latest health news | धक्कादायक: भारतात कोरोना विषाणूचा नवा व्हेरिएंट सापडला (AY12 Corona Virus Variant)

जामखेड टाईम्स वृत्तसेवा | latest health news | कोरोनाच्या डेल्टा व डेल्टा प्लस प्रकाराने जगभरात खळबळ उडवून दिलेली असतानाच भारतात (covid19india) AY12 कोरोनाचा नवा विषाणू सापडला आहे. एवाय-12 प्रकाराचा नवा कोरोना विषाणू व्हेरिएंट शास्त्रज्ञांना सापडला आहे. याआधी शास्त्रज्ञ AY12 ला डेल्टा व्हेरिएंटचा भाग असल्याचे मानत होते. मात्र, AY12 च्या सक्रियतेमुळे शास्त्रज्ञांना त्याचे स्वतंत्रपणे वर्गीकरण करावे लागले आहे. त्यामुळे भारतीय शास्त्रज्ञांसह नागरिकांच्या चिंता वाढल्या आहेत. (A new AY-12 corona virus variant has been found in India)

latest health news | देशात मागील दोन वर्षांपासून कोरोनाने अक्षरश: हैदोस घातला आहे. कोरोना नियंत्रणाचे अनेक कठोर उपाय राबवूनही कोरोना देशात (covid19india) ठाण मांडून बसला आहे. त्यातच कोरोनाने अनेक नवनवीन व्हेरियंट समोर येत असल्याने तो अधिक धोकादायक बनला आहे. कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत डेल्टा व्हेरियंटने (Delta /Delta Plus variant)  खुप मोठी हानी केली. तिसरी लाट येणार असे भाकिते सतत वर्तवली जात आहेत. देशात लसीकरणाचा वेग वाढवला आहे. लसीकरण वाढत असतानाही अनेक भागात कोरोना सक्रीय आहे.देशातील कोरोना बाधितांचे नमुने तपासुन कोरोनाचा कोणता प्रकार सक्रीय आहे हे तपासले जात आहे. त्यात एवाय-12 प्रकाराचा नवा कोरोना विषाणू शास्त्रज्ञांना सापडला आहे. यामुळे देशात खळबळ उडाली आहे. (New-AY12 Corona Virus Variant)

latest health news | याआधी शास्त्रज्ञ AY.12 ला डेल्टा व्हेरिएंटचा भाग असल्याचे मानत होते. मात्र, AY.12 च्या सक्रियतेमुळे शास्त्रज्ञांना त्याचे स्वतंत्रपणे वर्गीकरण करावे लागले आहे. कोरोना व्हायरसमुळे संक्रमित झालेल्या नमुन्यांच्या जीनोम सीक्वेंसिंग दरम्यान AY.12 म्यूटेशनवर अधिक लक्ष देणे आवश्यक असल्याचे देशभरातील (covid19india) प्रयोगशाळांना सांगण्यात आले आहे. जीनोम सीक्वेंसिंगवर लक्ष ठेवणाऱ्या इन्साकॉगने सर्व प्रयोगशाळांसाठी अलर्टही जारी केले आहेत (New-AY12 Corona Virus Variant)

latest health news | इन्साकॉगच्या (INSACOG) माहितीनुसार, कोरोना व्हायरसच्या नवीन AY.12 व्हेरिएंटबद्दल फारशी माहिती देखील नाही. या म्यूटेशनचा किती परिणाम होत आहे? हे येत्या काही दिवसांत कळेल, पण आतापर्यंत जगभरात कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटमध्ये 13 म्यूटेशन झाल्याचे उघड झाले आहे, त्यापैकी हा एक आहे आणि (covid19india) भारतातही AY.12 ची प्रकरणे समोर येत आहेत.(New-AY12 Corona Virus Variant)

latest health news | इन्साकॉगच्या एका वरिष्ठ शास्त्रज्ञाने सांगितले की, AY.12 म्यूटेशनचा अभ्यास अद्याप सुरू आहे. त्याबद्दल फारशी माहिती आंतरराष्ट्रीय स्तरावरही उपलब्ध नाही. मात्र, असे आढळले आहे की जगभरातील 33 हजारहून अधिक नमुन्यांची पुष्टी झाली आहे, जी इतर डेल्टाच्या म्यूटेशनच्या तुलनेत सर्वाधिक आहे.याचबरोबर, ते म्हणाले की, AY.12 हा डेल्टाचा एक उप-वंश आहे, जो आतापर्यंत अनेक राज्यांमध्ये दिसून येत आहे. परंतु त्याच्या संख्येची बारकाईने तपासणी करणे आवश्यक आहे. डेल्टा आणि AY.12 यांच्यातील परिणामांमध्ये काय फरक आहे, हे अद्याप समजू शकलेले नाही. आता एवढेच म्हणता येईल की हे दोन्हीही एकसारखे दिसत आहेत.((New-AY12 Corona Virus Variant))

latest health news | देशात गेल्या 23 ऑगस्टपर्यंत 78865 नमुन्यांची जीनोम सीक्वेंसिंग (Genome sequencing) झाला आहे. ज्यामध्ये 31,124 म्हणजेच 61.2 टक्के नमुने कोरोना व्हायरसचे गंभीर व्हेरिएंट मिळाले आहेत. डेल्टा व्हेरिएंटचे सर्वाधिक 21192 नमुने सापडले आहेत. म्हणजे अल्फा, बीटा आणि गॅमा सह इतर व्हेरिएंटपेक्षा भारतात डेल्टा कितीतरी पटीने जास्त आहे, ज्यामुळे लोक एकापेक्षा जास्त वेळा संक्रमित होऊ शकतात. लसीकरणानंतर ही संक्रमित होऊ शकतात असेही सांगण्यात येत आहे. (New-AY12 Corona Virus Variant)

(covid19india) कोरोनाचा नवा आवतार सापडल्याने शास्त्रज्ञांना चक्रावून टाकले असले तरी हा नवा आवतार किती धोकादायक ठरू शकतो हे तातडीने शोधून काढणे आवश्यक आहे. देशातील नागरिकांनी कोरोना प्रतिबंधात्‍मक उपाययोजनांकडे दुर्लक्ष करणे धोकादायक ठरू शकते हे मात्र निश्चित (New-AY12 Corona Virus Variant)

Indian SARS-CoV-2 Genomics Consortium (INSACOG) चा सविस्तर अहवाल – INSACOG WEEKLY BULLETIN 23-08-2021_

web title- latest-health-news-ay-12-corona-variant