धक्कादायक : गुजरातमध्ये नदीवरील केबल पुल कोसळला, 36 जणांचा मृत्यू, तर दुर्घटनेत 500 जण नदीत बुडाल्याची भीती !
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : Gujarat Morbi Cable Bridge Accident News । गुजरातमधून एक मोठी दुर्घटना समोर आली आहे. या धक्कादायक दुर्घटनेत नदीवरील केबल पुल तुटल्याने तब्बल 500 जण नदीत बुडाल्याने भीती व्यक्त केली जात आहे. घटनेची माहिती मिळताच प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य हाती घेतले आहे.NDRF टीम बचाव कार्यात उतरली आहे.
गुजरातमधील राजकोटच्या मोरबी येथील मच्छू नदीवर केबल पुल कोसळण्याची मोठी दुर्घटना आज घडली आहे. अपघाताच्या वेळी 400 ते 500 लोक पुलावर होते, अशी माहिती समोर येत आहे. केबल पुल तुटल्याने हे सर्वजण नदीत बुडाले आहेत.मच्छू नदीवरील केबल पुल हा खूप जूना आहे. काही दिवसांपूर्वीच त्याची दुरुस्ती करण्यात आली होती, तब्बल सात महिने हा पुल बंद होता.
परंतू पाच दिवसांपूर्वीच हा पूल नागरिकांसाठी खुला करण्यात आला होता, आज हा केबल पुल कोसळण्याची मोठी दुर्घटना घडली. पुल कोसळल्याने जवळपास 500 जण नदीच्या पाण्यात बुडाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. प्रशासन आणि स्थानिकांकडून घटनास्थळी वेगाने बचाव कार्य सुरु आहे.
या दुर्घटनेत 36 च्या आसपास लोकांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. दरम्यान या दुर्घटनेत किती लोक नदीत कोसळले याची निश्चित आकडेवारी प्रशासनाने जाहीर केलेली नाही. दरम्यान या अपघातानंतर घटनास्थळाचे अनेक फोटो सोशल मिडीयावर व्हायरल झाले आहेत, तसेच घटनास्थळाचे व्हिडीओ ही समोर आले आहेत. घटनास्थळाहून समोर आलेल्या फोटोतून संबंधित केबल पुल मधूनच तुटल्याचे दिसत आहे. अनेक जन मधोमध अडकल्याचेही फोटोत दिसत आहे.
ब्रेकिंग: गुजरातमधील मोरबी केबल पूल दुर्घटनेत 60 हून अधिक मृतदेह बाहेर काढण्यात आले, त्यापैकी अधिक मुले, महिला आणि वृद्ध आहेत. उर्वरितांची सुटका करण्यात आली आहे; एनडीआरएफचे बचावकार्य सुरू आहे. आम्ही हे प्रकरण अतिशय गांभीर्याने घेत आहोत, हे अत्यंत दुःखद आहे अशी माहिती, राजकोटचे भाजप खासदार मोहनभाई कल्याणजी कुंडारिया यांनी आज रात्री 10 वाजता माध्यमांशी बोलताना दिली.