्यामुळे आता विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा विचार करता शाळा, महाविद्यालय कधी सुरु होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे अश्यातच आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी पिंपरी चिंचवडमध्ये बोलताना महत्वाचं वक्तव्य केले आहे. ( When will schools in the state open? On this, Health Minister Rajesh Tope said )
पिंपरी चिंचवडमध्ये गुरुवारी झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं की, राज्यातील शाळा, महाविद्यालय कधी उघडणार याबाबत निर्णय येत्या चार-पाच दिवसांमध्ये घेतला जाईल. शिक्षण विभाग टास्क फोर्सच्या अहवालाची वाट पाहत आहे. हा अहवाल आल्यानंतर संबंधित विभागाकडून निर्णय घेतला जाईल. राजेश टोपे यांनी लसीकरणात येणाऱ्या अडचणींना केंद्र सरकारला जबाबदार धरलं आहे. (When will schools in the state open? )
दरम्यान, राजेश टोपे यांनी सप्टेंबरमध्ये येणाऱ्या तिसऱ्या संभाव्य लाटेचा इशाराही दिला आहे. यावेळी त्यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहनंही केलं आहे. राजकीय कार्यक्रम आणि इतर गोष्टींमुळे होणारी गर्दी टाळावी, असंही राजेश टोपे यांनी म्हटलं.
दरम्यान राज्यातील सर्व शाळा सुरु करण्याच्या हालचलाची जरी सरकारकडून चालू असल्या तरी, जोवर सरकार अंतिम निर्णय घेत नाही तोवर शाळा उघडण्याची प्रतिक्षा विद्यार्थ्यांना करावी लागणार आहे.