BCCI Announced Ahmedabad and Lucknow teams for IPL 2022 | लिलावात अहमदाबाद व लखनौ संघावर लागली सर्वाधिक बोली : अदानी ग्रुपला दणका, ‘या’ कंपन्यांकडे गेली मालकी
मुंबई : BCCI Announced Ahmedabad and Lucknow teams for IPL 2022 | सध्या T20 विश्वचषक 2021 ची धुम सुरू आहे. तर दुसरीकडे भारतीय क्रिकेट बोर्डाने BCCI अगामी 2022 मध्ये खेळवल्या जाणाऱ्या इंडियन प्रीमीयर लीग IPL 2022 साठी दोन नव्या संघाची घोषणा करण्यासाठी Dubai येथे लिलाव पुकारला होता.ही लिलाव प्रक्रिया पुर्ण झाली आहे. त्यात नव्या संघाची घोषणा करण्यात आली.
बीसीसीआयने सोमवारी 25 ऑक्टोबर रोजी दुबई येथे IPL 2022 च्या हंगामासाठी 02 नव्या संघांच्या मालकी हक्कासाठीची लिलावाची प्रकिया घेतली.इंडियन प्रीमिअर लीगच्या पुढील पर्वात ( IPL 2022) दोन नवीन संघ दाखल झाले आहेत. BCCI ने या दोन संघांसाठी निविदा मागवल्या होत्या आणि आज जवळपास 04 तासांच्या छाननीनंतर 10 निविदा अंतिम टप्प्यासाठी निवडण्यात आल्या.
All Cargo Logistics, Adani Group, RP Sanjiv Goenka आणि Uday Kotak या चार कंपनींमध्ये दोन नव्या फ्रँचायझींसाठी चुरस पाहायला मिळाली. पण, यात भलत्याच कंपनीनं बाजी मारली. दोन संघांच्या बोलीसाठी 22 कंपन्यांनी 10 लाख रुपये भरून निविदा कागदपत्रे विकत घेतले होते.
लखनौ संघाची मालकी RP Sanjiv Goenka यांच्याकडे
RP Sanjiv Goenka यांनी सर्वाधिक 7090 कोटींची बोली लावली ( RPSG highest bid at INR 7000 CR.) संजीव गोएंका यांच्याकडे यापूर्वी पुणे रायजिंग सुपरजायट्सं फ्रँचायझीचे मालकी हक्क होते आणि दोन वर्ष त्यांचा संघ आयपीएलमध्ये खेळला होता. आता पुन्हा आयपीएलमध्ये त्यांनी एन्ट्री घेतल्यानं संजीव गोएंका आनंदी झाले आहेत. संजीव गोएंका (RPSG GROUP) यांच्याकडे लखनौ फ्रँचायझीचे मालकी हक्क गेले आहेत.
अहमदाबाद संघाची मालकी CVC Capital कडे
तर दुसरीकडे CVC Capital ने या लिलावात दुसरी सर्वाधिक बोली लावून फ्रँचायझी नावावर केली. त्यांनी 5166 कोटींची बोली लावली आणि अहमदाबाद फ्रँचायझीचे मालकी हक्क जिंकले. CVC Capital यांनी नुकतेच ला लिगा क्लबमध्ये बोली जिंकली, त्यांच्याकडे फॉर्म्युला वन आणि रग्बी संघाचेही मालकी हक्क आहेत. (The RPSG Group have picked Lucknow as their home base with a winning bid of INR 7090 crores while CVC Capital have opted for Ahmedabad with a bid of INR 5166 crores)
अदानी ग्रुप व मँचेस्टर युनायटेड चे स्वप्न भंगले
IPL 2022 मध्ये सहभागी होणाऱ्या दोन नवीन संघाच्या मालकी अदानी ग्रुप व मँचेस्टर युनायटेडकडे जातील असा कयास बांधला जात होता. परंतू या दोन्ही कंपन्यांना फ्रँचायझी जिंकण्यात अपयश आले.( No Adani and Machester United owners for IPL 2022)
IPL 2022 मध्ये असे असतील खालील संघ
दरम्यान सध्या आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्स, मुंबई इंडियन्स, कोलकाता नाईट रायडर्स, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, पंजाब किंग्स, दिल्ली कॅपिटल्स, सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स हे 08 संघ नियमितपणे खेळत आहेत, तर आता अगामी हंगामापासुन अहमदाबाद व लखनऊ हे दोन संघ सहभागी होतील. त्यानुसार IPL 2022 मध्ये दहा संघात लढत होईल.
Ahmedabad and Lucknow to be the two new teams at Indian Premier League (IPL). CVC Capital Partners gets Ahmedabad while RPSG Group gets Lucknow. pic.twitter.com/0zmQS7nQEb
— ANI (@ANI) October 25, 2021