Breaking News : माकपचे जेष्ठ नेते सिताराम येचूरी यांचे निधन, दिल्लीच्या एम्स रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

Sitaram Yechury news today : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जेष्ठ नेते सिताराम येचुरी यांचे निधन झाले. गेल्या अनेक दिवसांपासून ते आजारी होते. त्यांच्यावर दिल्लीच्या एम्स रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचार सुरू असताना आज त्यांची प्राणज्योत मालवली. मृत्युसमयी ते ७२ वर्षांचे होते. भारतीय राजकारणातील प्रभावशाली अभ्यासू नेता म्हणून त्यांना जगभरात ओळखले जात होते. (Sitaram Yechury latest news today)

Breaking news, Senior leader of CPI(M) Sitaram Yechury passed away, breathed his last in Delhi's AIIMS hospita,

श्वसनाचा त्रास होत असल्याने सिताराम येचूरी यांना १९ ऑगस्ट रोजी दिल्लीच्या एम्स रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. परंतू त्यांच्या प्रकृतीने उपचारासाठी साथ न दिल्याने आज १२ रोजी त्यांचे उपचारादरम्यान निधन झाले. याबाबतचे वृत्त पीटीआय वृत्तसंस्थेने  दिले आहे.

कोण आहेत सिताराम येचूरी ?

  • सिताराम येचूरी यांचा जन्म चेन्नई येथे १२ ऑगस्ट १९५२ साली तामिळ ब्राम्हण कुटूंबात झाला.
  • १९७४ साली त्यांनी स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडियामध्ये सहभाग घेतला. त्यानंतर त्यांनी एका वर्षानंतर कम्युनिस्ट पार्टी इंडिया (मार्क्सवादी) पक्षात प्रवेश केला.
  • दिल्ली येथील प्रसिद्ध जवाहरलाल नेहरू विद्यापीठ अर्थात JNU मध्ये शिक्षण घेत असताना त्यांनी राजकीय व सामाजिक चळवळीत सहभाग घेतला. तेथूनच त्यांचा डाव्या राजकीय विचारसरणीचा राजकीय प्रवास सुरू झाला.
  • सिताराम येचूरी यांनी अर्थशास्त्रात मास्टर्स ही पदवी संपादन केली होती.
  • पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी घोषित केलेल्या आणीबाणीला त्यांनी कडाडून विरोध केला होता. यामुळे त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली होती. यामुळे त्यांचे PHD चे शिक्षण अपुर्ण राहिले.
  • भारतीय राजकारणातील अतिशय अभ्यासू राजकीय नेता म्हणून त्यांना ओळखले जायचे, संसदेत त्यांनी केलेली अनेक भाषणे गाजली. रस्त्यावरच्या लढाईत ते नेहमी आग्रभागी असाचे. 
  • राज्यसभेचे खासदार म्हणून सिताराम येचूरी यांची कारकीर्द उल्लेखनीय अशी आहे.
  • २००५ साली ते पश्चिम बंगालमधून राज्यसभेवर निवडून गेले होते. १८ ऑगस्ट २०१७ पर्यंत सिताराम येचूरी हे खासदार होते. या काळात केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांना अनेक उत्कृष्ट संसदपटू म्हणून अनेकदा गौरविण्यात आले.
  • १९ एप्रिल २०१५ पासून सिताराम येचूरी हे भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे (मार्क्सवादी) सचिव म्हणून काम पाहत होते.
  • सिताराम येचूरी हे लेखक, विचारवंत, अर्थतज्ज्ञ,  पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते म्हणून जगभर ओळखले जात होते. त्यांनी लिहलेली अनेक पुस्तके गाजली आहेत.