IND vs ENG 3rd TEST LIVE : यशस्वी जयस्वाल आणि सरफराज खानचा संडे धमाका, जयस्वालचे धमाकेदार द्विशतक तर खानचे अर्धशतक, इंग्लंडपुढे विजयासाठी 557 धावांचे तगडे आव्हान !

  • हायलाईट्स IND vs ENG 3rd TEST LIVE
  • भारत विरुद्ध इंग्लंड तिसरा कसोटी सामना
  • भारत पहिला डाव 445 धावा
  • इंग्लंड पहिला डाव 319 धावा
  • भारत दुसरा डाव 4 बाद 430 (घोषित)
  • यशस्वी जयस्वालचे द्विशतक
  • शुभम गिलचे अर्धशतक
  • सरफराज खानचे अर्धशतक
  • इंग्लंडपुढे विजयासाठी 557 धावांचे आव्हान
IND vs ENG 3rd TEST LIVE,Yashasvi Jaiswal and Sarfaraz Khan's Sunday blast, Jaiswal's explosive double century, Khan's half-century, strong challenge of 553 runs for victory against England by india,

IND vs ENG 3rd TEST LIVE : राजकोट येथे खेळवल्या जात असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्याचा चौथा दिवस भारताचा डावखुरा फलंदाज यशस्वी जयस्वाल आणि सरफराज खान या दोघांनी गाजवला.चौथ्या दिवशी यशस्वी जयस्वालने धमाकेदार द्विशतक झळकावले. तर सरफराज खानने पुन्हा एकदा अर्धशतक झळकावले. कसोटी पदार्पणाच्या पहिल्या सामन्यातील दोन्ही अर्धशतक झळकावणाऱ्या मोजक्या फलंदाजांच्या यादीत त्याचा समावेश झाला. शुभमन गिलचे थोडक्यात शतक हुकले.

IND vs ENG 3rd TEST LIVE,Yashasvi Jaiswal and Sarfaraz Khan's Sunday blast, Jaiswal's explosive double century, Khan's half-century, strong challenge of 553 runs for victory against England by india,

भारताने दुसर्‍या डावाला सुरुवात केल्यानंतर कर्णधार रोहित शर्मा 18 धावांवर बाद झाला. त्यानंतर शुभमन गिल सोबत यशस्वी जयस्वाल याने 161 धावांची भागीदारी केली.या भागीदारीत जयस्वालने दमदार शतक झळकावले. तो 104 धावांवर निवृत्त झाला. त्याच्यानंतर रजत पाटीदार मैदानात आला पण तो शून्यावर बाद झाला. त्याच्यानंतर कुलदीप यादव हा नाईट वाॅचमन म्हणून मैदानात आला. तिसऱ्या दिवस अखेर शुभमन गिल 65 धावांवर तर कुलदीप यादव 3 धावांवर नाबाद होता. (IND vs ENG 3rd TEST LIVE)

IND vs ENG 3rd TEST LIVE,Yashasvi Jaiswal and Sarfaraz Khan's Sunday blast, Jaiswal's explosive double century, Khan's half-century, strong challenge of 553 runs for victory against England by india,

आज चौथ्याचा खेळ सुरु झाल्यानंतर 65 धावांवर नाबाद असलेला शुभमन गिल शतक झळकावणार असे वाटत असताना तो 91 धावांवर रन आऊट झाला. नाईटवाॅचमन कुलदीप यादव हा 27 धावांवर बाद झाला. त्यानंतर यशस्वी जयस्वाल आणि सरफराज खान या दोघांनी इंग्लंड गोलंदाजांची प्रचंड धुलाई केली. (IND vs ENG 3rd TEST LIVE)

IND vs ENG 3rd TEST LIVE,Yashasvi Jaiswal and Sarfaraz Khan's Sunday blast, Jaiswal's explosive double century, Khan's half-century, strong challenge of 553 runs for victory against England by india,

