Prime Minister’s National Children’s Award 2022 | अभिमानास्पद ! महाराष्ट्रातील चार बालकांचा प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्काराने गौरव
नवी दिल्ली । Prime Minister’s National Children’s Award 2022। केंद्र सरकारने यंदा देशातील 29 मुलांना बाल पुरस्कार देऊन गौरव केला.यात महाराष्ट्रातील चौघांचा समावेश आहे. क्रीडा, कला, नवसंशोधन, संस्कृती आणि शौर्य या क्षेत्रात अतुलनीय कार्य करणाऱ्या मुलांना बाल पुरस्कार देण्यात आले. पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार विजेत्यांना एक लाख रूपये रोख पारितोषिक देखील देण्यात आले.
विविध क्षेत्रात आपल्या कतृर्त्वाचा ठसा उमटवत लक्ष वेधून घेणाऱ्या बालकांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यात महाराष्ट्रातील जळगाव येथील शिवांगी काळे (वीरता श्रेणी), पुण्याची जुई केसकर (नव संशोधन श्रेणी), मुंबईतील जिया राय, नाशिकचा स्वयंम पाटील स्वयंम पाटील (क्रिडा श्रेणी) या चौघांचा समावेश आहे. (Prime Minister’s National Children’s Award 2022)
शौर्य दाखवण्याबरोबरच विविध क्षेत्रात उल्लेखनीय शोधकार्य करणाऱ्या देशभरातील बालकांना पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्काराने गौरवण्यात येते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत सोमवारी (24 जानेवारी) रोजी हा कार्यक्रम पार पडला. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या या कार्यक्रमात बालकांना पुरस्कार देत पंतप्रधानांनी गौरव केला. (Prime Minister’s National Children’s Award 2022)
अभिनव तंत्रज्ञान, समाजसेवा, शैक्षणिक क्षेत्र, क्रीडा, कला आणि संस्कृती आणि शौर्य या सहा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मुलांना हा पुरस्कार देण्यात आला. यावर्षी देशभरातील 29 मुलांची निवड करण्यात आली होती. यामध्ये 21 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील 15 मुले आणि 14 मुलींचा समावेश असून, महाराष्ट्रातील चौघांचा गौरव करण्यात आला.
जळगाव येथील शिवांगी काळे (शौर्य श्रेणी), पुण्याची जुई केसकर (नवसंशोधन श्रेणी), मुंबईतील जिया राय, नाशिकचा स्वयंम पाटील (क्रीडा श्रेणी) यांना प्रधानमंत्री राष्ट्रीय बालपुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. यावर्षी प्रथमच विजेत्यांना ब्लॉकचेन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून डिजिटल प्रमाणपत्रं देण्यात आली.
पंतप्रधान राष्ट्रीय बालपुरस्कार विजेत्या चिमुकल्यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाठ थोपटली. प्रधानमंत्री राष्ट्रीय बालपुरस्कार मिळाल्याबद्दल जळगाव येथील शिवांगी काळे, पुण्याची जुई केसकर, मुंबईतील जिया राय, नाशिकचा स्वयंम पाटील यांचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिनंदन केलं.
जळगाव येथील शिवांगीला तिने दाखवलेल्या धाडसाबद्दल शौर्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. शिवांगीने वयाच्या सहा वर्षाच्या प्रसंगावधान राखत आपल्या आईचा जीव वाचवला होता. शिवांगीच्या आईला शॉक लागला होता. शिवांगीने धाडस दाखवत आईचे प्राण वाचवले होते. तिचा या धाडसाची दखल घेऊन तिला बाल शौर्य पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
पुण्याच्या जुईला तिने लावलेल्या शोधाबद्दल पुरस्कार देण्यात आला. जुईने पार्किसन आजार झालेल्या रुग्णांसाठी एक यंत्र तयार केलं आहे. तर स्वयंम पाटीलने क्रीडा क्षेत्रात केलेल्या कामगिरीबद्दल गौरवण्यात आलं. स्वयंमने 10 वर्षाचा असताना 5 किमी, तर 13 वर्षांचा असताना 14 किमी पोहत जागतिक विक्रम केला आहे.
प्रधान मंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार 2022 विजेत्यांची संपूर्ण यादी (Prime Minister National Children’s Award 2022 winners list)
- गौरी माहेश्वरी – कला आणि संस्कृती (राजस्थान)
- अन्वी विजय झांझारुकिया – स्पोर्ट्स (गुजरात)
- रेमोना इव्हेट परेरा – कला आणि संस्कृती (कर्नाटक)
- देवीप्रसाद – कला आणि संस्कृती (केरळ)
- सय्यद फतीन अहमद – कला आणि संस्कृती (कर्नाटक)
- डौलस लांबमायुम – कला आणि संस्कृती (मणिपूर)
- धृतिशमन चक्रवर्ती कला आणि संस्कृती (आसाम)
- गुरुगु हिमप्रिया – शौर्य (आंध्र प्रदेश)
- शिवांगी काळे – शौर्य (महाराष्ट्र)
- धीरज कुमार – शौर्य (बिहार)
- शिवम रावत – इनोव्हेशन (उत्तराखंड)
- विशालिनी एन सी – इनोव्हेशन (तामिळनाडू)
- जुई अभिजित केसकर – इनोव्हेशन (महाराष्ट्र)
- पुहाबी चक्रवर्ती – अभिनव (त्रिपुरा)
- अस्वथा बिजू – इनोव्हेशन (तामिळनाडू)
- बनिता डॅश – इनोव्हेशन (ओडिशा)
- तनिश सेठी – इनोव्हेशन (हरियाणा)
- अवि शर्मा – स्कॉलस्टिक (मध्य प्रदेश)
- मीधांश कुमार गुप्ता – समाजसेवा (पंजाब)
- अभिनव कुमार चौधरी – समाजसेवा (उत्तर प्रदेश)
- पाल साक्षी – समाजसेवा (बिहार)
- जिया राय क्रीडा (महाराष्ट्र)
- आकर्ष कौशल – सामाजिक सेवा (हरियाणा)
- आरुषी कोतवाल – स्पोर्ट्स (जम्मू आणि काश्मीर)
- श्रिया लोहिया – स्पोर्ट्स (हिमाचल प्रदेश)
- तेलुकुंता विराट चंद्र – क्रीडा (तेलंगणा)
- चंद्ररी सिंग चौधरी – क्रीडा (उत्तर प्रदेश)
- स्वयं पाटील – क्रीडा (महाराष्ट्र)
- तरुषी गौर – क्रीडा (चंदीगड)
Four children from Maharashtra receive Prime Minister’s National Children’s Award 2022, Shivangi Kale Jalgaon, Swayam Patil Nashik, Jui Keskar Pune, Jiya Rai Mumbai,Prime Minister National Children’s Award 2022 winners list