Virat Kohli Anushka Sharma Vamika Akaay : गेल्या काही दिवसांपासून क्रिकेटपासून दुर असलेला भारताचा स्टार खेळाडू विराट कोहली आणि अनुष्का शर्मा (Virat Kohali Anushka Sharma ) च्या कुटूंबात एक आनंदाची घटना घडली आहे. विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्माने पुन्हा एकदा नव्या बाळाला (Akaay) जन्म दिला आहे. 15 फेब्रुवारी रोजी अनुष्का शर्माने एका गोंडस मुलाला जन्म दिला. विराट कोहली पुन्हा एकदा बाप बनला आहे. याबाबत स्वता: विराट कोहलीने याची माहिती सार्वजनिक केली आहे. (Virat Kohli, Anushka, Sharma Vamika, Akaay)
भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी सामन्यांपासून दुर असलेल्या विराट कोहलीने पत्नी अनुष्का शर्माच्या गरोदरपणात पुर्ण वेळ तिची काळजी घेतली.विराट आणि अनुष्का हे दोघे स्टार कपल गेल्या काही दिवसांपासून विदेशात असल्याचे बोलले जात होते. आज 20 फेब्रुवारी 2024 रोजी विराटने आपल्या चाहत्यांना एक गोड बातमी दिली आहे. अनुष्का शर्माने 15 फेब्रुवारी 2024 रोजी एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. विराट आणि अनुष्का हे जोडपे दुसर्यांदा आई – बाबा झाले. (Virat Kohli, Anushka, Sharma Vamika, Akaay)
विराट आणि अनुष्काला मोठी मुलगी आहे. विराटच्या मोठ्या मुलीचे नाव वामिका (Vamika) आहे. (Virat Kohli daughter vamika) 15 फेब्रुवारी रोजी वामिकाच्या लहान भावाचे या जगात आगमन झाले. त्याचे आम्ही स्वागत केले. त्याचे नाव Akaay – अकाय’ असे आहे. असे विराटने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. आमच्या आयुष्यातील या सुंदर काळात आम्ही तुमचे आशीर्वाद आणि शुभेच्छा मागतो. आम्ही तुम्हाला विनंती करतो की यावेळी आमच्या गोपनीयतेचा आदर करावा. असेही त्यात म्हटले आहे. (Virat Kohli, Anushka, Sharma Vamika, Akaay)
अकाय शब्दाचा अर्थ काय ?
विराट कोहली आणि अनुष्का शर्मा गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चेत आहेत. अभिनेत्री अनुष्का ही गरोदर असल्याचे सांगितले जात होते. या दोघांनीही याची पुष्टी केलेली नव्हती. काही काळापूर्वी दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेटर एबी डिव्हिलियर्सने एका मुलाखतीदरम्यान दोघांचे हे गुपित उघड केले होते. पण आज विराटने स्वत:हून हे गुपित उघड केले. विराटने आपल्या मुलाचे नाव अकाय ठेवले असून अकाय हा शब्द मूळ संस्कृत भाषेतला आहे. अकाय शब्दाचा स्पष्ट अर्थ म्हणजे शरीरहीन. ज्या व्यक्तीला शरीर नाही किंवा जो शरीरविरहित आहे, त्याला अकाय म्हणतात. अकाय शब्दाचा आणखी एक अर्थ म्हणजे आकार किंवा स्वरूप नसलेले म्हणजेच निराकार.