IND vs ENG 3rd TEST LIVE UPDATES : ब्रेकिंग राजकोट कसोटीत इंग्लंडचा निम्मा संघ तंबूत, भारतीय संघ मोठ्या विजयाच्या मार्गावर!
IND vs ENG 3rd TEST LIVE UPDATES : राजकोट येथे सुरू असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताने इंग्लंड समोर विजयासाठी 557 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. 557 धावांचा पाठलाग करताना इंग्लंडचा दुसरा डाव गडगडला आहे. भारतीय गोलंदाजांनी इंग्लंडचा निम्मा संघ तंबूत धाडला आहे.भारताने तिसऱ्या कसोटी सामन्यावर मजबूत पकड मिळवली असून इंग्लंडचा संघ पराभवाच्या छायेत सापडला आहे.
शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा इंग्लंडने 28 ओव्हरमध्ये 61 धावांच्या मोबदल्यात 7 गडी गमावले आहे. इंग्लंडचे सर्व प्रमुख फलंदाज तंबूत परतले आहेत.इंग्लंडचा संघ पराभवाच्या छायेत सापडला आहे. रविंद्र जडेजाने भेदक गोलंदाजी करत 3 विकेट घेतल्या आहेत. तर जसप्रित बुमराह एक तर कुलदीप यादव यांने दोन विकेट्स घेतल्या आहेत. भारताच्या विजयाची औपचारिकताच बाकी राहिली आहे भारतीय संघ इंग्लंड विरूध्द मोठ्या विजयाच्या मार्गावर आहे. ( IND vs ENG 3rd TEST LIVE UPDATES)