Zeeshan Siddique News : माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या निधनानंतर मुलगा झिशान सिद्दीकी यांची पहिली प्रतिक्रिया आली समोर, म्हणाले

Zeeshan Siddique News : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते तथा माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार करत त्यांची हत्या करण्यात आली. घटनेच्या पाच दिवसानंतर सिद्दीकी यांचे सुपुत्र आमदार झिशान सिद्दीकी यांची पहिली प्रतिक्रिया आता समोर आली आहे. झिशान सिद्दीकी यांनी ट्विटरवर (Xवर) पोस्ट लिहीत न्यायाची मागणी केली आहे.

Zeeshan Siddique News, Son Zeeshan Siddique's first reaction after the death of Baba Siddique has come out

“माझ्या वडिलांना लोकांचं संरक्षण करताना आणि निर्दोष गरीब लोकांची घरं वाचवताना जीव गमावला. आज माझे पूर्ण कुटुंब कोलमडलं आहे. पण माझ्या वडिलांच्या मृत्यूचे राजकारण व्हायला नको. त्यांचं बलिदान व्यर्थ जायला नको. मला न्याय हवाय, माझ्या कुटुंबाला न्याय हवाय”, असे ट्विट झिशान सिद्दीकी यांनी केले आहे.

‘त्या’ रात्री नेमके काय घडले होते?

बाबा सिद्दीकी यांची 12 ऑक्टोबरला दसऱ्याच्या दिवशी रात्री 9 वाजेच्या सुमारास तीन हल्लेखोरांनी गोळीबार करत त्यांची हत्या केली होती. बाबा सिद्दीकी हे आपले पुत्र झिशान सिद्दीकी यांच्या कार्यालयासमोर उभे असताना हा गोळीबार केला होता. या गोळीबारात बाबा सिद्दीकी हे गंभीर जखमी झाले होते. त्यांना तातडीने लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण डॉक्टरांनी त्यांना तपासल्यानंतर त्यांचा मृत्यू झाल्याचं घोषित केलं होतं.

यानंतर लॉरेन्स बिश्नोई गँगने या हत्येची जबाबदारी घेतली होती. या प्रकरणातील आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. आणखीन आरोपींच्या शोधासाठी पोलिस पथके कार्यरत आहेत. पोलिस या घटनेचा वेगवेगळ्या अँगलने तपास करत आहेत.