Nafe Singh Rathi : 40-50 राऊंड फायरिंग करत माजी आमदाराची हत्या, माजी आमदार नफे सिंग राठी यांच्या हत्याकांडाने उडाली देशात खळबळ !

INLD Nafe Singh Rathi : राजकीय हत्याकांडांच्या एका खळबळजनक घटनेने रविवारी संपुर्ण देश हादरला. रविवारी हरियाणात एका माजी आमदाराची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. या घटनेने संपुर्ण देशभर खळबळ उडवून दिली आहे.हरयाणाचे माजी मुख्यमंत्री ओम प्रकाश चौटाला यांच्या इंडियन नॅशनल लोक दल पक्षाचे (INLD) चे प्रदेशाध्यक्ष आणि बहादुरगडचे माजी आमदार नफे सिंग राठी (Nafe Singh Rathi murder) यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. हल्लेखोरांनी 40-50 राऊंड फायरिंग केल्याचे सांगितले जात आहे. (Nafe singh rathee)

Hariyana former MLA was killed by firing 40-50 rounds, murder of former MLA Nafe Singh Rathi has created excitement in india, State President of Indian National Lok Dal Party INLD Nafe Singh rathee,

नफे सिंग राठी यांच्यासह चार जण हल्ल्यात गंभीर जखमी झाले होते. तीन सुरक्षा कर्मचाऱ्यांनाही गोळ्या लागल्या. जखमी अवस्थेत नफे सिंग राठी यांचा रुग्णालयात मृत्यू झाला. ते माजी आमदारही होते. इंडियन नॅशनल लोक दलाने त्यांच्या मृत्यूला वृत्ताला दुजोरा दिला आहे. ही घटना बाराही गेटजवळ घडली. हल्लेखोर आय-10 वाहनातून आले होते. नफे सिंग राठी यांच्या गाडीवर गोळ्या झाडण्यात आल्या. सर्वांना गंभीर अवस्थेत ब्रह्मशक्ती संजीवनी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथेच नफे सिंग राठी यांचा मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, INLD प्रदेशाध्यक्ष नफे सिंग यांच्यावर झालेला हल्ला हा सुनियोजित हल्ला होता. या गोळीबारात तीन सुरक्षा कर्मचारीही गंभीर जखमी झाले आहेत. लॉरेन्स बिश्नोई टोळीचा पोलिसांना संशय आहे. कारमधून आलेल्या काही हल्लेखोरांनी राठी आणि त्यांच्या तीन बंदूकधारी सुरक्षारक्षकांवर गोळीबार केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कारच्या पुढील सीटवर बसलेले राठी आणि त्यांचे तीन बंदूकधारी गोळीबारात जखमी झाले. घटनेनंतर हल्लेखोर त्यांच्या कारमध्ये बसून फरार झाले.

INLD च्या मीडिया सेलचे प्रभारी राकेश सिहाग यांनी नफे सिंग राठी यांच्या मृत्यूला दुजोरा दिला आहे. राठी यांच्या कमरेला आणि मानेला गोळ्या लागल्या होत्या. हल्ल्याच्या वेळी राठी त्यांच्या फॉर्च्युनर कारमधून प्रवास करत होते, तर हल्लेखोर आय-20 कारमधून आले होते. झज्जरचे एसपी अर्पित जैन यांनी सांगितले की, या प्रकरणी गुन्हे अन्वेषण एजन्सी (सीआयए) आणि स्पेशल टास्क फोर्स (एसटीएफ) तैनात करण्यात आले आहेत. या घटनेमागे गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई आणि त्याचा जवळचा सहकारी कला जाठेदी यांचा हात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. प्राथमिक तपासात मालमत्तेचा वाद हा हत्येमागे असल्याचे बोलले जात आहे.

