IND vs NZ 1st Test Sarfaraz Khan : बंगलोर कसोटी सरफराज खानचे दमदार शतक, तर रोहित शर्मा, विराट कोहली व ऋषम पंत यांनी झळकावली अर्धशतके

IND vs NZ 1st Test Sarfaraz Khan : न्यूझीलंड विरूध्द सुरु असलेल्या बंगलोर कसोटीत भारताचा तडाखेबंद फलंदाज सर्फराज खानने दमदार शतक झळकावले. Sarfaraz Khan हा पहिल्या डावात शून्यावर बाद झाला होता.परंतू त्याने दुसर्‍या डावांत तडाखेबंद शतकी खेळी केली. सरफराज खाने आंतरराष्ट्रीय कसोटी सामन्यातील पहिले शतक आज १९ रोजी न्यूझीलंड विरूध्द झळकावले. भारतीय संघ संकटात असताना सरफराज खानने दमदार शतकी खेळी केली.

IND vs NZ 1st Test Sarfaraz Khan, Bangalore Test Sarfaraz Khan scored a powerful century, while Rohit Sharma, Virat Kohli and Risham Pant scored half-centuries, Sarfaraz Khan century news,

पहिल्या डावात भारताचा संपुर्ण संघ ४६ धावांत बाद झाला होता. दुसऱ्या डावात मोठी धावसंख्या उभारण्याचे अव्हान भारतीय फलंदाजांसमोर होते. रोहित शर्मा आणि विराट कोहली ( Rohit Sharma, Virat Kohali) यांनी दमदार अर्धशतके झळकावली. त्यानंतर सरफराज खानने दमदार खेळी करत शतकाला गवसणी घातली. तर ऋषभ पंत (rishabh pant) याने अर्धशतक झळकावे

IND vs NZ 1st Test Sarfaraz Khan, Bangalore Test Sarfaraz Khan scored a powerful century, while Rohit Sharma, Virat Kohli and Risham Pant scored half-centuries, Sarfaraz Khan century news,

भारताने पहिल्या डावांत अवघ्या ४६ धावा बनवल्या होत्या. भारताने कसोटी सामन्यातील निर्नायकी धावसंख्या नोंदवली होती. त्यांनतर न्यूझीलंडने पहिल्या डावात ४०२ धावा बनवल्या होत्या. भारताचा संघ दुसऱ्या डावातील फलंदाजीसाठी मैदानात उतरला. यशस्वी जयस्वाल ३५, रोहित शर्मा ५२, विराट कोहली ७० या तिघांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली.

IND vs NZ 1st Test Sarfaraz Khan, Bangalore Test Sarfaraz Khan scored a powerful century, while Rohit Sharma, Virat Kohli and Risham Pant scored half-centuries, Sarfaraz Khan century news,

त्यानंतर सरफराज खान व ऋषभ पंत या दोघांनी आकर्षक फलंदाजी केली. सरफराज खान याने शतक तर ऋषभ पंत याने अर्धशतक झळकावले. सरफराज खान हा १२५ धावांवर तर ऋषभ पंत हा ५२ धावांवर नाबाद खेळत आहेत. भारताने ३ गडी गमावून ३४४ धावा केल्या आहेत.

सरफराज खानने शतक झळकावताच मैदानावर मोठा जल्लोष केला. त्याने कसोटी कारकीर्दीतील पहिले शतक झळकावले. भारतीय संघातील सर्वच खेळाडूंनी उभे सरफराज खानच्या शतकाचे सेलिब्रेशन केले.

चौथ्या दिवशीच्या खेळाला सुरुवात झाल्यानंतर भारतीय संघाच्या दुसऱ्या डावातील ५६ व्या षटकात मॅट हेन्री गोलंदाजीसाठी आला. यावेळी ९६ धावांवर खेळणारा सर्फराज खान स्ट्राईकवर होता. दुसरीकडे नॉन स्ट्राईकवर असणारा रिषभ पंत ६ धावांवर खेळत होता. हॅन्रीच्या या षटकातील पहिल्या चेंडूवर सर्फराज खान याने लेट कट शॉट मारत चेंडू बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेनं टोलावला. पहिली धाव पूर्ण केल्यावर पंत दुसऱ्या धावेसाठीही अर्ध्या क्रिजपर्यंत पोहचला होता. दुसरीकडे धाव नको हे सांगण्यासाठी सर्फराज खान अक्षरश: उड्या मारताना दिसला.

यावेळी पंत जवळपास रन आउट झाल्यात जमा होता. पण न्यूझीलंड खेळाडूंना त्याचा फायदा उठवता आला नाही. अन् जोडी फुटता फुटता वाचली. त्यानंतर स्टेडियममधील उपस्थितीत प्रेक्षकांनीही सुटकेचा निश्वास सोडल्याचे पाहायला मिळले. याशिवाय भारतीय ड्रेसिंग रुममध्ये हशा पिकल्याचे पाहायला मिळाले. त्यामागचं कारण कदाचित सर्फराज खाननं धावेसाठी नकार देताना मारलेल्या उड्या हेच असावं.

काही क्षण दोघांमध्ये ताळमेळाचा अभाव दिसला पण त्यानंतर या जोडीनं न्यूझीलंडला पुन्हा संधी दिली नाही. सर्फराज खान याने कसोटी कारकिर्दीतील पहिलं शतक झळकावले. दुसरीकडे पंतनं अर्धशतकाला गवसणी घातली. दोघांनी चौथ्या विकेटसाठी ११३ धावांची भागीदारी केली. पावासामुळे खेळ थांबला त्यावेळी भारतीय संघाने ३ बाद ३४४ धावा केल्या होत्या. भारतीय संघ न्यूझीलंडपेक्षा फक्त १२ धावांनी पिछाडीवर होता.