जामखेड टाइम्स वृत्तसेवा : मान्सून भारतात कधी दाखल होणार याची प्रतीक्षा रविवारी संपली. मान्सूनने केेरळमध्ये धडक मारली आहे.मान्सून केरळमध्ये दाखल झाल्यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण पसरले आहे. (Good news for farmers, Monsoon finally arrives in Kerala today )
भारतीय हवामान विभागाने मान्सून केरळमध्ये दाखल झाल्याची माहिती रविवारी जाहीर केली. यंदा वेळेआधी केरळमध्ये मान्सूनचे आगमन झाले आहे.
1 जून रोजी केरळमध्ये मान्सून दाखल होईल असा अंदाज हवामान विभागाने याआधी वर्तवला होता, मात्र त्याआधीच 29 मे रोजी केरळमध्ये मान्सून दाखल झाला आहे.
सोमवारपासून राज्याच्या काही भागात सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.या अंदाजानुसार कोकण, मध्यमहाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या दक्षिण भागात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस होण्याचा अंदाज आहे.
दरम्यान हवामान विभागाचे शास्त्रज्ञ के.एस होसाळीकर यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे कि, मान्सून केरळमधील मदुराई, पालकड, कननुर या भागात दाखल झाला आहे.