Under-19 World Cup Final Result : ऑस्ट्रेलियाने चौथ्यांदा अंडर 19 वर्ल्डकप जिंकला, फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाकडून भारताचा 79 धावांनी पराभव !

Under-19 World Cup Final Result हायलाईट्स:
● अंडर 19 क्रिकेट वर्ल्डकप फायनल
● भारत विरूध्द ऑस्ट्रेलिया
● ऑस्ट्रेलियाकडून भारताला 254 धावांचे लक्ष्य
● भारत सर्वबाद 174, भारताचा 79 धावांनी पराभव
● ऑस्ट्रेलियाने चौथ्यांदा जिंकला वर्ल्डकप

India vs Australia – ICC Under-19 Cricket World Cup Final Result : दक्षिण आफ्रिकेत सुरु असलेल्या आयसीसी अंडर 19 वर्ल्डकप क्रिकेट स्पर्धेत भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया फायनल मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाने 253 धावा केल्या. 254 धावांचे लक्ष्य पार करताना भारतीय फलंदाजांनी पुरती निराशा केली.ऑस्ट्रेलियाने भेदक गोलंदाजी करत भारताचे फलंदाज झटपट बाद केले. फायनल सामन्यात संकटात सापडलेल्या भारताचा डाव सावरण्यासाठी मोठी भागीदारी करण्यात फलंदाज अपयशी ठरले. अंडर 19 विश्वचषक फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाकडून भारताचा पराभव झाला. ऑस्ट्रेलियाने चौथ्यांदा वर्ल्डकप जिंकला. 14 वर्षानंतर ऑस्ट्रेलियाने अंडर 19 वर्ल्डकप जिंकला.

Australia wins U-19 World Cup for fourth time, Australia defeats India by 79 runs in ICC U-19 Cricket World Cup final,Under-19 World Cup Final Result,

254 धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या भारतीय संघाने झटपट विकेट गमावल्या. पहिल्या 35 षटकांत भारताने 8 विकेट गमावत 136 धावा केल्या. भारताकडून आर्शिन कुलकर्णी हा अवघ्या 3 धावांवर बाद झाला. मुशीर खान हा चांगला फाॅर्मात आहे असे वाटत असतानाच तो 22 धावांवर बाद झाला. भारतीय कर्णधार उदय सहारन आज मोठी धावसंख्या गाठू शकला नाही, तो अवघ्या 8 धावांवर बाद झाला. (Under-19 World Cup Final Result)

सेमीफायनल सामन्यात आपल्या धमाकेदार खेळीने सर्वांचेच लक्ष वेधून घेणाऱ्या सचिन धस याने सर्वांचीच निराशा केली. तोही स्वस्तात बाद झाला. सचिन धस याने अवघ्या 9 धावा केल्या. प्रियांशू मोलिया हाही लवकर बाद झाला. त्याने 9 धावा केल्या. तर विकेटकीपर फलंदाज अरावेली अवनीश हा शून्यावर बाद झाला. तर राज लिंबानी शून्यावर बाद झाला. आदर्श सिंगने एकाकी झुंज देत 47 धावा केल्या. तो मोठी धावसंख्या उभारण्यात अपयशी ठरला.

Australia wins U-19 World Cup for fourth time, Australia defeats India by 79 runs in ICC U-19 Cricket World Cup final,Under-19 World Cup Final Result,

35 षटकांत भारताने 8 विकेट गमावत 136 धावा केल्या होत्या. त्यानंतर मुरूगन अभिषेक याने शेवटपर्यंत झुंज देण्याचा प्रयत्न केला. त्याने नमन तिवारी सोबत भारताचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मुरुगन हा 42 धावांवर बाद झाला. 56 धावांवर 86 धावांची आवश्यकता असताना मुरुगन मोठा फटका मारण्याच्या नादात बाद झाला. यावेळी भारताच्या 168 धावा झाल्या होत्या.

168 धावांच्या पुढे विजयाच्या दिशेने जाण्यासाठी नमन तिवारी व सौम्य पांडे या शेवटच्या जोडीने शेवटची झुंज दिली.नमन तिवारी याने 14 धावा केल्या. तर सौम्य पांडे याने 2 धावा केल्या. पांडे याच्या रूपाने भारताची शेवटची विकेट पडली. भारताचा डाव 174 धावांवर आटोपला. भारताकडून आदर्श सिंग, मुशीर खान, मुरूगन अभिषेक,नमन तिवारी,या चार जणांना दोन अंकी धावसंख्या गाठता आली. भारताचे अनेक आघाडीचे फलंदाज अपयशी ठरले. (Under-19 World Cup Final Result)

Under-19 World Cup Final Result

आज दक्षिण आफ्रिकेत भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया या दोन संघात अंडर 19 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील अंतिम सामना खेळवला जात आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी केली. 50 षटकांच्या या सामन्यात भारतीय गोलंदाजांन ऑस्ट्रेलियाचा डाव 253 धावांवर रोखला. ऑस्ट्रेलियाकडून हरजास सिंग याने अर्धशतकी खेळी केली. त्याने सर्वाधिक 55 धावा केल्या. (Under-19 World Cup Final Result)

भारताकडून राज लिंबानी हा गोलंदाज सर्वात यशस्वी ठरला. त्याने 3 विकेट घेतल्या, त्याला नमन तिवारीने चांगली साथ दिली. तिवारीने दोन विकेट पटकावल्या. पांडे आणि खान यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली.ऑस्ट्रेलियाकडून महली बियर्डमन याने 3 व राफ मॅकमिलन याने 3 विकेट घेत भेदक गोलंदाजी केली. चार्ली अँडरसन, व टॉम स्ट्रेकर या दोघांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतल्या तर कॅलम विडलर याने 2 विकेट घेतल्या. ऑस्ट्रेलियाकडून सर्वच गोलंदाजांनी भेदक गोलंदाजी केली. त्याच बळावर ऑस्ट्रेलियाने भारताचा 79 धावांनी पराभव केला. Under-19 World Cup Final Result

ऑस्ट्रेलिया अंडर 19 प्लेईंग ईलेव्हन | ह्यू वेबगेन (कॅप्टन), हॅरी डिक्सन, सॅम कोन्स्टास, हरजस सिंग, रायन हिक्स (विकेटकीपर), ऑलिव्हर पीक, राफ मॅकमिलन, चार्ली अँडरसन, टॉम स्ट्रेकर, महली बियर्डमन आणि कॅलम विडलर

टीम इंडिया अंडर 19 प्लेईंग इलेव्हन | उदय सहारन (कर्णधार), आदर्श सिंग, अर्शीन कुलकर्णी, मुशीर खान, प्रियांशू मोलिया, सचिन धस, अरावेली अवनीश (विकेटकीपर), मुरुगन अभिषेक, राज लिंबानी, नमन तिवारी आणि सौम्य पांडे.