हुश्श ! अखेर दीड तासानंतर फेसबुक व इन्स्टाग्राम पुन्हा सुरू, जगभरातील नेटीझन्सने टाकला सुटकेचा निःश्वास, फेसबुक आणि इंस्टाग्राम बंद का पडलं होतं? जाणून घ्या
Facebook Instagram started again : मेटा या सोशल मीडिया कंपनीचे लोकप्रिय सोशल मीडिया साईट असलेल्या फेसबुक आणि इंस्टाग्राम हे गेल्या दीड दोन तासांपासून जगभरात डाऊन झाले होते.भारतात मंगळवारी सायंकाळी 9 नंतर फेसबुक आपोआप लाॅग आऊट झाल्याने नेटीझन्स हैराण झाले होते.अखेर फेसबुक निर्माता आणि मेटाचा संस्थापक मार्क झुकेरबर्ग याच्या टेक्नीकल टीमने वेगाने काम करत फेसबुक व इन्स्टाग्राम पूर्ववत केले. भारतासह जगभरात डाऊन झालेल फेसबुक आणि इंस्टाग्राम या सोशल मीडिया साईट पुन्हा सुरू झाल्याने नेटीझन्सनी सुटकेचा नि:श्वास टाकला.
फेसबुक आणि इन्स्टाग्राम हे दोन ॲप पुन्हा सुरू झाले आहे. काही काळासाठी सर्व फेसबुक अकाउंट बंद झाले होते. आता ते पुन्हा सुरू झाले आहे. फेसबुक बंद पडल्याने जगभरातील नेटीझन्स हैराण झाले होते. परंतू आता फेसबुक आणि इन्स्टाग्राम पुन्हा सुरू झाल्यानंंतर अनेकांंनी सोशल मिडियावर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
सुरुवातीला युजर्सला वाटलं की केवळ त्यांचेच अकाउंट बंद पडले आहे की काय पण युजर्सनी एकमेकांंना फोन करुन किंवा मेसेज करुन याबाबत विचारणा केल्यावर लक्षात आले की मेटा कंपनीच्या या दोन्ही ॲपमध्ये तांत्रिक समस्या उद्भवल्यानंंतर दोन्ही ॲप्स बंद पडले होते.
दीड ते दोन तासानंतर फेसबुक व इन्स्टाग्राम पुन्हा सुरू झाले. त्यानंतर युजर्सनी समाधान व्यक्त केले आहे. अनेकांनी आपल्या भावना फेसबुकवर पोस्ट केल्या आहेत. काही युजर्सने मिम्सद्वारे भावना व्यक्त केल्या.
मेटा कंपनीतर्फे फेसबुक आणि इंस्टाग्राम हे दोन्ही प्लॅटफॉर्म चालवले जातात. मंगळवारी सायंकाळी 9 नंतर हे दोन्ही सोशल मीडिया ऍप जगभरात बंद पडले होते. जगातील अनेक देशांना याचा फटका बसला. भारतातही अनेक शहरात फेसबुक आणि इन्स्टाग्राम बंद पडलं होतंं. सोशल मीडियावरील लाखो युजर्स याबाबतीत तक्रार करताना दिसले.
दरम्यान फेसबुकने X या सोशल मिडीया साईटवर पोस्ट केली आहे, त्यात म्हटले आहे की, आम्ही परत आलो आहोत, आज ज्यांना फेसबुक मध्ये प्रवेश करता आला नाही त्याबद्दल क्षमस्व (And we’re back 💙 So sorry for those who were unable to access Facebook earlier today.) परंतू फेसबुक आणि इंस्टाग्राम काम डाऊन झालं होतं याबाबत फेसबुककडून अधिकृत माहिती जारी करण्यात आली नाही.