Miss World 2024 Winner : मिस वर्ल्ड २०२४ च्या विजेत्यांची घोषणा,चेक रिपब्लिकच्या क्रिस्टिना पिस्कोव्हाने जिंकला ‘मिस वर्ल्ड २०२४ चा किताब !
Miss World 2024 Winner : मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेकशन सेंटरमध्ये ७१वा ‘मिस वर्ल्ड २०२४’चा महा अंतिम सोहळा आज ९ मार्च रोजी पार पडला. भारतात यापूर्वी १९९७ साली ‘मिस वर्ल्ड’चं (Miss World 2024) आयोजन करण्यात आलं होतं. तब्बल २८ वर्षांनंतर भारतात मोठ्या दिमाखात ‘मिस वर्ल्ड २०२४’चा महाअंतिम सोहळा पार पडला. चेक रिपब्लिकची क्रिस्टिना पिस्कोव्हा (Miss World 2024 kristina pyszkova Czech Republic) हिने ‘मिस वर्ल्ड २०२४’चा किताब पटकावला. तर भारताची प्रतिनिधित्व करणारी सिनी शेट्टी (Sini Shetty India) ही टॉप-८ पर्यंत पोहोचू शकली. त्यानंतर टॉप-४च्या शर्यतीतून बाहेर झाली.
‘मिस वर्ल्ड २०२४’च्या स्पर्धेच्या परीक्षणाची जबाबदारी १२ सदस्यांकडे होती. यामध्ये बॉलीवूड अभिनेत्री क्रिती सेनॉन, पूजा हेगडे, मिस वर्ल्ड ऑर्गनायझेशनच्या सीईओ ज्युलिया एव्हलिन मॉर्ले, बँकर, गायिका व समाजसेविका अमृता फडणवीस, चित्रपट निर्माता साजिद नाडियाडवाला, माजी भारतीय क्रिकेटपटू हरभजन सिंग, पत्रकार रजत शर्मा, बेनेट, कोलमन अँड को. लिमिटेडचे डिरेक्टर विनीत जैन, मिस वर्ल्ड इंडियाचे चेअरमन आणि स्ट्रॅटेजिक पार्टनर, हॉस्ट जामिल सैदी यांचा समावेश होता. याशिवाय पूर्वाश्रमीच्या ३ मिस वर्ल्ड विजेत्या देखील यात होत्या.
‘मिस वर्ल्ड २०२४’चा महाअंतिम सोहळ्याचे सूत्रसंचालन करण जोहर व ब्यूटी क्वीन मेगन यांग यांनी केलं. तसंच या सोहळ्यात शान, नेहा कक्कर, टोनी कक्कर परफॉर्म केलं.
झेक प्रजासत्ताकमधील क्रिस्टिना पिस्कोव्हा हिने 9 मार्च रोजी भारतात झालेल्या मिस वर्ल्ड 71 वी स्पर्धा जिंकली आहे. लेबनॉनची यास्मिना जायतौन ही पहिली उपविजेती ठरली. (Miss World 2024) क्रिस्टिना लॉ आणि बिझनेस या दोन्ही विषयात दोन पदवीचे शिक्षण घेत आहे आणि मॉडेल म्हणूनही काम करत आहे. तिच्या सोशल मीडियानुसार तिने क्रिस्टिना पिस्स्को फाउंडेशनची स्थापना केली.
७० वी मिस वर्ल्ड कॅरोलिना बिएलॉस्का हिने क्रिस्टिनाला मुकुट घालून तिचा सन्मान केला. 28 वर्षांच्या विश्रांतीनंतर, मिस वर्ल्ड फिनाले भारतात पार पडला. त्यामुळे या स्पर्धेच्या वारशातील भारतीयासाठींचा हा एक ऐतिहासिक क्षण आहे.
मिस वर्ल्ड ऑर्गनायझेशनच्या म्हणण्यानुसार, क्रिस्टिनाचा हा सर्वात अभिमानाचा क्षण म्हणजे टांझानियामध्ये वंचित मुलांसाठी इंग्रजी शाळा उघडणे, जिथे तिने स्वयंसेवा केली. तिला ट्रान्सव्हर्स बासरी आणि व्हायोलिन वाजवायला आवडते आणि आर्ट अकादमीमध्ये नऊ वर्षे घालवल्यानंतर तिला संगीत आणि कलेची आवड आहे.
मिस वर्ल्ड 2022 कॅरोलिना बिएलॉस्काने क्रिस्टिना पिस्कोव्हाला मुकुट परिधान केला. मुंबईच्या BKC येथील Jio वर्ल्ड सेंटरमध्ये हा सोहळा पार पडला. या समारंभाला जगभरातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
मिस वर्ल्ड स्पर्धेत फक्क सौंदर्याचा नव्हे तर बौद्धिक क्षमतेचाही विचार केला जातो. या सर्व चाचण्यामध्ये झेक रिपब्लिकची क्रिस्टिना पिस्कोव्हा अव्वल ठरली. या स्पर्धेत टॉप 4 फायनलिस्टमध्ये मिस त्रिनिदाद अँड टोबॅगो, मिस बोत्सवाना, मिस चेक रिपब्लिक आणि मिस लेबनॉन यांचा समावेश होता.
2017 साली मानुषी छिल्लर हिनं मिस वर्ल्ड हा किताब पटकावला होता. त्याआधी ऐश्वर्या राय बच्चन, प्रियांका चोप्रा यांनी मिस वर्ल्डचा किताब जिंकून भारताचे नाव जगात मोठे केले होते. 1994 साली ऐश्वर्यानं मिस वर्ल्ड हा किताब जिंकला होता. त्याला यावर्षी 30 वर्षे पूर्ण होणार आहोत.
भारताचं प्रतिनिधित्व करणारी सिनी शेट्टी कोण?
सिनी शेट्टीच्या कुटुंबाची नाळ कर्नाटकाशी जोडली असली तरी तिचा जन्म २ ऑगस्ट २००१ साली मुंबईत झाला होता.सिनीची आजी राजघराण्यातली आणि आजोबा स्वातंत्र्यसैनिक होते. तिच्या वडिलांचं नाव सदानंद शेट्टी असून आईचं नाव हेमा शेट्टी असं आहे. तिला एक भाऊ देखील आहे; ज्याचं नाव शिकिन शेट्टी झाला. सिनीचे वडील शिकिन हॉटेलचे मालक आहेत.
सिनीचं शालेय शिक्षण घाटकोपरच्या सेंट डोमिनिक सेवियो विद्यालयात झालं होतं. त्यानंतर तिने एसके सोमय्या कॉलेजमधून अकाउंटिंग आणि फायनान्समध्ये पदवी प्राप्त केली. ‘मिस वर्ल्ड २०२४’मध्ये सहभागी होण्यापूर्वी ती सीएफए (चार्टर्ड फायनेंशिअल अॅनालिस्ट)चं शिक्षण घेत होती.
सिनी ही उत्कृष्ट भरतनाट्यम नृत्यांगना आहे. ४ वर्षांची असल्यापासून ती भरतनाट्यम शिकत असून वयाच्या १४व्या वर्षी तिला अरंगेत्रम मिळालं. ३ जुलै २०२२ रोजी सिनीने ३१ सौंदर्यवतींना मागे टाकून ‘मिस इंडिया २०२२’चा किताब पटकावला होता. पण यंदा ‘मिस वर्ल्ड २०२४’चा किताब पटकावण्याची संधी हुकली. सिनी टॉप-८ पर्यंत पोहोचली आणि टॉप-४च्या शर्यतीतून ती बाहेर झाली.