India vs England 4th T20 match live : भारत विरुद्ध इंग्लंड चौथा टी 20 सामना, इंग्लंडने घेतला बोलिंगचा निर्णय, 6 षटकात भारताची अवस्था 3 बाद 46

India vs England 4th T20 match live : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात आज चौथा टी 20 सामना पुण्यात होत आहे. गहुंजे येथील मैदानावर हा सामना होत आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर (Maharashtra Cricket Association Stadium in Pune) होत असलेल्या या सामन्यात इंग्लंड संघाने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. 5 सामन्यांच्या मालिकेत भारताने 2-1 अशी आघाडी घेतलेली आहे. पुण्यात होणारा आजचा सामना जिंकून भारतीय संघ मालिका जिंकण्याच्या प्रयत्नात असणार आहे. तर इंग्लंडचा संघ आजचा सामना जिंकून मालिकेत बरोबरी करण्याच्या प्रयत्नात असणार आहे.  

India vs England 4th T20 match live, England won the toss and took the bowling decision, India are 46 for 3 in 6 overs

India vs England 4th T20 match live : भारताची पहिल्या डावात खराब सुरुवात झाली आहे. भारताचा सलामीवीर संजू सॅमसन हा पुन्हा एकदा अपयशी ठरला. त्याच बरोबर भारतीय कर्णधार सूर्यकुमार व तिलक वर्मा हे दोघे शून्यावर बाद झाले. पहिल्या पाच षटकात भारताचा संघ अडचणीत सापडला आहे. भारताची अवस्था 3 बाद 46 अशी झाली आहे. रिंकू सिंग व अभिषेक शर्मा हे दोघे सध्या खेळत आहेत.

साकिब महमूदने संजू सॅमसन, तिलक वर्मा आणि भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादव यांना पहिल्याच षटकात एकही धाव न देता बाद केले.