महाराष्ट्रातील 48 लोकसभा मतदारसंघात कोणी मारली बाजी ? वाचा संपुर्ण यादी एका क्लिकवर

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : लोकसभा निवडणुकीच्या निकालाची घोषणा आज चार जून रोजी करण्यात आली. या निवडणुकीच्या निकालात महाराष्ट्रातील जनतेचा कौल कोणाच्या बाजूने जातो ? याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते. लोकसभा निवडणूकीपूर्वी महाराष्ट्रात शिवसेना आणि राष्ट्रवादीत उभी फूट पडली होती. त्या पार्श्वभूमीवर यंदा होणारी लोकसभेची निवडणूक रंजक ठरली.या निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना रंगला होता. जनता महायुतीच्या बाजूने कौल देणार की महाविकास आघाडीच्या बाजूने ? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. अखेर लोकसभा निवडणुकीच्या निकालात महाविकास आघाडीने बाजी मारली आहे. महाराष्ट्रातील जनतेने महाविकास आघाडीवर आपला विश्वास दाखवला आहे.

Who is the winning MP from 48 Lok Sabha constituencies in Maharashtra? Read the complete list in one click, maharashtra loksabha election results 2024,

लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातून 48 जागांवर निवडणूक पार पडली होती.या निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला. या निवडणुकीत विजय झालेल्या उमेदवारांची नावे खालील प्रमाणे..!

१) दक्षिण मुंबई – अरविंद सावंत – ठाकरे गट
२) दक्षिण मध्य मुंबई – अनिल देसाई – ठाकरे गट
३) उत्तर पश्चिम मुंबई – रविंद्रा वाईकर-शिंदे गट
४) बुलढाणा – प्रतापराव जाधव – शिंदे गट
५) ठाणे – नरेश म्हस्के – शिंदे गट
६) कल्याण – श्रीकांत शिंदे – शिंदे गट
७) नाशिक – राजाभाऊ वाजे – ठाकरे गट
८) औरंगाबाद – संदीपान घुमरे – शिंदे गट
९) हिंगोली – नागेश पाटील – ठाकरे गट
१०) यवतमाळ – संजय देशमुख – ठाकरे गट
११) हातकणंगले – धैर्य़शील माने – शिंदे गट
१२) मावळ – श्रीरंग बारणे – शिंदे गट
१३) शिर्डी – भाऊसाहेब वाकचौरे – ठाकरे गट
१४) बारामती – सुप्रिया सुळे- शरद पवार गट
१५) शिरुर – डॉ. अमोल कोल्हे – शरद पवार गट
१६) उत्तर मुंबई – पियूष गोयल – भाजप
१७) उत्तर मध्य मुंबई – वर्षा गायकवाड – काँग्रेस
१८) नंदुरबार – गोवाल पाडवी– काँग्रेस
१९) धुळे – डॅा. शोभा बच्छाव – काँग्रेस
२०) जालना – कल्याण काळे – काँग्रेस
२१) लातूर – शिवाजीराव काळगे – काँग्रेस
२२) नांदेड – वसंत चव्हाण – काँग्रेस
२३) अकोला – अनुप धोत्रे – भाजप
२४) अमरावती – बळवंत वानखेडे – काँग्रेस
२५) नागपूर – नितीन गडकरी – भाजप
२६) भंडारा-गोंदिया –प्रशांत पडोले– काँग्रेस
२७) गडचिरोली – डॅा. नामदेव किरसान – काँग्रेस
२८) चंद्रपूर – प्रतिभा धानोरकर – काँग्रेस
२९) पुणे – मुरलीधर मोहोळ – भाजप
३०) सोलापूर – प्रणिती शिंदे – काँग्रेस
३१) भिवंडी – बाळामामा म्हात्रे – शरद पवार गट
३२) दिंडोरी – भास्करराव भगरे – शरद पवार गट
३३) रावेर – रक्षा खडसे – भाजप
३४) बीड – बजरंग सोनवणे – शरद पवार गट
३५) वर्धा – अमर काळे– शरद पवार गट
३६) माढा – धैर्यशील पाटील – शरद पवार गट
३७) सातारा – उद्यनराजे भोसले – भाजप
३८) अहमदनगर – निलेश लंके – शरद पवार गट
३९) मुंबई उत्तर पूर्व – संजय दिना पाटील – ठाकरे गट
४०) पालघर – डॉ. हिमंत सावरा – भाजप
४१) सिंधुदुर्ग – नारायण राणे – भाजप
४२) जळगाव – स्मिता वाघ – भाजप
४३) सांगली – विशाल पाटील – अपक्ष
४४) रायगड – सुनील तटकरे– अजित पवार
४५) धाराशिव – ओमराजे निंबाळकर – ठाकरे
४६) परभणी – संजय जाधव – ठाकरे
४७) रामटेक – श्यामकुमार बर्वे – काँग्रेस
४८) कोल्हापूर – शाहू महाराज छत्रपती – काँग्रेस