फटाक्यांचा दुचाकीवर भीषण स्फोट : बाप लेक जागीच ठार ! 

मुंबई  : सध्या सर्वत्र दिवाळीचा उत्साह शिगेला पोहचला आहे. सर्वत्र आनंदी आणि उत्साहाचे वातावरण आहे. दिवाळी फराळाच्या मेजवानीची धूम सुरू आहे अश्यातच आज एक दु:खद बातमी समोर आली आहे.

पुद्दुचेरीमध्ये स्कूटरवरून फटाके घेऊन जात असतानाच या फटाक्यांचा भीषण स्फोट झाल्याने बाप लेकाचा जागीच मृत्यू झाला आहे. वडिलांचे नाव कलईनैसन आणि मुलाचे नाव प्रदीप असल्याचे समोर आले आहे. या दु:खद घटनेमुळे देशभरात हळहळ व्यक्त होत आहे. (Firecrackers explode on a two wheeler, killing two people Puducherry)

मिळालेल्या माहितीनुसार विल्लुपुरम जिल्ह्यातील कोट्टाकुप्पममध्ये पिता पुत्र एका स्कूटरवरून फटाक्यांनी भरलेल्या दोन पिशव्या घेऊन जात होते. तेव्हा रस्त्यातच या फटाक्यांचा स्फोट झाला. हा स्फोट इतका भीषण होता की त्यात पिता पुत्रांचा जागीच मृत्यू झाला. दोघांच्या मृतदेहांचे तुकडे तुकडे झाले आणि रस्त्यावर विखुरले गेले.

या स्फोटात जवळील तीन दुचाकीस्वार जखमी झाले आहेत. त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून त्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. दरम्यान या फटाक्यांचा स्फोट कशामुळे झाला याचे कारण समोर आलेले नाही.

पहा घटनेचा थरारक व्हिडिओ ⤵️