Ind vs Eng 3rd test score : राजकोट कसोटीत भारताचा 445 धावांचा डोंगर, ध्रुव जुरेल ठरला दुसऱ्या दिवसाचा हिरो
- हायलाईट्स
- भारत विरुद्ध इंग्लंड तिसरा कसोटी सामना राजकोट (Ind vs Eng 3rd test score)
- भारताच्या पहिल्या डावांत 445 धावा
- रोहित शर्मा व रविंद्र जडेजा यांनी झळकावले शतक
- सर्फराज खान व ध्रुव जुरेलचे भारताकडून कसोटी पदार्पण
- कसोटी पदार्पणात सर्फराज खानचे अर्धशतक
- ध्रुव जुरेलही ठरला दुसऱ्या दिवसाचा हिरो
- इंग्लंडकडून मार्क वुडने घेतल्या सर्वाधिक 4 विकेट
Ind vs Eng 3rd test score : भारत आणि इंग्लंड यांच्यात राजकोट येथे सुरु असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने पहिल्या डावात धावांचा डोंगर उभारला. भारताचा पहिला डाव 445 धावांवर संपुष्टात आला. भारताने 130.5 षटके फलंदाजी केली. कसोटी मालिकेतील सर्वात मोठी धावसंख्या भारताने आज उभारली. भारताकडून पहिल्या डावात कर्णधार रोहित शर्माने सर्वाधिक 131 धावा केल्या.
पहिल्या दिवशी शतक झळकावून नाबाद असलेला रविंद्र जडेजा दुसर्या दिवशी 2 धावांची भर घालून बाद झाला. त्याने 112 धावा केल्या. भारताच्या पहिल्या डावाचा दुसरा दिवस रविचंद्रन अश्विन व ध्रुव जुरेल (Ravichandran Ashwin) या जोडीने गाजवला. यात ध्रुव जुरेल (Dhruv Jurel) ने 46 धावांची आकर्षक खेळी करत दुसरा दिवस गाजवला. त्यानंतर फलंदाजीस आलेल्या जसप्रीत बुमराहने मोहम्मद सिराज सोबत 30 धावांची भागीदारी केली. (Ind vs Eng 3rd test 2024)
इंग्लंड संघ भारताच्या दौर्यावर आहे. या दौर्यात पाच कसोटी सामने खेळवले जाणार आहेत. यातील दोन सामने यापुर्वी झाले आहे. दोन्ही संघांनी एक एक सामना जिंकून बरोबरी केली आहे. तिसरी कसोटी जिंकून कोणता संघ आघाडी घेणार याकडे क्रिकेटप्रेमींच्या नजरा लागल्या आहेत. राजकोट येथे 15 रोजी तिसऱ्या कसोटी सामन्यात सुरुवात झाली. (Ind vs Eng 3rd test score)
भारतीय संघाने राजकोट कसोटीत पहिल्या दिवस अखेर 5 बाद 326 धावा केल्या.भारताचा आक्रमक सलामीवीर यशस्वी जयस्वाल हा 10 धावांवर बाद झाला.शुभमन गिल पुन्हा एकदा अपयशी ठरला. तो शून्यावर बाद झाला.तर रजत पाटीदार 5 धावांवर बाद झाला. सुरुवातीला भारताच्या 3 विकेट झटपट पडल्या. त्यानंतर कर्णधार रोहित शर्माने रविंद्र जडेजाला सोबत घेत 204 धावांची भागीदारी केली. यात रोहित शर्माने 196 चेंडूत 131 धावा करत शतक झळकावले. (Ind vs Eng 3rd test score)
रोहित शर्मा बाद झाल्यानंतर कसोटीत पदार्पण केलेल्या सर्फराज खान मैदानात आला. खान आणि जडेजा सोबत 77 धावांची भागीदारी केली. या भागिदारीत सर्फराज खानने आक्रमक फलंदाजी अर्धशतक झळकावले.सर्फराज खान हाही शतक झळकावून कसोटी पदार्पण दणक्यात साजरा करणार असे वाटत असतानाच रविंद्र जडेजाच्या एका चुकीच्या काॅलमुळे तो धावबाद झाला. बाद झाल्यानंतर तो खूप निराश दिसत होता. सर्फराज ज्या पध्दतीने बाद झाला ते पाहून रोहित शर्माने आपल्या डोक्यातील टोपी फेकून देत नाराजी व्यक्त केली.(Ind vs Eng 3rd test score)
सर्फराज खान बाद झाल्यानंतर घरच्या मैदानावर खेळणाऱ्या रविंद्र जडेजाने शतक झळकावले. पहिल्या दिवस.अखेर रविंद्र जडेजाने 212 चेंडूत 110 धावा केल्या. तर नाईट वाॅचमन कुलदीप यादव हा 1 धावेवर नाबाद होता. इंग्लंडकडून पहिल्या दिवशी मार्कवुडने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या. (Ind vs Eng 3rd test score)
Ind vs Eng 3rd test score : भारताचा पहिला डाव 445 धावांवर संपुष्टात आला
राजकोट कसोटीच्या दुसर्या दिवसाच्या खेळाची सुरुवात झाल्यानंतर मैदानात उतरलेला रविंद्र जडेजा अवघ्या दोन धावांची भर घालत 112 धावांवर बाद झाला. तर कुलदीप यादव 4 धावांवर बाद झाला. त्यानंतर मैदानावर आलेल्या रविंद्रन अश्विन व ध्रुव जुरेल या तळाच्या फलंदाजांनी इंग्लिश गोलंदाजांना चांगलेच हैराण केले. (Ind vs Eng 3rd test score)
आश्विन आणि जुरेल यांनी 77 धावांची भागीदारी केली. दोघांची जोडी धावांचा मोठा डोंगर उभारणार असे वाटत असतानाच आश्विन हा 37 धावांवर बाद झाला. त्यानंतर धुव्र जुरेल हा मोठा फटका मारण्याच्या नादात 46 धावांवर बाद झाला. त्याची अर्धशतक झळकवण्याची संधी थोडक्यात हुकली. दोघांना रिहान अहमदने बाद केले.(Ind vs Eng 3rd test score)
जसप्रित बुमराह आणि मोहम्मद सिराज यांनी दहाव्या विकेटसाठी 30 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. यात जसप्रित बुमराहने 26 धावांचा वाटा होता. तो 26 धावांवर बाद झाला. तर मोहम्मद सिराज हा 3 धावांवर नाबाद राहिला.भारताचा पहिला डाव 445 धावांवर संपुष्टात आला (Ind vs Eng 3rd test score)
इंग्लंडकडून मार्क वुडने सर्वाधिक 4 विकेट घेतल्या, 27.5 ओव्हर गोलंदाजी करत 114 धावा दिल्या. तर रेहान अहमदने 2 विकेट घेतल्या. जेम्स अंडरसनला एक विकेट मिळाली. टाॅम हार्टली ला एक विकेट मिळाली.जो रूट ला एक विकेट मिळाली. दीड दिवसांत इंग्लंडने 130.5 षटके गोलंदाजी केली.