मुसळधार बर्फवृष्टीत LOCवर गस्त घालणाऱ्या Indian Army च्या सुपर हिरोंचा Video एकदा पहाच Indian Army superheroes patrolling LOC in torrential snowfall
नवी दिल्ली; वृत्तसंस्था : सध्या उत्तर भारतातील काही राज्यात बर्फवृष्टी (Snowfall) सुरू आहे. विशेषता: जम्मू – काश्मीर (Jammu and Kashmir) राज्यात मोठ्या प्रमाणावर बर्फ पडत आहे. जोरदार हिमवर्षाव (Torrential Snowfall) सुरू असतानाही भारतीय जवान (Indian Army Soldiers) खंबीरपणे सीमेवर (LOC) तैनात असल्याचे दिसत आहे. सीमाभागातून भारतीय सैन्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडीओ सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणावर शेअर होत आहे. व्हिडिओ पाहून नेटकरी भारतीय सैन्याला कडक सॅल्युट ठोकत आहेत. (Indian Army Superheroes Patrolling LOC In Torrential Snowfall)
बर्फाच्या वादळांची तमा न बाळगता लष्कराचे जवान शत्रूंपासून आपले रक्षण करण्यासाठी सीमेवर खंबीरपणे उभे आहेत.भारतीय लष्कराच्या जवानांचा एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये देशाच्या सीमेच्या सुरक्षेसाठी त्यांची बांधिलकी स्पष्टपणे दिसून येते, जे बर्फाच्या वादळातही आपले कर्तव्य चोख बजावत आहेत.
या व्हिडीओमध्ये जम्मू-काश्मीरमध्ये जोरदार बर्फवृष्टी होत असताना भारतीय लष्कराचे जवान नियंत्रण रेषेवर (LoC) गस्त घालताना दिसत आहेत.उन्हाळा, हिवाळा, पाऊस कोणताही ऋतूत त्यांना सुट्टी नाही. प्रचंड बर्फवृष्टी होत असतानाही लष्कराचे जवान रात्रंदिवस सीमांचे रक्षण करण्यासाठी तत्पर असतात.जम्मूमधील संरक्षण विभागाने हा व्हिडीओ जारी केला आहे. या व्हिडीओला अत्तापर्यंत 19 हजार लाईक्स मिळाले आहेत.
ज्यामध्ये भारतीय लष्कराचे सैनिक हातात बंदूक घेऊन बर्फाच्छादित टेकडीवर सतत गस्त घालत आहेत. डोंगरावर दाट बर्फ आहे आणि बर्फही पडतच आहे. त्याच वेळी, नियंत्रण रेषेच्या पुढे असलेल्या भागात जोरदार बर्फवृष्टी दरम्यान सैन्य हालचालीसाठी स्नो स्कूटरचा वापर करत आहे.
जम्मू-काश्मीरच्या केरन सेक्टरमधूनही एक व्हिडीओ समोर आला आहे.जम्मू-काश्मीरमधील अनेक उंच भागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून सतत बर्फवृष्टी होत आहे, या पार्श्वभूमीवर संवेदनशील भागात भूस्खलनाचा इशाराही जारी करण्यात आला आहे.मुसळधार बर्फवृष्टीमुळे येथील विमानसेवाही प्रभावित झाली असून अनेक उड्डाणे रद्द करावी लागली आहेत.
त्याचवेळी पीआरओ उधमपूर लेफ्टनंट कर्नल अभिनव नवनीत यांनीही एका जवानाचा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. हातात बंदूक घेऊन एक जवान बर्फाच्या वादळात कर्तव्य बजावण्यासाठी कसा तयार असतो हे तुम्ही व्हिडीओमध्ये पाहू शकता. या व्हिडीओला अत्तापर्यंत 40 जणांनी लाईक केले आहे.