Breaking News : बिहारमध्ये पुन्हा NDA ची सत्ता, बिहारच्या मुख्यमंत्रीपदी नितीश कुमार 9व्यांदा विराजमान !
पाटणा,बिहार: देशाच्या राजकारणात रविवारी मोठा राजकीय भूकंप झाला. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी लालूप्रसाद यादव यांच्या पक्षासोबत असलेली युती तोडत पुन्हा भाजपची वाट धरली. बिहारमध्ये नितीशकुमार आणि भाजप यांच्या युतीची सत्ता प्रस्थापित झाली. नितीशकुमार यांनी बिहारच्या मुख्यमंत्रीपदी शपथ घेतली. नितीशकुमार हे सलग 9व्यांदा बिहारचे मुख्यमंत्री बनले आहेत.
बिहारच्या राजकारणात रविवारी मोठा भूकंप झाला. बिहारमध्ये सत्तेत असलेल्या महागठबंधनमध्ये उभी फुट पडली. नितीशकुमार यांच्या JDU पक्षाने सरकारमधून बाहेर पडण्याची घोषणा केली. त्यांनी राज्यपाल राजेंद्र अर्लेकर यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा सोपवला. त्यानंतर अवघ्या काही तासांत नितीशकुमार यांनी भाजपसोबत नवे सरकार स्थापन केले. नितीशकुमार यांनी सलग 9 व्यांदा बिहारच्या मुख्यमंत्री शपथ घेतली. नितीशकुमार यांच्या निर्णयामुळे विरोधकांच्या इंडिया आघाडीत उभी फुट पडली.
बिहारमध्ये NDA ची सत्ता स्थापन झाली असून, या नव्या सरकारमध्ये नितीशकुमार यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष सम्राट चौधरी व विजय कुमार सिन्हा यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. प्रेम कुमार (भाजप), विजय कुमार चौधरी, बिजेंद्र प्रसाद यादव, श्रवण कुमार (सर्व JDU), संतोष कुमार सुमन (अध्यक्ष- हिंदुस्तानी अवाम मोर्चा – सेक्युलर), सुमित कुमार सिंह (अपक्ष) यांना कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ देण्यात आली. या शपथविधी सोहळ्यास भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा हे आवर्जून उपस्थित होते.