Ind vs Eng 4th test highlights : जो रूटच्या संयमी खेळीने इंग्लंडचा डाव सावरला, जो रूटने झळकावले 31 वे कसोटी शतक, आकाश दीप व जो रूटने गाजवला पहिला दिवस !

Ind vs Eng 4th test highlights : भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेतील (Ind vs Eng test series 2024 ) रांची येथे सुरु चौथ्या कसोटीत 40 ओव्हरमध्ये 149 धावा करत इंग्लंडचे पाच फलंदाज तंबूत परतले होते. त्यानंतर जो रूटने (joe root) चिवट फलंदाजी करत इंग्लंडचा डाव सावरला. रांची कसोटीच्या पहिल्या डावांत भारताकडून अकाश दीप (Akash deep) तर इंग्लंडकडून जो रूट हे दोघे पहिल्या दिवसाचे हिरो ठरले.

Ind vs Eng 4th test highlights, England's innings saved by Joe Root's calm play, Joe Root's 31st test century, Akash Deep and Joe Root's first day hero

रांची (ranchi test) येथे सुरु असलेल्या भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी सामन्यात भारताकडून वेगवान गोलंदाज अकाश दीप (Akash deep) या युवा वेगवान गोलंदाजाचे भारतीय कसोटी संघात पदार्पण झाले (team india) भारताकडून कसोटी संघात पदार्पण करताच अकाश दीपने पहिल्याच दिवशी धमाकेदार गोलंदाजी करत तीन महत्वपूर्ण विकेट्स घेत सर्वांचीच मने जिंकली. भारतीय संघाकडून नियमित वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज याने 2 विकेट्स घेतल्या, आर आश्विन व रविंद्र जडेजा या दोघांनी एक एक विकेट घेतली.

भारतीय संघ गोलंदाजीस मैदानात उतरल्यानंतर जसप्रित बुमराहाच्या अनुपस्थितीत अकाश दीपने
पहिल्या सत्रात इंग्लंडला जोरदार धक्के दिले. सलामीवीर बेन डकेट याला 11 धावांवर बाद करत अकाश दीपने आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेट मधील पहिली विकेट मिळवली. त्यानंतर त्याने ओली पोपला शून्यावर बाद केले. त्याच्यानंतर दुसरा सलामीवीर झॅक क्रॉली (Zak Crawley) याला 42 धावांवर बाद केले. अकाश दीप याच्या वादळी गोलंदाजीमुळे इंग्लंडचे आघाडीचे फलंदाज झटपट बाद झाले.त्यामुळे इंग्लंडचा निम्मा संघ तंबूत परतला होता.

Ind vs Eng 4th test highlights, England's innings saved by Joe Root's calm play, Joe Root's 31st test century, Akash Deep and Joe Root's first day hero

इंग्लंडने दुसऱ्या सत्रअखेर 40 ओव्हरमध्ये 5 बाद 149 धावा केल्या होत्या. मैदानावर जो रूट 40 धावांवर तर बेन फोक्स 13 नाबाद होते. तिसऱ्या सत्रानंतर इंग्लंडचा डाव गुंडाळण्यात भारतीय गोलंदाज यशस्वी ठरतील असे वाटत असतानाच जो रूटने अतिशय चिवट फलंदाजी करत इंग्लंडला संकटातून बाहेर काढले. त्याने बेन फोक्सला साथीला घेत 113 धावांची शतकीय भागीदारी केली. बेन फोक्सला मोहम्मद सिराजने आऊट केले. तो 47 धावांवर बाद झाला.

Ind vs Eng 4th test highlights, England's innings saved by Joe Root's calm play, Joe Root's 31st test century, Akash Deep and Joe Root's first day hero

बेन फोक्स बाद झाल्यानंतर जो रूटने टाॅम हार्टलीला सोबत घेत आपला खेळ पुढे सुरु ठेवला. ही जोडी जमणार असे वाटत असतानाच मोहम्मद सिराजने टाॅम हार्टलीची दांडी गुल केली. तो 13 धावांवर बाद झाला. या दोघांनी 20 धावांची भागीदारी केली. टाॅम हार्टलीनंतर ऑली राॅबिन्सन मैदानावर आला. त्याने ज्यो रूटला चांगली साथ दिली. दोघांनी 57 धावांची भागीदारी केली. दोघेही नाबाद आहेत. जो रूटने तळाच्या फलंदाजांना साथीला घेत पहिल्या दिवस अखेर इंग्लंडची सन्मानजनक धावसंख्या धावफलकावर झळकावली. पहिल्या दिवस अखेर इंग्लंडने 7 बाद 302 धावा केल्या.

जो रूटने झळकावले 31 वे शतक

इंग्लंडचा फलंदाज जो रूट हा गेल्या तीन कसोटीत सातत्याने अपयशी ठरत होता. मात्र रांची येथे सुरु असलेल्या चौथ्या कसोटीत संघ अडचणीत असताना तो संघाच्या मदतीला धावून आला. जो रूटने संयमी खेळी करत शतक झळकावले. त्याने 226 चेंडूचा सामना करत 106 धावा केल्या. यात त्याने 9 चौकार लगावले. जो रूटने रांची कसोटीत 46.90 च्या सरासरीने शतक झळकावले. पहिल्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा जो रूट हा 106 धावांवर नाबाद आहे. तर त्याचा साथीदार ऑली राॅबिन्सन हा 31 धावांवर नाबाद आहे. जो रूटने आज 31 वे कसोटी शतक झळकावले.

जो रूटच्या 19 हजार धावा पुर्ण

जो रूटने आज आपल्या कसोटी कारकिर्दीतील 31 वे शतक झळकावले. त्याचबरोबर कसोटीत 12 हजार धावा पूर्ण केल्या. तसेच त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 444 इनिंगमध्ये 19 हजार धावा पुर्ण केल्या. त्याचबरोबर भारताविरुद्ध 10 शतके ठोकण्याचाही पराक्रमही त्याने आज केला. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात भारताविरुद्ध अशी कामगिरी करणारा जो रूट हा पहिला फलंदाज ठरला आहे. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्दीतील 47 वे शतक आज पुर्ण केले.

अकाश दीपचा धमाका

भारतीय कसोटी संघात पदार्पण केलेल्या अकाश दीपने इंग्लंडच्या पहिल्या डावाला सुरूंग लावला. गेल्या तीन कसोटी सामन्यात इंग्लंड कडून दमदार फलंदाजी करणाऱ्या तिघा प्रमुख फलंदाजांना त्याने तंबूत धाडले. अकाश दीपने पहिल्या दोन सत्रात 10 ओव्हरची गोलंदाजी करत 37 धावा देत 3 विकेट्स मिळवल्या.अकाश दीपने भारतीय संघाला धमाकेदार सुरूवात करून दिली. कसोटी पदार्पणात अकाश दीपने चमकदार कामगिरी करत आपली निवड सार्थ ठरवली आहे.