Ashwin 500 wickets : ऐतिहासिक कामगिरी, आर आश्विनच्या 500 विकेट पूर्ण, जॅक क्राॅली ठरला आश्विनचा पाचशेवा बळी !
- हायलाईट्स
- भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी सामना (Ashwin 500 wickets)
- भारताच्या पहिल्या डावात 445 धावा
- इंग्लंडच्या पहिल्या डावात धावा 207/2
- रविंद्र आश्विनने घेतली 500 वी विकेट
- जॅक क्राॅली ठरला आश्विनचा पाचशेवा बळी
- 500 विकेट घेण्याची कामगिरी करणारा आश्विन ठरला दुसरा भारतीय गोलंदाज
Ashwin 500 wickets : राजकोट येथे सुरु असलेल्या भारत विरुद्ध इंग्लंड तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताचा फिरकी गोलंदाज आर आश्विन याने ऐतिहासिक कामगिरी करत दिग्गजांच्या पंगतीत स्थान मिळवले आहे. आश्विनने इंग्लंड विरूध्दच्या सामन्यात 500 विकेट घेण्याचा पराक्रम पुर्ण केला आहे. आर आश्विन हा अनिल कुंबळे यांच्यानंतर 500 विकेट घेणारा दुसरा गोलंदाज बनला आहे. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताकडून खेळताना त्याने 728 विकेट्स घेतल्या आहेत.
राजकोट कसोटीचा आजचा दुसरा दिवस आहे. भारताने पहिल्या डावात सर्वबाद 445 धावा केल्या. भारताकडून रोहित शर्मा, रविंद्र जडेजा यांनी शतके झळकावली. भारताकडून कसोटी संघात पदार्पण करणाऱ्या सर्फराज खान आणि ध्रुव जुरेल या दोघांनी कसोटीत दमदार पुनरागमन केले. सर्फराज खान याने 62 धावांची तर ध्रुव जुरेल याने 46 धावांची दमदार खेळी करत आपली निवड योग्य असल्याचे सिध्द केले. (Ashwin 500 wickets)
Ashwin 500 wickets : आर आश्विनची ऐतिहासिक कामगिरी
भारताचा डावा 445 धावांवर अटोपल्यानंतर इंग्लंडचा संघ फलंदाजीसाठी मैदानात उतरला. इंग्लंडची सलामीवीर जोडी धोकादायक ठरू पाहत असतानाच आश्विनने इंग्लंडला 89 धावांवर पहिला धक्का दिला. जॅक क्राॅली हा आश्विनचा पाचशेवा बळी ठरला. जॅक क्राॅलीला बाद करत आश्विन 500 विकेट घेणाऱ्या दिग्गजांच्या पंगतीत जाऊन बसला. यापुर्वी भारताकडून महान गोलंदाज अनिल कुंबळे यांनी अशी कामगिरी करून दाखवलेली आहे. आता अशी कामगिरी करणारा आश्विन हा दुसरा भारतीय गोलंदाज ठरला आहे. (Ashwin 500 wickets)
रविंद्रन आश्विनने 98 कसोटी सामन्यातील 184 डावांत 500 विकेट्स घेण्याची ऐतिहासिक कामगिरी राजकोटच्या मैदानात पार पाडली. महान फिरकी गोलंदाज अनिल कुंबळे यांनी 500 विकेट घेण्यासाठी 105 सामने खेळले होते. आश्विन हा सर्वात जलद 500 विकेट घेणारा भारतीय गोलंदाज ठरला आहे. कसोटीत सर्वात जलद 500 विकेट घेण्याचा विक्रम श्रीलंकेचा महान खेळाडू फिरकीचा जादूगार मुथय्या मुरलीधरन याच्या नावावर आहे. मिरलीधरनने 87 कसोटीत 500 बळी घेतले होते.(Ashwin 500 wickets)
आश्विनने जेम्स अँडरसन याचा विक्रम मोडीत काढला. जेम्स अँडरसनने 500 विकेट्स मिळवण्यासाठी 28 हजार 150 चेंडू टाकले होते. तर आश्विनने 25 हजार 714 चेंडू टाकत 500 विकेट घेतल्या. (Ashwin 500 wickets)
- कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज कोण ?
- मुथय्या मुरलीधरन – 800 विकेट्स
- शेन वॉर्न – 708 विकेट्स
- जेम्स अँडरसन 696 विकेट्स
- अनिल कुंबळे – 619 विकेट्स
- स्टुअर्ट ब्रॉड – 604 विकेट्स
- ग्लेन मॅकग्रा – 563 विकेट्स
- कोर्टनी वाॅल्श- 519
- नॅथन लिऑन – 517
- रविचंद्रन आश्विन – 500 (आज अखेर)