Commonwealth Games 2022 । शानदार.. जबरदस्त… अभिमानास्पद.. भारताच्या मीराबाई चानूने 2022 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले

Commonwealth Games 2022 । भारताच्या मीराबाई चानूने 2022 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. (Mirabai Wins Gold medal) पटकावत पुन्हा एकदा नवा इतिहास रचला. कॉमनवेल्थ गेम्स 2022मध्ये भारतीय वेटलिफ्टर्सकडूून जबरदस्त कामगिरी सुरू आहे.कॉमनवेल्थमध्ये आज एकाच दिवसातील भारताचं हे तिसरं पदक आहे. मीराबाईने 49 किलो वजनी गटात सुवर्णपदक मिळवलं आहे.

यंदाच्या कॉमनवेल्थमध्ये भारतीय वेटलिफ्टर जबरदस्त फॉर्ममध्ये दिसत आहेत. आजच्या दिवसात भारताने मिळवलेलं हे तिसरं पदक आहे. आधी संकेत सरगर (Sanket Sargar) मग गुरुराज पुजारी (Gururaj Pujari) यांनी अनुक्रमे रौप्य आणि मग कांस्य पदक मिळवलं.

इंग्लंडच्या बर्मिंगहममध्ये सुरु कॉमनवेल्थ स्पर्धेत (Commonwealth Games 2022) भारताने आज दिवसभरात तीन पदकं मिळवली आहे. सर्वात आधी 55 किलो वजनी गटात एकूण 248 किलोग्राम वजन उचलत सांगलीच्या संकेत सरगर याने रौप्य पदक मिळवलं.

त्यानंतर आता 61 किलो वजनी गटात एकूण 269 किलोग्राम वजन उचलत गुरुराजा पुजारी याने कांस्य पदक मिळवलं आहे. त्यानंतर मीराबाई चानूने 49 किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावले. त्यामुळे स्पर्धेच्या दुसऱ्याच दिवशी भारताने वेटलिफ्टिंगमध्ये तीन पदकांना गवसणी घातली आहे.