BSNL launches Super Star Premium-2 FTTH Broadband Plan | बीएसएनएल देणार अवघ्या 949 रूपयात मिळणार 2 हजार जीबी डाटा
मुंबई : BSNL launches Super Star Premium-2 FTTH Broadband Plan | केंद्र सरकारची अधिकृत दूरसंचार कंपनी असलेल्या बीएसएनएल BSNL ने इंटरनेट वापरणाऱ्या ग्राहकांसाठी एक धमाकेदार योजना लाँच केली आहे. या योजनेअंतर्गत ग्राहकांना थेट दोन हजार जीबीचा डेटा, मोफत कॉलिंग व Zee 5, सोनी लिव्ह प्रीमियम सारख्या अनेक ओटीटी ॲप्सचे मोफत सबस्क्रिप्शन देखील दिले जाणार आहेत. हा प्लॅन 749 आणि 949 रुपये किंमतीत कंपनीकडून देण्यात आला आहे. (BSNL launches Super Star Premium-2 FTTH Broadband Plan 2000 GB of data for just Rs 949 )
सरकारी टेलिकॉम कंपनी BSNL ने इंटरनेट ग्राहकांसाठी भारत फायबर FTTH ब्रॉडबँड प्लॅन ही नवीन योजना लाँच केली आहे. 5 ऑक्टोबरपासून ही योजना लाईव्ह करण्यात आली आहे. अंदमान आणि निकोबार वगळता देशातील सर्व वापरकर्त्यांसाठी ही योजना लाँच करण्यात आली आहे.
749 रुपयांचा ब्रॉडबँड प्लॅन (BSNL Broadband plan of Rs 749)
BSNL कंपनीच्या या प्लॅनचे नाव सुपरस्टार प्रीमियम -1 प्लॅन असे आहे. या प्लॅनमध्ये कंपनी 100 Mbps च्या स्पीडने 1000 GB डेटा देत आहे. डेटा मर्यादा संपल्यानंतर प्लॅनमध्ये उपलब्ध इंटरनेट स्पीड 5Mbps असेल. या प्लॅनमध्ये कंपनी देशभरातील कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित फ्री कॉलिंग ऑफर करत आहे.
949 रुपयांचा ब्रॉडबँड प्लॅन (BSNL Broadband plan of Rs 949)
BSNL च्या या FTTH प्लॅनचे नाव सुपर स्टार प्रीमियम -2 असे आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला 150Mbps इंटरनेट स्पीड तसेच कंपनी इंटरनेट वापरासाठी 2000GB डेटा देत आहे. डेटा मर्यादा संपल्यानंतर, प्लॅनमध्ये उपलब्ध इंटरनेट स्पीड 10Mbps पर्यंत कमी होते. या प्लॅनमध्ये तुम्हाला देशभरातील कोणत्याही नेटवर्कसाठी अमर्यादित कॉलिंग मिळेल
कंपनी या दोन्ही प्लॅन्समघ्ये ग्राहकांना अनेक लोकप्रिय OTT ॲप्सचे फ्री सबस्क्रिप्शनसाठी बेनिफीट्स देखील देत आहे. या प्लॅनमध्ये सोनी लिव्ह प्रीमियम, झी 5 प्रीमियम आणि VOOT Select चे फ्री सबस्क्रिप्शन देखील देण्यात येत आहे. याशिवाय या प्लॅनमध्ये Yupp TVचा फ्री एक्सेस देखील दिला जात आहे. बीएसएनएलच्या या दोन्ही प्लॅनसाठी, वापरकर्त्यांना किमान एक महिन्याचे सेक्युरिटी डिपॉझिट भरावे लागेल याशिवाय या प्लॅनचे एक महिन्याचे सबस्क्रिप्शन घ्यावे लागेल असे कंपनीकडून सांगण्यात आले आहे.