Big Breaking Virat Kohli resigns Indian Test captain | विराट कोहलीने केली मोठी घोषणा भारतीय कसोटी संघाचे कर्णधारपद सोडले

जामखेड टाईम्स वृत्तसेवा ।Big Breaking Virat Kohli Resigns Indian Test Captain | भारतीय कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहली याने शनिवारी आणखी एक मोठा निर्णय घेतला. कोहलीने वनडे संघाचे कर्णधारपद सोडल्यानंतर आता कसोटी क्रिकेटच्या संघाच्या कर्णधारपदासंबंधी मोठा निर्णय जाहिर केला आहे.

भारतीय क्रिकेट संघाचा स्ट्रार खेळाडू असलेल्या कर्णधार विराट कोहली याने शनिवारी कसोटी संघाचे कर्णधारपद सोडण्याची घोषणा केली. याबाबत कोहलीने ट्विट केले आहे. (virat kohli step down as india’s test captain)

कर्णधार विराट कोहलीने केलेल्या ट्विट मध्ये म्हटले आहे की, संघाला योग्य दिशेने घेऊन जाण्यासाठी 7 वर्षे कठोर परिश्रम घेतले. परिश्रम आणि अथक चिकाटीने संघाची कामगिरी उंचावण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. प्रत्येक गोष्ट कोणत्या ना कोणत्या टप्प्यावर थांबली पाहिजे आणि भारताचा कसोटी कर्णधार म्हणून मी थांबण्याचा निर्णय घेतला आहे.

कर्णधार पदाच्या प्रवासात अनेक चढ-उतार आले आहेत, पण प्रयत्नांची कमतरता किंवा विश्वासाचा अभाव कधीच जाणवला नाही. मी जे काही करतो त्यामध्ये माझे 120 टक्के देण्यावर माझा नेहमीच विश्वास आहे आणि मी ते करू शकत नसल्यास, मला माहित आहे की ते करणे योग्य नाही. माझ्या मनात पूर्ण स्पष्टता आहे आणि मी माझ्या संघाशी अप्रामाणिक असू शकत नाही. एवढ्या मोठ्या कालावधीसाठी मला माझ्या देशाचे नेतृत्व करण्याची संधी दिल्याबद्दल मी बीसीसीआयचे आभार मानू इच्छितो असे म्हणत कोहलीने आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.

कोहलीने पुढे म्हणतो की, कसोटी क्रिकेटमध्ये सातत्याने वरच्या दिशेने नेणाऱ्या वाहनामागील इंजिन असलेल्या रवी शास्त्री आणि सपोर्ट ग्रुपलाही त्याने धन्यवाद दिले. तसेच महेंद्रसिंग धोनीचे खूप खूप आभार ज्याने माझ्यावर कर्णधार म्हणून विश्वास ठेवला आणि मला भारतीय क्रिकेटला पुढे नेणारी सक्षम व्यक्ती म्हणून ओळखले असे म्हणत कोहलीने महेंद्रसिंग धोनीचे आभार मानले.

सध्या भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात संघाने तीन कसोटी सामने खेळले. यात भारतीय संघाने फक्त 1 कसोटी जिंकली. कसोटी मालिका हरल्यानंतर विराटने कसोटी संघाचे कर्णधारपद सोडले. त्याआधी विराटने एकदिवसीय संघाचे कर्णधारपद सोडले होते. सध्या रोहित शर्मा कडे एकदिवसीय संघाचे कर्णधारपद आहे.