ICC T20 World Cup 2021 India vs Pakistan Scoreacard Live updates :  खराब सुरूवातीनंतर भारताने उभारली अव्हानात्मक धावसंख्या

ICC T20 World Cup 2021 India vs Pakistan Scoreacard Live updates : T20 विश्वचषक स्पर्धेत भारत विरूध्द पाकिस्तान या कट्टर पारंपरिक संघाच्या सामन्याला सुरूवात झाली पाकिस्तान संघाने नाणेफेक जिंकून गोलंदाजी घेतली होती. भारताची पहिल्या दहा षटकांत खराब सुरूवात झाली होती. मात्र शेवटच्या दहा षटकांत भारताने जोरदार फटकेबाजी करत अव्हानात्मक धावसंख्या उभारली.

प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या रोहित शर्मा व के एल राहुल यांनी डावाची सुरूवात केली.भारताच्या सलामीवीरांनी निराशा केली. त्यानंतर सुर्यकुमार यादवही स्वस्तात बाद झाला. कर्णधार विराट कोहली व ऋषभ पंत यांनी डाव सावरला. परंतु पंत मोठी खेळी खेळण्यात अपयशी ठरला. विराटने एकहाती फटकेबाजी केली.  विराट व पंत या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 53 धावांची भागीदारी केली. कोहलीच्या 49 चेंडूतील 57 धावांशिवाय रिषभ पंतने 30 चेंडूत 39 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली.

पाकिस्तानकडून शाहीन आफ्रिदीने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या. तर हसन अली 2 शदाब खान आणि हॅरिस रॉफ याने प्रत्येकी एक-एक विकेट घेतली. टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेतील दुसऱ्या गटातील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हायहोल्टेज सामना दुबईच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानात रंगला आहे. स्पर्धेतील सलामीच्या लढतीत पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला होता.भारताने 20 षटकांत 151 धावां केल्या.पाकिस्तान ला विजयासाठी 152  धावांचे भारताने लक्ष दिले आहे.

पाकिस्तानला कमी धावांत रोखण्यासाठी मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह हे वेगवान गोलंदाज निर्णायक भूमिका बजावतील. त्यांना वरूण चक्रवर्ती, रविंद्र जडेजा हे फिरकी गोलंदाज साथ देतील. हार्दीक पांड्याही गोलंदाजी करेल.

आजच्या सामन्यासाठी मैदानावर उतरलेले दोन्ही संघ खालीलप्रमाणे

भारतीय संघ

लोकेश राहुल, रोहित शर्मा, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, हार्दिक पांड्या रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार, वरुण चक्रवर्थी

India playing XI

Rohit Sharma, KL Rahul, Virat Kohli (c), Suryakumar Yadav, Rishabh Pant(w), Hardik Pandya, Ravindra Jadeja, Bhuvneshwar Kumar, Mohammed Shami, Varun Chakaravarthy, Jasprit Bumrah

पाकिस्तानी संघ

बाबर आजम, मोहम्मद रिझवान, फाखर जमान, मोहम्मद हाफिज, शोएब मलिक, आसीफ अली, इमाद वासीम, शाबाद खान, हसन अली, शाहिन आफ्रिदी, हॅरीस रौफ

Pakistan playing XI
Babar Azam, Mohammad Rizwan, Fakhar Zaman, Mohammad Hafeez, Shoaib Malik, Asif Ali, Imad Wasim, Shabad Khan, Hassan Ali, Shahin Afridi, Harris Rauf