यशस्वी जयस्वालने इंग्लंड विरूध्दच्या मालिकेतील सलग दुसरे द्विशतक झळकावले. त्या आधी सरफराज खानने अर्धशतक झळकावले. त्यानंतर दोघांनी पुन्हा फटकेबाजी करत भारताची धावसंख्या वाढवली. भारताने 430 धावांवर आपला दुसरा डाव घोषित केली. भारताने इंग्लंडपुढे विजयासाठी 557 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. यशस्वी जयस्वाल हा 214 धावांवर तर सरफराज खान 68 धावांवर नाबाद राहिला. (IND vs ENG 3rd TEST LIVE)

IND vs ENG 3rd TEST LIVE,Yashasvi Jaiswal and Sarfaraz Khan's Sunday blast, Jaiswal's explosive double century, Khan's half-century, strong challenge of 553 runs for victory against England by india,

अवघी सातवी कसोटी खेळणाऱ्या 21 वर्षीय यशस्वी जायस्वाल यानं सलग दुसरं द्विशतक ठोकलं. यशस्वी जायस्वाल यानं पहिल्या चेंडूपासूनच इंग्लंडच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. मार्क वूड आणि जेम्स अँडरसन यासारखे अनुभव गोलंदाजही यशस्वी जायस्वालसमोर फिके पडले. राजकोट कसोटीच्या तिसऱ्या दिवशी यशस्वी जायस्वाल यानं शानदार शतक ठोकल. पण दुखापतीमुळे त्याला मैदान सोडावं लागलं. (IND vs ENG 3rd TEST LIVE)

पण चौथ्या दिवशी पुन्हा तो मैदानावर परतला. जिथे खेळ सोडला तेथूनच त्यानं सुरुवात केली. त्यानं गोलंदाज कोण आहे ? याचा विचार केला नाही फक्त चेंडू फटकावलं. यशस्वी जायस्वाल यानं 236 चेंडूत 214 धावांची खेळी करत माघारी परतला. यशस्वीनं आपल्या या खेळीमध्ये 12 षटकार आणि 14 चौकार ठोकले. एकाच डावात सर्वाधिक षटकार लगावण्याचाही विक्रम यशस्वीच्या नावावर झाला आहे.(IND vs ENG 3rd TEST LIVE)

यशस्वी जायस्वाल यानं सलग दुसऱ्या कसोटीत द्विशतक ठोकले. यशस्वी जायस्वाल यानं 236 चेंडूत 12 षटकार आणि 14 चौकारांच्या मदतीने नाबाद 214 धावा चोपल्या. यशस्वी जायस्वाल यानं इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनच्या एकाच षटकात तीन षटकार लगावले. जगातील सर्वात अनुभवी गोलंदाजांची यशस्वी जायस्वाल यानं पिटाई केली. जेम्स अँडरसन आणि मार्क वूड यशस्वीपुढे फिके दिसले.(IND vs ENG 3rd TEST LIVE)

यशस्वी जायस्वालने भारतीय खेळाडू म्हणून कसोटी क्रिकेटच्या एका डावात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम केला आहे. त्यानं नवज्योत सिंह सिद्धू आणि मयंक अग्रवाल यांचा विक्रम मोडीत काढला. जायस्वालने एका डावात 12 षटकार लगावले. नवज्योत सिंह सिद्धू आणि मयंक अग्रवाल यांच्या नावावर प्रत्येकी 8 षटकार मारण्याचा विक्रम आहे. 1994 मध्ये लखनऊमध्ये श्रीलंकेविरुद्ध झालेल्या सामन्यात सिद्धूने 8 षटकार ठोकले होते. यानंतर मयंक अग्रवालने 2019 मध्ये इंदूरमध्ये बांगलादेशविरुद्ध खेळल्या गेलेल्या कसोटीच्या डावात फलंदाजी करताना 8 षटकार ठोकले होते.(IND vs ENG 3rd TEST LIVE)

स्कोरकार्ड : यशस्वी जयस्वाल 214 नाबाद, रोहित शर्मा – 18, शुमन गिल 91, रजत पाटीदार 0, कुलदीप यादव 27, सरफराज खान 68 नाबाद तर इंग्लंडकडून जो रूट टाॅम हार्टली आणि रेहान अहमद यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. (IND vs ENG 3rd TEST LIVE)

https://x.com/BCCI/status/1759128619178201183?s=20