Ind vs Eng 3rd Test Highlights : यशस्वी जयस्वालचे शानदार शतक, शुभम गिलचे अर्धशतक, भारताने इंग्लंड विरुद्ध घेतली 322 धावांची आघाडी, तिसरी कसोटी रोमांचक स्थितीत
- हायलाईट्स Ind vs Eng 3rd Test Highlights
- भारत विरुद्ध इंग्लंड तिसरा कसोटी सामना (Ind vs End 3rd Test)
- इंग्लंडचा पहिला डाव 319 धावांवर अटोपला
- मोहम्मद सिराजने घेतले चार बळी
- बेन डकेटने झळकावले दीडशतक
- भारताच्या दुसर्या डावात 2 बाद 196 धावा
- यशस्वी जयस्वालचे दमदार शतक
- शुभम गिलचे अर्धशतक
- भारताने घेतली 322 धावांची आघाडी
Ind vs Eng 3rd Test Highlights : राजकोट येथे खेळवल्या जात असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्याचा आजचा तिसरा दिवस मोहम्मद सिराज Mohammad Siraj , यशस्वी जयस्वाल Yashasvi Jaiswal आणि शुभमन गिलने Shubham Gill गाजवला. तत्पुर्वी इंग्लंडचा पहिला डाव 319 धावांवर अटोपला. वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज हा भारताकडून सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने चार बळी घेतले. भारताने दुसर्या डावांत 2 बाद 196 धावा फलकावर लावल्या आहेत. भारताकडे आता 322 धावांची आघाडी झाली आहे.
तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरु झाल्यानंतर भारताचा आघाडीचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने भेदक मारा करत इंग्लंडचे कंबरडे मोडले. त्याने चार विकेट्स घेतल्या. इंग्लंडचा नाबाद शतकवीर बेन डकेट तिसऱ्या दिवशी मोठी धावसंख्या उभारू शकला नाही. तो 153 धावांवर बाद झाला. त्यानंतर इंग्लंडचे फलंदाज ठराविक अंतराने बाद झाले. बेन डकेटनंतर बेन स्टोक्सने थोडी झुंज दिली. तो 41 धावांवर बाद झाला.मोहम्मद सिराज हा तिसऱ्या दिवसाचा हिरो ठरला.त्याने 4 विकेट्स घेतल्या. तर रविंद्र जडेजा 2, कुलदीप यादव 2, बुमराह 1, आश्विन 1 यांनी त्याला साथ दिली. (Ind vs Eng 3rd Test Highlights)
भारताच्या 445 धावांचा पाठलाग करताना इंग्लंडने पहिल्या डावांत 319 धावा केल्या. इंग्लंडचा पहिला डाव संपल्यानंतर भारताने दुसर्या डावाला सुरुवात केली.कर्णधार रोहित शर्मा आज लवकर बाद झाला.त्यानंतर मैदानावर आलेल्या शुभमन गिल सोबत भारताचा आक्रमक सलामीवीर यशस्वी जयस्वाल याने 161 धावांची भागीदारी केली. या भागीदारीत जयस्वालने दमदार शतक झळकावले. तो 104 धावांवर निवृत्त झाला. त्याच्यानंतर रजत पाटीदार मैदानात आला खरा पण आल्यापावलीच माघारी गेला. त्याला टाॅम हार्टलीने शून्यावर बाद केले. त्याच्यानंतर कुलदीप यादव हा नाईट वाॅचमन म्हणून मैदानात आला. (Ind vs Eng 3rd Test Highlights)
Ind vs Eng 3rd Test Highlights : भारताकडे 322 धावांची आघाडी
भारताच्या दुसर्या डावांत शुभमन गिल याने अर्धशतक झळकावले. तो 65 धावांवर नाबाद आहे तर कुलदीप यादव हा 3 धावांवर नाबाद आहे. तिसऱ्या दिवसअखेर भारताने आपल्या दुसर्या डावांत 2 बाद 196 धावा केल्या आहेत. भारताकडे 322 धावांची आघाडी आहे. उद्या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारत आणखीन किती धावा करणार याकडे सर्वांचेच लक्ष असणार आहे. भारतीय फलंदाज आणि गोलंदाजांनी जबरदस्त कामगिरी केल्यामुळे तिसरी कसोटी रंगतदार अवस्थेत पोहचली आहे. तिसरी कसोटी जिंकून मालिकेत आघाडी घेण्यासाठी भारतीय संघातील खेळाडू आतुर झाले आहेत. (Ind vs Eng 3rd Test Highlights)