great indian festival sale 2021 मुंबई : शाॅपिंग क्षेत्रातील ॲमेझाॅन इंडिया (Amazon) व प्लिपकार्ट (Flipkart) या दोन कंपन्यांच्या मेगा सेलची दणक्यात सुरूवात झाली आहे.देशातील छोट्या शहरांमधून या सेलला मोठा प्रतिसाद मिळत आहे.दोन्ही सेल 03 ऑक्टोबरपासून सुरू झाले आहेत.
फ्लिपकार्टने ‘द बिग बिलियन डेज’ (the big billion days flipkart 2021) हा सेल लाँच केला आहे. हा सेल 03 ऑक्टोबर 2021 पासुन 10 ऑक्टोबर पर्यंत असणार आहे. प्लिपकार्टच्या प्लिपकार्ट प्लस (Flipkart Plus) योजनेला मागील वर्षांपेक्षा यंदा 40% अधिक प्रतिसाद मिळत आहे. यातील 45% वाटा छोट्या शहरांचा आहे.
तर ॲमेझाॅनने ग्रेट इंडियन फेस्टिव्हल (great indian festival sale 2021) हा सेल लाँच केला आहे.हा सेल 03 ऑक्टोबर 2021पासुन महिनाभर सुरू राहणार आहे. दिवाळीची खरेदी करण्यासाठी ग्राहकांना मोठी संधी यातून मिळू शकणार आहे.सेल सुरू होताच ॲमेझाॅनची एका दिवसातली विक्री 60% वाढली आहे .
ॲमेझाॅन व फ्लिपकार्ट या दोन दिग्गज कंपन्यांनी आपल्या सेलमध्ये विविध उत्पादनावर भरघोस सुट दिलेली आहे. ऐन सणासुदीच्या तोंडावर हे सेल सुरू झाल्याने ग्राहकांना कमी बजेटमध्ये चांगली उत्पादने खरेदी करण्याची संधी आहे. जास्तीत जास्त ग्राहक आता या कंपन्यांच्या सेलचा फायदा उचलताना दिसत आहेत.