Gold Price Today | सोने आणि चांदीच्या दरात मोठी घट : जाणून घ्या 24 September चे दर !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था |  Gold price today | देशात सलग तिसऱ्या आठवड्यात सोने आणि चांदीच्या किमतीत मोठी घट झालीय. कमकुवत आर्थिक आकडेवारी आणि जागतिक वाढीच्या संकटामुळे देशांतर्गत शेअर बाजारात शुक्रवारी सोने आणि चांदीमध्ये प्रचंड घसरण झाली आहे. सोने खरेदीसाठी इच्छूक असलेल्या ग्राहकांसाठी मात्र ही चांगली संधी आहे.

10 ग्रॅम सोन्याची किंमत 46,000 च्या खाली गेलीय. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर ऑक्टोबर फ्युचर्स सोन्याची किंमत 0.29 टक्के खाली आहे. चांदीही सोन्याच्या मार्गावर राहिलीय. डिसेंबर वायदे चांदीच्या किमतीत 0.36 टक्क्यांनी घट झालीय.

सोने आणि चांदीची आजची नवीन किंमत (Gold Silver Price on 24 September 2021)

मल्टी कमोडिटी एक्स्चेंजमध्ये शुक्रवारी 10 ग्रॅम सोन्याचा भाव 134 रुपयांनी घसरून 45,922 रुपयांवर आला. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची किंमत 1746.84 डॉलर प्रति औंस होती. त्याचबरोबर एमसीएक्सवरील डिसेंबर वायदा चांदी 220 रुपयांनी घसरून 60,569 रुपये प्रति किलो झाली. आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीची किंमत 22.61 डॉलर प्रति औंस होती.

2020 मध्ये कोविड 19 च्या निर्बंधांमुळे रत्ने आणि दागिने उद्योगाने या वर्षी जानेवारी-मार्चमध्ये पुनर्प्राप्तीचे संकेत दिले होते. साथीच्या दुसऱ्या लाटेने ते थांबवले. दुसरी लाट कमी झाल्यामुळे राज्य सरकार हळूहळू हालचालीवरील निर्बंध कमी करत आहेत आणि संघटित किरकोळ विक्रेत्यांना अपेक्षा आहे की, यावर्षी सणासुदीच्या काळात ग्राहकांची मागणी चांगली राहील.

मार्केट रिसर्च फर्म YouGovs च्या दिवाळी खर्च निर्देशांकानुसार, सणासुदीच्या काळात शहरी भारतीयांमध्ये खर्च वाढत आहे आणि दहापैकी तीन शहरी भारतीय (28%) पुढील तीन महिन्यांत सोन्यावर खर्च करण्याची योजना आखत आहेत. भारतातील प्रौढ ऑनलाईन लोकसंख्येचे प्रतिनिधित्व करणाऱ्या देशभरातील 2,021 प्रतिसादकर्त्यांकडून 17-20 ऑगस्टदरम्यान यू-गव्ह बॉम्निबसद्वारे दिवाळी खर्च निर्देशांकाचा डेटा ऑनलाईन गोळा केला गेला.

सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की, या संभाव्य सोने खरेदीदारांपैकी 69 टक्के लोकांचा असा विश्वास होता की, दिवाळी आणि सणासुदीला सोने खरेदी करण्याचा सर्वोत्तम काळ आहे, जे सणासुदीच्या काळात खर्च करण्याची त्यांची प्रवृत्ती दर्शवते.

(सोने व चांदीचे दर दुपारपर्यंतचे आहेत. दुपारनंतर अजुन बदल होऊ शकतो.)

web title: Gold price today 24 September 2021