ब्रेकिंग न्यूज : लोकसभा निवडणुकांचा बिगुल वाजला, केंद्रीय निवडणूक आयोगाकडून निवडणूक कार्यक्रमांची घोषणा, देशात सात टप्यात मतदान तर चार जून निकाल !
Lok Sabha Election 2024 date : संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या 18 व्या लोकसभेच्या पंचवार्षिक निवडणुकीची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगाकडून आज (16 मार्च) करण्यात आली एप्रिल आणि मे महिन्यात एकूण सात टप्प्यात देशात लोकसभेसाठी मतदान होणार आहे. चार जून रोजी निकाल जाहीर होणार आहे. (Election for the 18th Lok Sabha has been announced by the Election Commission of India)
2024 च्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची घोषणा आज निवडणूक आयोगाने केली आहे. देशात लोकसभा निवडणुकीसाठी एकूण सात टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. यात पहिल्या टप्प्यासाठी 19 एप्रिल, दुसऱ्या टप्प्यासाठी 26 एप्रिल, तिसऱ्या टप्प्यासाठी सात मे, चौथ्या टप्यात 13 मे, पाचव्या टप्यात 20 मे, सहाव्या टप्यात 25 मे आणि सातव्या टप्यात एक जून रोजी मतदान होणार आहे.केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणूकी पाठोपाठ अरुणाचल प्रदेश, सिक्किम, आंध्र प्रदेश आणि ओडिया या चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचीही घोषणा केली आहे. महाराष्ट्रातील लोकसभा निवडणूक पाच टप्प्यात पार पडणार आहे. (Lok Sabha election 2024 dates announced)
मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, या निवडणुकीत देशभरातून 96 कोटी 80 लाख मतदार मतदान करणार आहेत. त्यापैकी 49.7 कोटी पुरुष आणि 47 कोटी महिला मतदार आहेत. तर 48 हजार ट्रान्सजेंडर मतदारही मतदान करणार आहेत. यामध्ये 21 कोटी 50 लाख युवा मतदार आहेत. त्यातही एक कोटी 82 लाख प्रथम मतदारअसणार आहेत. याशिवाय 82 लाख मतदार 85 वर्षांवरील आहेत, तर 2 लाख 18 हजार मतदार हे 100 वर्षांवरील आहेत. या सर्वांसाठी 10 लाख 50 हजार मतदान केंद्रे असणार आहेत. तर 55 लाख ईव्हीएमचा वापर केला जाणार आहे. यासाठी दीड कोटी मतदान अधिकारी आणि सुरक्षा अधिकारी तैनात करण्यात येणार आहेत.
याव्यतिरीक्त प्रत्येक जिल्ह्यात ज्येष्ठ अधिका-यांच्या अखत्यारित 24 तास कंट्रोल रूम सुरू असणार आहे. कुठेही हिंसा होणार नाही याची काळजी घेण्यात येणार आहे. कोणी मुफ्त वस्तू कोणी वाटत असेल, पैसा वाटप होत असेल तर निवडणूक आयोगाला कळविण्याचे आवाहनही मुख्य निवडणूक आयुक्तांनी केले. या तक्रारीवर 100 मिनिटात कारवाई केली जाईल, असेही आश्वासन त्यांनी दिले. यासोबतच ज्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे, त्यांना तीनवेळा न्यूज पेपर, वृत्तवाहिन्यांमध्ये मध्ये माहिती द्यावी लागणार आहे. राजकीय पक्षांनाही तुम्हाला गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेला उमेदवार का मिळाला नाही, याची माहिती द्यावी लागणार आहे.
देशात सात टप्प्यात होणार लोकसभा निवडणूक 2024 | Lok Sabha Election 2024 date
- पहिला टप्पा – 19 एप्रिल
- दुसरा टप्पा – 26 एप्रिल
- तिसरा टप्पा – 7 मे
- चौथा टप्पा – 13 मे
- पाचवा टप्पा – 20 मे
- सहावा टप्पा – 25 मे
- सातवा टप्पा – 1 जून
- निकाल : 4 जून
- महाराष्ट्रात पाच टप्प्यात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या तारखा खालीलप्रमाणे
- 19 एप्रिल 2024 : रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदीया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर
- 26 एप्रिल 2024 : बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ – वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी
- 7 मे 2024 : रायगड, बारामती, धाराशीव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी- सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले
- 13 मे 2024 : नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड
- 20 मे 2024 : धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, ईशान्य मुंबई, उत्तर मुंबई, उत्तर मध्य मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई