Mahant Narendra Giri Maharaj Suicide | खळबळजनक : अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष नरेंद्र गिरी महाराजांचा संशयास्पद मृत्यू ; देशात उडाली मोठी खळबळ

पोलिसांनी घेतले शिष्याला ताब्यात

उत्तर प्रदेश | Mahant Narendra Giri Maharaj Suicide | अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष नरेंद्र गिरी महाराज यांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे देशात मोठी खळबळ उडाली आहे.घटनास्थळी 07 पानी सुसाइड नोट आढळून आली आहे. (Suicide Note) सुसाइड नोटमध्ये त्यांनी एका शिष्याचा उल्लेख केला आहे.पोलिसांनी शिष्य आनंद गिरी यांना ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी यांचा मृतदेह बाघंबरी मठातील त्यांच्या खोलीत आढळला होता. त्यांनी नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे.पोलिसांनी प्राथमिक तपासानंतर ही आत्महत्या (mahant Narendra Giri Maharaj Suicide) असल्याचं सांगितलं जात आहे.

mahant Narendra Giri Maharaj Suicide
mahant Narendra Giri Maharaj

 

उत्तर प्रदेश पोलीस एडीजी लॉ एंड प्रशांत कुमार यांनी आनंद गिरी ला ताब्यात घेतल्याची माहिती दिली आहे.  प्रशांत कुमार म्हणाले, ‘अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यश्र महंत नरेंद्र गिरी यांचा मृत्यू झाल्याची माहिती शिष्याने दिली. आयजी तिकडे गेले होते त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. दरवाजा आतून बंद होता. शिष्यांनी दरवाजा ठोठावला पण नरेंद्र गिरी यांनी काही प्रतिसाद दिला नाही. हा दरवाजा नंतर तोडण्यात आला. ज्यावेळी महंत नरेंद्र गिरी यांचा मृतदेह आढळून आला. या ठिकाणी पोलिसांना एक सुसाईड नोटही मिळाली.(Mahant Narendra Giri Maharaj Suicide)

‘या सुसाईड नोटमध्ये नरेंद्र गिरी यांनी आनंद गिरी आणि इतर दोन शिष्यांच्या विरोधात काही आरोप केले आहेत. नरेंद्र गिरी यांनी सुसाईड नोटमध्ये असं म्हटलं आहे की माझ्या मृत्यूला हेच लोक जबाबदार आहेत.’ या सगळ्यानंतर आनंद गिरी यांना हरिद्वारमधून ताब्यात घेण्यात आलं आहे. (Mahant Narendra Giri Maharaj Suicide)

याआधी महंत नरेंद्र गिरी यांचे शिष्य आनंद गिरी यांनी आज तकला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत सांगितलं होतं की ते हरिद्वारमध्ये आहेत. त्यांनी हेदेखील सांगितलं की हे खूप मोठं षडयंत्र आहे, पोलीस अधिकारीही मिळालेले आहेत. मठाची संपत्ती विकण्यासाठी जे उत्सुक आहेत असे लोक या कटात सहभागी आहेत. एक कट रचून मला गुरूजींपासून (नरेंद्रगिरी) वेगळं करण्यात आलं. या प्रकरणात मला अडकवलं जातं आहे. या प्रकरणात मोठे भूमाफियाही सहभागी आहेत.(Mahant Narendra Giri Maharaj Suicide)

आनंद गिरी यांनी हे देखील सांगितलं की महंत नरेंद्र गिरी हे कोणत्याही मानसिक ताण-तणावात नव्हते. त्यांना त्रास दिला गेला आणि माझं नाव सुसाईड नोटमध्ये लिहिण्यास भाग पाडलं गेलं. मी जर दोषी असेन तर जी मिळेल ती शिक्षा भोगायला तयार आहे. मात्र या संपूर्ण प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे. मठाच्या संपत्तीपासून कुणाला फायदा होणार आहे, मठाचे पैसे कुठे गेले हे कळलं पाहिजे या सगळ्याची चौकशी झाली पाहिजे. मला संपवण्यासाठी हा कट रचला गेला आहे असंही आनंद गिरी यांनी म्हटलं आहे.(Mahant Narendra Giri Maharaj Suicide)

प्रयागराज पोलिसांनी महंतांच्या मृत्यूबाबत एक नोट जारी केली आहे. घटनास्थळाहून 6 ते 7 पानी सुसाइड नोट सापडली आहे. यामध्ये महंत नरेंद्र गिरी यांनी आनंद गिरी आणि अन्य शिष्यांची नावं लिहिली आहेत. अनेक कारणांमुळे ते त्रस्त होते, असं या सुसाइड नोटमुळे समोर आलं आहे. महंतांनी त्यांची संपती, आश्रम कोणाला दिला जावा, किंवा कोण याची काळजी घेईल याबद्दल देखील लिहिलं आहे. शिष्यांमुळे दुखी असल्या कारणाने आत्महत्या करीत असल्याचं त्यांनी सुसाइड नोटमध्ये लिहिलं आहे. (Mahant Narendra Giri Maharaj Suicide)

महंत नरेंद्र गिरी गेल्या अनेक दिवसांपासून काही शिष्यांमुळे तणावात होते.आखाडा परिषदेचे अध्यक्ष नरेंद्र गिरी यांच्या निधनाच्या वृत्तानंतर अयोध्येत शोककळा पसरली आहे.महंत नरेंद्र गिरी महाराज यांच्या निधनाचे वृत्त देशभर पसरताच देशात मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान देशभरातील वेगवेगळ्या मान्यवरांकडून घटनेसंबंधी दु:ख व्यक्त केले जात आहे. पंतप्रधान, गृहमंत्री यांच्यासह सर्वच पक्षातील नेत्यांनी दु:ख व्यक्त करत श्रध्दांजली अर्पण केली आहे.