Ind vs Eng 3rd test 2024 : राजकोट कसोटीत भारताच्या 445 धावांचा पाठलाग करताना इंग्लंडची दमदार सुरुवात, दुसऱ्या दिवस अखेर इंग्लंड 2 बाद 207

  • हायलाईट्स :
  • भारत विरुद्ध इंग्लंड तिसरा कसोटी सामना (Ind vs Eng 3rd test 2024)
  • भारताच्या पहिल्या डावात 445 धावा
  • रोहित शर्मा व जडेजाचे शतक, सर्फराज खानचे अर्धशतक
  • इंग्लंडच्या पहिल्या डावात 2 बाद 207 धावा
  • इंग्लंडकडून बेन डकेटचे शतक
  • आर आश्विनच्या 500 विकेट्स पुर्ण
Ind vs Eng 3rd test 2024,England made strong start chasing India's 445 runs in Rajkot Test, England 207 for 2 at the end of second day,

Ind vs Eng 3rd Test 2024 : गुजरातच्या राजकोटमध्ये भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात तिसरा कसोटी सामना सुरु आहे. भारताच्या 445धावांचा पाठलाग करताना इंग्लंडने दुसऱ्या दिवस अखेर 2 बाद 207 धावा केल्या. पहिल्या डावात इंग्लंडकडून बेन डकेटने आक्रमक खेळ करत शतक झळकावले. तो 133 धावांवर नाबाद आहे. तर त्याच्या साथीला जो रूट हा 9 धावांवर नाबाद आहे. (Ind vs Eng 3rd test 2024)

भारताने पहिल्या डावांत रोहित शर्मा, रविंद्र जडेजा यांची शतके आणि सर्फराज खानचे अर्धशतक व ध्रुव जुरेलच्या महत्वपूर्ण 46 धावांच्या बळावर 445 धावा केला. इंग्लंड विरूध्द सुरु असलेल्या कसोटी मालिकेतील सर्वोच्च धावसंख्या भारताने आज नोंदवली. दुपारनंतर फलंदाजीस उतरलेल्या इंग्लंड फलंदाजांनी आक्रमक सुरुवात केली. 89 धावांवर जॅक क्राॅली हा आश्विनचा शिकार ठरला. त्याने 15 धावा केल्या. जॅक क्राॅली हा आश्विनचा पाचशेवा बळी ठरला. (Ind vs Eng 3rd test 2024)

Ind vs Eng 3rd test 2024,England made strong start chasing India's 445 runs in Rajkot Test, England 207 for 2 at the end of second day,

Ind vs Eng 3rd test 2024 : इंग्लंड अजून 238 धावांनी मागे

जॅक क्राॅली आऊट झाल्यानंतर ओलिस पोप मैदानावर आला. त्याने बेन डकेटच्या साथीने 93 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. ही जोडी भारतीय संघासाठी धोकादायक ठरू पाहत असतानाच मोहम्मद सिराजने ओलिस पोप ला पायचीत आऊट करत माघारी धाडले. दुसर्‍या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा बेन डकेट 133 धावांवर नाबाद होता. तर जो रूट हा 9 धावांवर नाबाद आहे. भारताकडून आर आश्विनने एक व मोहम्मद सिराजने एक विकेट घेतली. (Ind vs Eng 3rd test 2024)

भारताने पहिल्या डावांत 445 धावा बनवल्या. इंग्लंडने पहिल्या डावात 207 धावा केल्या आहेत. तिसऱ्या दिवशी इंग्लंडला लवकर बाद करण्यासाठी भारतीय बाॅलर्सना मोठी मेहनत.घ्यावी लागणार आहे. इंग्लंड अजूनही 238 धावांनी मागे आहे. तिसऱ्या दिवशी फिरकी गोलंदाज काय कमाल दाखवणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. (Ind vs Eng 3rd test 2024)

भारताकडून ऑफ स्पिनर आर आश्विनने पाचशे विकेट्स पुर्ण करण्याची ऐतिहासिक कामगिरी आज केली. भारताकडून सर्वाधिक टेस्ट विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजामध्ये आश्विनचा दुसरा क्रमांक आला आहे. पहिल्या क्रमांकावर भारताचे महान फिरकीपटू अनिल कुंबळे हे आहेत. (Ind vs Eng 3rd test 2024)