India Harnaaz Sandhu wins Miss Universe 2021 beauty pageant in Israel : भारताच्या हरनाज संधूने जिंकला मिस युनिव्हर्स 2021 स्पर्धेचा किताब !
जामखेड टाईम्स वृत्तसेवा : तब्बल 21 वर्षानंतर भारताने मिस युनिव्हर्स हा किताब जिंकला. या वर्षी भारताची स्पर्धक हरनाज संधू हिने मिस युनिव्हर्स 2021 हा किताब पटकावला.हरनाज संधू मिस युनिव्हर्सचा किताब जिंकणारी तिसरी भारतीय आहे – 1994 मध्ये अभिनेत्री सुष्मिता सेन आणि 2000 मध्ये लारा दत्ताने ही स्पर्धा जिंकली होती. (India Harnaaz Sandhu wins Miss Universe 2021 beauty pageant in Israel)
इस्त्रायलमध्ये (Miss Universe 2021 in Israel) यंदा मिस युनिव्हर्स 2021 ही सौंदर्य स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत हरनाज संधू (Harnaaz Sandhu) भारतीय स्पर्धकाने बाजी मारली. या स्पर्धेत हरनाजने पॅराग्वे आणि आफ्रिकेच्या स्पर्धकांना मागे टाकत मिस युनिव्हर्स चा किताब जिंकला. (India’s Harnaaz Sandhu wins Miss Universe beauty pageant)
आजच्या काळात येणाऱ्या तणावांना कसं सामोरं जावं याविषयी तुम्ही तरूण महिलांना काय सल्ला द्याल या प्रश्नावर बोलताना हरनाज म्हणाली, स्वता:वर अतिविश्वास ठेवणे हा आजच्या तरुणाईवरील सर्वात मोठा दबाव आहे. तुम्ही इतरांपेक्षा वेगळे आहात याची जाणीवच तुम्हाला सुंदर बनवते. इतरांशी स्वत:ची तुलना करणं थांबवा आणि जगभरात घडणाऱ्या अधिक महत्वाच्या गोष्टींबद्दल आपण बोलूयात. तुम्ही समोर या. इतरांशी बोला. कारण तुमच्या आयुष्याला घडवणारे तुम्हीच आहात. तुम्हीच स्वता:चा आवाज आहात.मला माझ्यावर विश्वास आहे म्हणूनच मी आज या ठिकाणी उभी आहे.
त्याचबरोबर हरनाजसह इतर पाच स्पर्धकांना आणखीन एक प्रश्न विचारण्यात आला होता. बर्याच लोकांना असं वाटतं की हवामान बदल ही फक्त फसवणुक आहे अशा लोकांना पटवून देण्यासाठी तुम्ही कराल ? या प्रश्नांला उत्तर देताना हरनाज म्हणाली की, निसर्गासमोर असलेल्या असंख्य समस्या पाहून मला फार दु:ख होतं आणि हे सर्व आपल्या बेजबाबदार वागण्यामुळे आहे. आता कमी बोलण्याची आणि प्रत्यक्ष कृती करण्याची खरी वेळ आहे कारण आपली प्रत्येक कृती निसर्गाला वाचवू तरी शकते किंवा त्याचा नाश करू शकते. पश्चात्ताप आणि दुरूस्ती करण्यापेक्षा प्रतिबंध आणि संरक्षण करणं कधीही चांगलं.
हरनाजच्या याच उत्तराने उपस्थितांसह परिक्षकांची मने जिंकत मिस युनिव्हर्स किताबावर आपले नाव कोरले. मेस्किकोची माजी मिस युनिव्हर्स 2020 अँड्रिया मेझा (Miss Universe 2020 Andrea Meza) हिने हरनाज संधूला मिस युनिव्हर्सचा आपला मुकुट दिला. आणि हरनाज मिस युनिव्हर्स 2021 ठरली. या सौंदर्य स्पर्धेत पॅराग्वे आणि दक्षिण आफ्रिका च्या स्पर्धक दुसर्या आणि तिसर्या क्रमांकावर विजय झाल्या.
हरनाज संधू ही माॅडेल व कलाकार आहे. तिच्या रूपाने तब्बल 21 वर्षानंतर भारताने मिस युनिव्हर्सचा किताब पटकावला आहे. सध्या सोशल मिडीयावर हरनाज संधू फोटो harnaaz sandhu pic व व्हिडिओ प्रचंड वायरल होत आहेत. तसेच ट्विटरवर #CongratulationIndia #HarnaazSandhu #MissUniverse2021 या Trend द्वारे हरनाजवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
India Harnaaz Sandhu wins Miss Universe 2021 beauty pageant in Israel
#MissUniverse भारताची हरनाज संधू ठरली मिस युनिव्हर्स 2021 #अभिनंदन
व्हिडीओ सोर्स – twitter pic.twitter.com/tMlRfUh4Mb— Jamkhed Times (@JamkhedTimes) December 13, 2021