Akash Deep Test Debut : रांची कसोटीत भारतीय संघात पदार्पण करताच अकाश दीपची धमाकेदार गोलंदाजी, इंग्लंडचा डाव गडगडला

  • हायलाईट्स
  • भारत विरुद्ध इंग्लंड चौथा कसोटी सामना (ind vs eng 4th test)
  • इंग्लंडने नाणेफेक जिंकली
  • आकाश दीपचे भारतीय कसोटी संघात पदार्पण
  • अकाश दीपची धारदार गोलंदाजी
  • इंग्लंडचा निम्मा संघ तंबूत
  • 40 ओव्हरमध्ये 5 बाद 149 धांवा

Akash Deep Test Debut : भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेतील (Ind vs Eng test series) चौथ्या कसोटीत इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतली आहे. रांची (Ranchi test) येथे होत असलेल्या या कसोटी सामन्यात भारताकडून आणखीन एका खेळाडूने कसोटी संघात पदार्पण केले. भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रित बुमराह याच्या जागी अकाश दीप (Akash deep) वेगवान गोलंदाजाचा भारतीय संघात समावेश (team india) करण्यात आला.भारताकडून कसोटी संघात पदार्पण करताच अकाश दीपने (Akash Deep today) पहिल्याच दिवशी धमाकेदार गोलंदाजी करत सर्वांचीच मने जिंकली. (Akash Deep today wicket)

Akash Deep Test Debut, As soon as he made his debut in team india in Ranchi Test, Akash Deep's explosive bowling, England's innings thundered,

रांचीत खेळवल्या जात असलेल्या चौथ्या कसोटी सामन्यात (ind vs eng 4th test) भारतीय संघाने मोठा बदल केला. जसप्रीत बुमराहच्या जागी अकाश दीप या युवा खेळाडूला भारतीय संघात स्थान दिले. भारतीय संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) यांनी अकाश दीपला भारतीय कसोटी संघाची कॅप दिली. भारतीय संघाकडून कसोटी संघात स्थान मिळवणारा अकाश दीप हा 313 वा खेळाडू ठरला आहे. रांचीच्या मैदानात कसोटी संघाची कॅप मिळताच अकाश दीपने आईची भेट घेतली. चरण स्पर्श करत आईचा आशिर्वाद घेतला. यावेळी त्याचे कुटूंबिय भावूक झाले होते. (Akash Deep Test Debut)

Akash Deep Test Debut, As soon as he made his debut in team india in Ranchi Test, Akash Deep's explosive bowling, England's innings thundered,

दरम्यान, भारतीय संघ गोलंदाजीस मैदानात उतरल्यानंतर जसप्रित बुमराहाच्या अनुपस्थितीत अकाश दीप हा कसोटी पदार्पणात कशी कामगिरी करतो याकडे सर्वांच्याच नजरा लागल्या होत्या. भारतीय कर्णधार रोहित शर्माने जेव्हा अकाश दीपच्या हाती चेंडू सोपवला तेव्हा अकाश दीपने कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवत इंग्लिश फलंदाजांना हैराण करण्यास सुरुवात केली. (Akash Deep Test Debut)

Akash Deep Test Debut, As soon as he made his debut in team india in Ranchi Test, Akash Deep's explosive bowling, England's innings thundered,

Akash Deep today wicket : अकाश दीपने पहिल्या सत्रात इंग्लंडला जोरदार धक्के दिले. सलामीवीर बेन डकेट याला 11 धावांवर बाद करत अकाश दीपने आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेट मधील पहिली विकेट मिळवली. त्यानंतर त्याने ओली पोपला शून्यावर बाद केले. त्याच्यानंतर दुसरा सलामीवीर झॅक क्रॉली (Zak Crawley) याला 42 धावांवर बाद केले. अकाश दीप याच्या वादळी गोलंदाजीमुळे इंग्लंडचे आघाडीचे फलंदाज झटपट बाद झाले. यामुळे इंग्लंडचा निम्मा संघ तंबूत परतला आहे. इंग्लंडने दुसऱ्या सत्र अखेर 40 ओव्हरमध्ये 149 धावा केल्या आहेत. सध्या मैदानावर जो रूट 40 धावांवर तर बेन फोक्स 13 धावांवर खेळत आहेत. भारतीय फिरकी गोलंदाज आर आश्विन व रविंद्र जडेजा या दोघांनी प्रत्येकी एक-एक विकेट्स घेतल्या आहेत. (Akash Deep Test Debut)

Akash Deep Test Debut, As soon as he made his debut in team india in Ranchi Test, Akash Deep's explosive bowling, England's innings thundered,

Akash Deep today wickets : भारतीय कसोटी संघात पदार्पण केलेल्या अकाश दीपने इंग्लंडच्या पहिल्या डावाला सुरूंग लावला. गेल्या तीन कसोटी सामन्यात इंग्लंड कडून दमदार फलंदाजी करणाऱ्या तिघा प्रमुख फलंदाजांना त्याने तंबूत धाडले. अकाश दीपने पहिल्या दोन सत्रात 10 ओव्हरची गोलंदाजी करत 37 धावा देत 3 विकेट्स मिळवल्या.अकाश दीपने भारतीय संघाला धमाकेदार सुरूवात करून दिली. कसोटी पदार्पणात अकाश दीपने चमकदार कामगिरी करत आपली निवड सार्थ ठरवली. (Akash Deep Test Debut)