आकड्यांच्या खेळात खरी शिवसेना कोणाची ? ठाकरे – शिंदे गटाने निवडणूक आयोगाकडे सादर केलेली कागदपत्रे काय सांगतात ? वाचा सविस्तर
जामखेड टाइम्स वृत्तसेवा । शिवसेनेत उफाळून आलेल्या बंडाळीनंतर राज्यात शिंदे गटाने भाजपसोबत सरकार बनवले. त्यानंतर खरी शिवसेना कोणाची हा वाद सर्वोच्च न्यायालयासह निवडणूक आयोगाच्या कोर्टात गेला. निवडणूक आयोगाकडून ठाकरे आणि शिंदे गटाला कागदपत्रे सादर करण्यास सांगितले. आज दोन्ही गटांनी आयोगाला कागदपत्रे सादर केली. ठाकरे आणि शिंदे गटाने निवडणूक आयोगाकडे सादर केलेली कागदपत्रे काय सांगतात ? जाणून घेऊयात !
खरी शिवसेना कोणाची ? उध्दव ठाकरेंची की एकनाथ शिंदेंची हा वाद सोडवण्यासाठी कोणत्या गटाकडे किती लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी यावरून निवडणूक आयोग फैसला करणार आहे. त्यामुळे आकड्यांच्या खेळात कोणाचे पार जड ठरणार त्यावरच खरी शिवसेना कोणाची याचा फैसला होणार आहे.
शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटांकडून निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आलेल्या कागदपत्रांमधून कोणत्या गटाकडे किती लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी आहेत याचा तपशील खालीलप्रमाणे आहे.
शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे गटासोबत किती लोकप्रतिनिधी
- विधानसभा आमदार – 14
- विधानपरिषद आमदार – 12
- लोकसभा खासदार – 7
- राज्यसभा खासदार – 3
शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे गटासोबत किती पदाधिकारी
- राष्ट्रीय कार्यकारणी – 160 /234
- प्राथमिक सदस्य – 10 लाख +
- इतर राज्यांचे प्रभारी – 18
- पदाधिकारी – 2 लाख 62 हजार
शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे गटासोबत कोणत्या पदाधिकाऱ्यांचा समावेश
- जिल्हाप्रमुख – 192
- तालुका प्रमुख – 700
- विभाग प्रमुख- 3000
- शहर प्रमुख – 550
- बुथप्रमुख – 1,80,000
- शाखाप्रमुख – 60,000
शिंदे गटासोबत किती लोकप्रतिनिधी ?
- विधानसभा आमदार – 40
- लोकसभा खासदार – 12
- प्राथमिक सदस्य – 1, 66,764
- पदाधिकारी – 144
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटासोबत किती पदाधिकारी ?
- इतर राज्यांचे प्रमुख – 11
- राष्ट्रीय कार्यकारणी – पुनर्रचना ( 27 जूलै 2022)
- प्रतिनिधी सभा – पुनर्रचना ( 18 जूलै 2022)
दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या पक्षप्रमुख पदाला अद्यापही कुणाचे आव्हान नाही. एकनाथ शिंदे यांनी देखील ही बाब आपल्या याचिकेत मान्य केली आहे. एकनाथ शिंदे यांनी स्वतःची नेमणूक केलेले ‘मुख्य नेते’ हे पद शिवसेनेत अस्तित्वातच नाही, असे काही दावे ठाकरे गटाने आजच्या उत्तरात केले आहेत.
- मुख्य नेता पदावर एकनाथ शिंदे यांनी स्वतःला नेमलं, मात्र असं पदच शिवसेनेच्या घटनेत अस्तित्वात नाही. त्यामुळे चिन्हावर दावा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचाच आहे, असेही शिवसेनेने म्हटले आहे.
दरम्यान निवडणूक आयोगाने आज दोन्ही गटाकडून देण्यात आलेली कागदपत्रे ताब्यात घेतली आहेत. यावर निवडणूक आयोग कधी निर्णय घेणार याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे.
ब्रेकिंग : निवडणूक आयोगाने शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह गोठवलं
दरम्यान अंधेरी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेतला आहे. शिवसेनेचे अधिकृत चिन्ह धनुष्यबाण निवडणूक आयोगाने गोठवलं असल्याने आता अंधेरी पोटनिवडणुकीसाठी हे चिन्ह शिंदे आणि ठाकरे यांना वापरता येणार नाही. ठाकरे आणि शिंदे गटाने निवडणूक आयोगाकडे पक्ष आणि चिन्हाबाबत कागदपत्रे सादर केल्यानंतर निवडणूक आयोगाची आज चार तासांची बैठक दिल्लीत पार पडली. या बैठकीनंतर चिन्ह गोठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.