इंडियन नॅशनल जनता दलाच्या प्रवक्ते अमनदीप यांनी दिलेल्या माहितीनुसार नफे सिंह राठी यांना गेल्या काही दिवासांपासून वारंवार जिवे मारण्याच्या धमक्या येत होत्या. त्यावर त्यांनी हरियाणा सरकारकडे राठी यांच्यासाठी सुरक्षा देण्याची मागणी केली होती. परंतु, ती मिळाली नाही. दरम्यान, रविवारी राठी यांच्यावर अज्ञातांकडून बेछुट गोळीबार करण्यात आला. हल्ल्या झाला त्यावेळी राठी हे आपल्या वाहनातून जात होते. त्याचवेळी आय टेन या कारमधून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी राठी यांच्या वाहनावर गोळीबार केला. यामध्ये राठी हे गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

राठी हे दोन टर्म विधानसभेचे सदस्य राहिले आहेत. तसेच ते बहादुरगढ़ नगरपरिषदेचे नगराध्यक्ष म्हणूनही काम पाहिले आहे. या हल्ल्यात राठी यांच्या एका साथीदाराचाही मृत्यू झाला आहे. त्यांचे वाहन बाराही गेटमधून जात असताना हा हल्ला झाला. या घटनेत राठी यांच्यासह चार जण जखमी झाले होते. त्यातील इतर तीन जण राठी यांचे सुरक्षा कर्मचारी असल्याचे सांगण्यात येत आहे.

या घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळावर दाखल झाले. त्यावेळी झज्जरचे पोलीस अधीक्षक अर्पित जैन यांनी या गोळीबार प्रकरणातील आरोपींचा अद्याप शोध लागला नसल्याची प्रतिक्रिया दिली. स्थानिक लोकांच्या माहितीनुसार हे हल्लेखोर आय-टेन या कारमधून आले होते. त्यांनी राठी यांच्या फॉर्च्युनर कारच्या चारही बाजूंनी गोळ्या झाडून कारची चाळण केली होती.

दरम्यान, हल्ल्यानंतर दोन वेळचे माजी आमदार नफे सिंह राठी आणि इतर जखमींना ब्रह्मशक्ती संजीवनी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. चार जखमींना रुग्णालयात आणण्यात आल्याचे डॉक्टर मनीष शर्मा यांनी सांगितले. मात्र जखमींपैकी दोन जणांचा मृत्यू झाला. तर दोन जणांवर आयसीयूमध्ये उपचार सुरु आहेत. त्यांच्या खांद्याला आणि मांडीला गोळ्या लागल्या आहेत. मृतांमध्ये माजी आमदार नफे सिंह आणि त्यांचे सुरक्षा रक्षक जय किशन यांचा समावेश आहे.

दुसरीकडे, नफे सिंह राठी त्यांच्या फॉर्च्युनर कारमधून प्रवास करत होते, असे सांगण्यात येत आहे. दरम्यान, आय-10 कारमधून हल्लेखोर त्यांचा पाठलाग करत होते. नफे सिंह यांची गाडी बाराही गेटजवळ पोहोचताच हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला. हल्लेखोरांनी किमान 40-50 राऊंड फायरिंग केल्याचे सांगितले जात आहे. समोर आलेल्या फुटेजमध्ये कारची संपूर्ण काच फुटल्याचे आणि कारवर गोळ्यांच्या खुणा असल्याचे दिसून आले.

दुसरीकडे, काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री भूपिंदर सिंग हुड्डा यांनी नफे सिंह यांच्या हत्येवरुन राज्यातील भाजप सरकारला निशण्यावर घेतले. हुड्डा यांनी नफे सिंह यांच्या हत्येवर शोक व्यक्त करत म्हटले की, “हरियाणामध्ये आयएनएलडीचे प्रदेशाध्यक्ष नफे सिंह राठी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची बातमी अतिशय दुःखद आहे. यातून राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती दिसून येते. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. आज राज्यात कोणीही सुरक्षित नाही. दिवंगत आत्म्याला माझ्याकडून श्रद्धांजली आणि कुटुंबाप्रती संवेदना…

” आम आदमी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सुशील गुप्ता यांनीही राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केला. गुप्ता म्हणाले की, राज्यात कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे ठप्प झाली आहे.