CAA News Today : CAA कायद्याबाबत गृहमंत्री अमित शहा यांची मोठी घोषणा !

नवी दिल्ली : CAA कायद्याबाबत केंद्रीय गृह मंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी शनिवारी मोठी घोषणा केली आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी देशात CAA लागु करण्याची आधिसुचना जारी करून कायदा लागु केला जाईल, अशी घोषणा अमित शहा यांनी एका कार्यक्रमात बोलताना केली. (CAA News Today)

CAA News Today, Breaking News Home Minister Amit Shah big announcement regarding CAA Act,

CAA कायद्यावरून देशात मोठे वादंग उठले होते. सरकारने पुन्हा एकदा CAA लागु करण्याबाबत पुन्हा एकदा सरकारने पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे. याबाबत गृहमंत्री अमित शहा यांनी आपली भूमिका मांडली आहे, CAA लागु केल्यानंतर कोणत्याही व्यक्तीची नागरिकता काढून घेतली जाणार नाही. धार्मिक छळाचा सामना करत असलेल्या पाकिस्तानी, अफगाणीस्तानी आणि बांग्लादेशी अल्पसंख्याकांना नागरिकता देणे हा मुख्य उद्देश आहे असे शहा यांनी स्पष्ट केले.

अमित शाह पुढे म्हणाले की, शेजारच्या देशातील पीडित अल्पसंख्यांक नागरिकांना नागरिकदा देण्याचे वचन काँग्रेसने दिले होते. ते म्हणाले की, जेव्हा देशाचे विभाजन झाले होते तेव्हा तेथे अल्पसंख्यांकांचा छळ केला जात होता. त्यावेळी सर्वांना भारतात पळून यायचे होते, तेव्हा काँग्रेसने तु्म्ही या, तुम्हाला नागरिकता दिली जाईल असे सांगितले होते.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी विरोधक मुस्लिमांची दिशाभूल करत असल्याचा आरोप देखील केला. शाह म्हणाले की, आपल्या मुस्लिम बांधवांना सीएएबद्दल मुस्लिम बांधवांची दिशाभूल केली जात आहे. त्याना चिथावणी दिली जात आहे. सीएए केवळ पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेशातील धार्मिक अल्पसंख्याकांना नागरिकत्व देण्यासाठी आहे. ते म्हणाले की, नरेंद्र मोदी सरकारने सादर केलेल्या सीएएचे उद्दिष्ट हे 31 डिसेंबर 2014 पूर्वी बांगलादेश, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानातून आलेल्या हिंदू, शीख, जैन, बौद्ध, पारशी आणि ख्रिश्चनांसह छळ झालेल्या गैर-मुस्लिम स्थलांतरितांना भारतीय नागरिकत्व प्रदान करणे आहे. याबाबतचे वृत्त ANI वृत्तसंस्थेने दिले आहे.