जामखेड टाइम्स वृत्तसेवा । बातमीसाठी पत्रकारांना सतत सजग रहावे लागते, रात्र असो किंवा दिवस असो पत्रकारांना पळावे लागते. वेळेची अन् आपल्या आयुष्याची चिंता न करता पत्रकारांना बातमीच्या शोधासाठी सतत धावपळ करावी लागते, हे कामं सोप्पं नाहीये, पत्रकारिता हा व्यवसाय प्रचंड अव्हानात्मक बनला आहे. अश्याही परिस्थितीत जामखेड तालुक्यातील पत्रकार आपली सेवा देत आहेत, खरोखर जामखेडमधील पत्रकारांचे कार्य कौतुकास्पद आहे, असे भाजपचे तालुकाध्यक्ष ॲड अजय (दादा) काशिद यावेळी बोलताना म्हणाले.
दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त राज्यभरात दरवर्षी 6 जानेवारी हा दिवस पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो, आज 6 जानेवारी 2023 रोजी ॲड अजयदादा काशिद मित्रमंडळाने आमदार प्रा राम शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपचे तालुकाध्यक्ष अजयदादा काशीद यांच्या निवासस्थानी पत्रकार सन्मान सोहळ्याचे आयोजन केले होते. यावेळी जामखेड तालुक्यातील 25 पेक्षा अधिक पत्रकारांचा पत्रकार दिनानिमित्त ॲड अजयदादा काशिद मित्रमंडळाच्या वतीने डायरी पेन भेट देत सन्मान करण्यात आला. तसेच सर्व पत्रकारांना स्नेहभोजन देण्यात आले.
यावेळी बोलताना उप महाराष्ट्र केसरी बबन (काका) काशिद म्हणाले की, सर्वसामान्य माणसांचे प्रश्न जामखेड तालुक्यातील पत्रकार नेहमीच आपल्या लेखणीच्या माध्यमांतून मांडत आले आहेत, जामखेडच्या विकासात पत्रकारांचे योगदान महत्वपूर्ण आहे. समाजाचा आरसा म्हणून काम करणाऱ्या पत्रकारांचा नेहमी सन्मान होणे आवश्यक आहे. ॲड अजय दादा काशिद मित्रमंडळाने पत्रकार दिनाचे औचित्य साधत जामखेड तालुक्यातील सर्व पत्रकारांचा केलेला सन्मान कौतुकास्पद आहे, असे यावेळी काशिद म्हणाले.
भाजपा तालुकाध्यक्ष ॲड अजय दादा काशिद यांच्या निवासस्थानी पार पडलेल्या पत्रकार सन्मान कार्यक्रमावेळी उपमहाराष्ट्र केसरी बबन काका काशिद आणि अजय दादा काशिद यांच्या हस्ते सत्तार शेख, दत्तात्रय राऊत, किरण रेडे, अविनाश बोधले, अशोक वीर,पप्पुभाई सय्यद, धनराज पवार, अजय अवसरे, रोहित राजगुरू, डाॅ प्रकाश खंडागळे, ओंकार दळवी, लियाकत शेख, समीर शेख, नासीर पठाण, मिठूलाल नवलाखा, मोहिद्दिन तांबोळी, यासीन शेख, श्वेता गायकवाड, संजय वारभोग सह आदी पत्रकारांचा यथोचित सन्मान करण्यात आला.
यावेळी डाॅ प्रदिप कुडके, डाॅ सुशिल पन्हाळकर, आपटीचे उपसरपंच आप्पासाहेब ढगे, ऋषीकेश (बिट्टू) मोरे, सुरज काळे, योगेश हुलगुंडे सह आदी उपस्थित होते.जामखेड मिडीया क्लबचे किरण रेडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. यावेळी रेडे यांनी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या कार्याचा आढावा घेतला. आप्पा ढगे यांनी सुत्रसंचालन केले.